"तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही." (लूक १४:२८)
प्रत्येक वधूला ठाऊक असते की तुमच्या जीवनाच्या एकमेव महत्वाच्या दिवस व रात्रीसाठी तयारी करण्यास तुम्हाला फार किंमत मोजावी लागली. बायबल म्हणते की एस्तेरने राजाबरोबर एका अनोख्या तऱ्हेने एक रात्र घालविण्यासाठी बारा महिने तयारी केली. बायबल म्हणते, "स्त्रियांसाठी ठरवलेल्या नियमांप्रमाणे बारा महिन्यांपर्यंत सर्वकाही उपचार झाल्यावर एकेका कुमारीची अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी आली. त्यांच्या शुद्धीकरणाची रीत म्हटली म्हणजे त्यांना गंधरसाचे तेल सहा महिने व सुगंधी द्रव्ये सहा महिने लावत असत; शिवाय इतर शुद्धतेच्या वस्तू त्यांना लावत असत. (एस्तेर २:१२)
आपल्या वर्तमान संस्कृतीमध्ये, आपण सुगंधाची बाटली विकत घेतो आणि त्यावर शिंपडतो. परंतु, येथे ते मसाले अक्षरशः तिची त्वचा व शरीरावर इतके घासले गेले होते की जेव्हा तिला घाम येत होता तेव्हा तिच्या शरीरातून सुगंध येत होता. मी विश्वास ठेवतो की तीचा आहार देखील बदलावा लागला होता. तिला बराच त्याग करावा लागला होता जर तिला राजासमोर हजर राहावयाचे होते. ज्याक्षणापासून तिने राजवाडयात प्रवेश केला होता, तिचे राहणीमान हे सामान्यसारखे नव्हते.
मला खात्री आहे की त्यांनी प्रत्येक मुलीला कामाचे वेळापत्रक दिले असेन. त्यांना माहीत होते की सकाळी केव्हा उठावे, आणि त्यांनी कधी अंघोळ करावी, आणि मार्गदर्शनाची वेळ किंवा मेकअप करणाऱ्या व्यक्तीकडून मार्गदर्शन. कदाचित त्यांना एक विशेष वेळ देखील असेन की व्यायामशाळेत जावे म्हणजे शाही कार्य जे पुढे येणार आहे त्यासाठी ते शारीरिकदृष्टया फिट असावेत जर शेवटी त्यांची निवड झाली.
प्रत्येक मुलीने तशी तयारी केली जसे काही ते राणी आहेत. पूर्वीची राणी वश्तीसारखे त्यांना प्रत्येक बाबतीत कठोर परिश्रम करावे लागले, जिला आत्ताच हाकलून देण्यात आले होते. ते एक गंभीर काम होते.
बायबल म्हणते की एका दिवशी हजर राहण्यासाठी त्यांना संपूर्ण एक वर्ष तयारी करावी लागली होती. हे एक मोठे काम होते आणि अति खर्च होता.
फोर्ब्स मासिमाकामधील २००८ चा लेख सांगतो की ऑलिम्पिक संघ बनविण्यअगोदर अधिकतर खेळाडू खेळामध्ये चार ते आठ वर्षे प्रशिक्षणामध्ये घालवितात. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी हा इतका वेळ खर्च करावा लागतो. आणखी, सराव हा खेळाडूंवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, अमेरिकन खेळाडू सिमोन बायल्सने एकदा म्हटले की तिने आठवडयात ३२ तास सराव केला होता, त्यात एक दिवस सुट्टी घेतली होती. खेळाडू गैबी डग्लसने म्हटले की ती सकाळी ८ वाजल्यापासून दुपारपर्यंत सराव करीत असे, दुपारी जेवणासाठी काही वेळ घेत असे, आणि मग संध्याकाळच्या भोजनापर्यंत सराव करीत असे. तसेच मायकेल फेल्फ्सने सीएनएनला एकदा सांगितले की तो तलावमध्ये दररोज तीन ते सहा तास सराव करतो, आणि आठवड्यात चार ते पाच दिवस जमिनीवर वेगवेगळे व्यायाम करतो. सायकलस्वार क्रिस्टिन आर्मस्ट्राँग म्हणते ती विश्रांती न घेता सलग दहा दिवसांत २० ते २५ तास सायकल चालविते. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकपूर्वी, असे पाहणीत आले की काही खेळाडूंनी खेळाअगोदर जवळजवळ १०,००० तास सराव केला होता.
हे सर्व प्रयत्न आणि शिस्तबद्धता केवळ एक पदक जिंकण्यासाठी होते. त्यांना किंमत ठाऊक होती आणि त्यासाठी किंमत मोजण्यास ते तयार होते. प्रश्न हा आहे की, तुम्ही देखील राजासमोर हजर राहण्यासाठी किंमत मोजली आहे काय? येशूने लूक १४:२८-३३ मध्ये म्हटले आहे, "तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’ अथवा असा कोण राजा आहे की तो दुसर्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, ‘जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय?’ जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलांना पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही."
या वर्षी परिवर्तनाच्या कोणत्या परिमाणाची तुम्ही इच्छा करिता? ही वेळ आहे की तुम्ही किंमत मोजावी आणि जोपर्यंत तुम्ही राजासनापर्यंत येत नाही तोपर्यंत मार्गक्रमण करीत राहावे.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की माझ्या परिवर्तनाच्या किंमतीसाठी तूं माझे डोळे उघड. मी प्रार्थना करतो की तूं मला किंमत भरण्यास आणि शेवटपर्यंत तुझे अनुसरण करण्यास साहाय्य कर. मी प्रार्थना करतो की तूं मला माझ्या गौरवी उद्धेशापर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक योग्य शिस्त पुरीव. मी फर्मान काढतो की या मार्गावर असताना मी धैर्य सोडणार नाही. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-1● तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर पडा
● यहूदाच्या विश्वासघाताचे खरे कारण
● दिवस ०९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● आपल्यामध्येच खजिना
● शब्दांचे सामर्थ्य
● दिवस १२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या