तर मग आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहो [ज्यांनी सत्या साठी साक्षी दिली आहे].... (इब्री १२:१ ऐम्पलीफाईड)
तुम्ही पाहता याचा अर्थ काय आहे- सर्व स्थापनकर्ते ज्यांनी मार्गाला प्रज्वलित केले आहे, हे सर्व वरिष्ठजण जे आपल्याला प्रोत्साहन देत आहेत? याचा अर्थ आपण त्याबरोबर उत्तम ते करावे. (इब्री १२:१ संदेश)
आपल्यालालक्षात ठेवायचे आहे की आपण ह्या शर्यतीत एकटे नाही. आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की, आपल्याला मोठया साक्षीरुपी मेघा द्वारे पाहिले जात आहोत. हे ते लोक आहेत जे सत्यामध्ये स्थिर राहिले व जगले आणि आता ते परमेश्वरा बरोबर आहेत. सुवार्ता ही आहे की ते केवळ आपल्याकडे पाहत नाहीत, तरते आपल्याला प्रोत्साहन देत आहेत. हे लक्षात ठेऊन, आपल्याला शर्यती साठी तयार राहावयाचे आहे. आपण केवळ वेळ वाया घालवू शकत नाही.
दुसरे, पवित्र शास्त्र सांगते, "चला आपण सर्व भार (अनावश्यक भार)व सहज गुंतविणारे पाप (खोलवरील व हुशारीने)टाकून दयावे. (इब्री १२:१ ऐम्पलीफाईड)
जर तुम्ही आधुनिक शर्यतपटू पाहता, तेथे काही ढगाळ वस्त्रे किंवा त्यांच्या शरीरावर अनावश्यक भार नसते. हे त्यांना त्यांची धाव कमी वेळात धावू देते.
मला हे सुद्धा सांगितले आहे की शर्यतीच्या कार मध्ये सर्वांत सामान्य माल जो वापरला जातो तो कार्बन (ग्राफाईट) आहे जो सर्वात हलका माल आहे. हे त्यांना कमी इंधन वापरणे, कमी रोधक असे करते व कार्यक्षमता वाढविते.
त्याप्रमाणे, जेव्हा आध्यात्मिक शर्यत धावत आहात, आपल्यालाते सर्व काढले पाहिजे जे आपला वेग कमी करते किंवा आपल्याला मागे रोखून ठेवते. आज, चांगले पाहा व तपासाकी त्या कोणत्या गोष्टी आहेत जे तुमचा वेग कमी करीत आहे किंवा तुम्हाला मागे ओढून ठेवत आहे की आध्यात्मिक शर्यंत प्रभावीपणे धावावी.
पवित्र शास्त्र मग आपल्याला सांगते की पाप सुद्धा आपल्याला रोखून ठेवते आणि अक्षरशः आपल्याला घसरविते जेव्हा आपण शर्यत धावत असतो. आता कल्पना करा तुम्ही धावताना घसरता, ते तुम्हाला पूर्णपणे शर्यती मधून बाजूला काढू शकते किंवा खरेच तुमचा वेग कमी करते. ह्यामुळेच आपल्याला पापापासून दूर राहावयाचे आहे.
मला एक संदेष्टा टी. बी. जोशुवा ची प्रार्थना आवडते, "परमेश्वरा, मला कृपा पुरीव, की पापापासून दूर राहावे व नेहमीच तुझ्या जवळ असावे."
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या,मला क्षमा कर, जरमीकोणत्याही मार्गा द्वारे, तुझ्या गौरवास अंतरलो आहे. मला आज व नेहमीच साहाय्य कर.
कुटुंबाचे तारण
पित्या, कृपा करून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या पुढेजा व प्रत्येक उंचसखल मार्ग सरळ कर व प्रत्येकखडबडीत मार्ग सपाट कर.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या, जसे शिष्य गेले व साक्षी द्वारे परत आले की सर्व गोष्टी त्यांच्या अधीन झाल्या आहेत; मला सुद्धा यश व विजयाच्या साक्षी सह परत येऊ दे.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे उंचाविले व गौरविले जाईल.
देश
पित्या, येशूच्या नांवात,आणि येशूच्या रक्ता द्वारे, तुझा बदला दुष्टांच्या डेऱ्या मध्ये मोकळा कर आणि एक राष्ट्र म्हणून आमचे गमाविलेले गौरव पुनर्स्थापित कर. असे होवो की तुझी शांतिआमच्या देशावर राज्य करो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वरा जवळ या● धार्मिक सवयी
● अंतिम क्षण जवळ येण्यास सुरुवात होते
● लहान तडजोडी
● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
● योग्य व्यक्तीबरोबर संबंध ठेवा
टिप्पण्या