english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. धैर्यवान राहा
डेली मन्ना

धैर्यवान राहा

Monday, 23rd of January 2023
20 15 1091
"जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करितात त्यांस तो फुसलावून भ्रष्ट करील; पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करितील." (दानीएल ११:३२)

कधी कधी आयुष्य भयावह असू शकते. बायबल सैतानास सिंहासारखे मानतो जो कोणालातरी गिळण्यास पाहत आहे. तो सिंह नाही, पण त्यास हे ठाऊक आहे की तो लोकांना त्यांचे उद्देश आणि नियुक्त कार्यापासून घाबरवू शकणार नाही, जर तो तसे असल्याचे सोंग करणार नाही. म्हणून तो गर्जना करीत येतो, आणि मग उद्देश असलेले लोक त्यांच्या सामान्य परिस्थितीमधील गौरवी उद्देशापासून दूर पळतात.

परंतु देवाने दिलेल्या तुमच्या उद्देशामध्ये चालण्यासाठी धैर्य लागते. एस्तेर ५:१-२ मध्ये बायबल म्हणते, "तिसऱ्या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आंतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता. राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिजवर कृपादृष्टि झाली; आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकास स्पर्श केला."

राजाने बोलाविल्यावाचून राजासमोर येण्यासाठी एस्तेरने स्वतःहून धैर्य दाखविले. यासाठी विशेष धैर्य लागले कारण राजा अह्श्वेरोश त्याच्या राण्यांना चांगली वागणूक देत नाही म्हणून प्रतिष्ठित होता. तिने आपले जीवन संकटात नेले आणि सर्व काही ती विसरली. एस्तेर ४:१६ मध्ये तिने पूर्वी म्हटले होते, "जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरिता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आंत राजाकडे जाईन; मग मी मेल्ये तर मेल्ये."

जरी तिचे जीवन हे धोक्यात होते तरी ती मागे वळणार नव्हती. होय, हे त्या देशाच्या रूढीविरुद्ध होते की बोलाविल्यावाचून राजासमोर हजर व्हावे. परंतु राजाने तिच्यासाठी केव्हा पाठविले? तरीही, लोकांचा वध करण्याच्या फर्मानावर सही केली गेली होती, आणि वेळ वेगाने निघून जात होती.

जीवनाकडून तुम्हांला काय मिळवायचे आहे त्यासाठी धैर्य लागते. अनेक लोक आज महान झाले असते जर केवळ त्यांना धैर्य असते की त्यांचा व्यवसाय सुरु करावा जेव्हा देवाने सांगितले होते. त्यांची मने ही वेगवेगळ्या बहाण्यांनी भरलेली होती. "मी जर अपयशी झालो तर मग काय? तेव्हा काय जेव्हा कोणी मला साहाय्य करीत नाही? मी सुरुवात तरी कशी करू? मला अनुभव नाही." सैतानाने त्यांची मने शंका व अनिश्चिततेने भरली होती, आणि उद्देश हा रद्द केला होता.

तुम्हांला असे वाटते काय की राजवाड्यामधील लोकांनी एस्तेरला असे आत्मघाती कृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला नसेल? मला खात्री आहे की तिच्याबरोबरच्या इतर कुमारी स्त्रियांनी तिला अनेक वेळेला याविषयी बोलले असेन, "माझ्या सखी, तू खात्रीशीर आहेस काय की तुला हे करायचे आहे?" "तेव्हा मग काय जर तू त्यातील पहली व्यक्ती म्हणून मरणार असेल? तर मग तुझ्या मृत्यूचा काय उपयोग?" "का नाही थोडा वेळ आणखी वाट पाहावी?" "ठीक आहे, जाण्याऐवजी, कदाचित तू राजाला एक पत्र पाठिव." "का नाही आजारी असल्याचे सोंग घ्यावे, कदाचित राजा मग येईल?" तरीही, एस्तेरने धाडसी प्रयत्न केले आणि देवावरील तिच्या विश्वासाने, ती व्यक्तीशः गेली आणि राजासमोर उभी राहिली.

त्या धाडसी कार्याचा परिणाम काय झाला? बायबल म्हणते, मग राजाने विचारले, "राणी एस्तेर, काय झाले आहे?" तुझी विनंती काय आहे?" जरी ती अर्ध्या राज्याएवढी असली, तरी ती तुला देण्यात येईल" (एस्तेर ५:३). मारले जाण्याऐवजी, तिने राजाचे लक्ष वेधले. तिचे तोंड देखील न उघडता, राजाने त्याच्या मालमत्तेचे अर्धे तिला देण्याची शपथ घेतली जसे काही तो तिच्यासाठी अगोदरच वाट पाहत होता.

सलाम मित्रांनो, धैर्यवान व्हा. आजच पुढची वाटचाल करा. फोन करा. अर्ज पाठवा. व्यवसाय सुरु करा आणि हे पाहा की देव ते तुमच्या हातून घेईल. हे देखील लक्षात घ्या की तो "तिसरा दिवस" होता जेव्हा एस्तेर राजापुढे गेली होती. हे सर्व काही तिसऱ्या दिवशी! येशू, मृत्युच्या ठिकाणी जाऊन, त्यास देखील जीवन व कृपा तिसऱ्या दिवशी मान्य केली गेली, ज्याने मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठया घटनेकडे नेले-पुनरुत्थान!

राजाकडून कृपा प्राप्त केल्यावर, जेव्हा सुवर्णदंड तिच्याकडे करण्यात आला होता, तेव्हा एस्तेरला राजाकडून एक कोरा चेक देण्यात आला होता की जे काही तिला आवडेल ते तिने मागावे! वाह! तुम्ही काय मागाल?

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की तूं मला धैर्याचा आत्मा दे. मी प्रार्थना करतो की तूं माझे हृद्य धैर्याने भरून टाक. मजमधून भीति व शंका काढून टाक आणि मला साहाय्य कर की तुझ्यामध्ये मी विश्वासाने चालावे. मी फर्मान काढतो की येथून पुढे मला काहीही थांबविणार नाही. येशूच्या नावाने. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● मी प्रयत्न सोडणार नाही
● विश्वासात स्थिर उभे राहावे
● अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-1
● परमेश्वराला महिमा कसा दयावा
● माझ्या दिव्याला पेटव परमेश्वरा
● संयम आत्मसात करणे
● जीवन हे रक्तात आहे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन