english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
डेली मन्ना

मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा

Tuesday, 31st of January 2023
35 27 331
Categories : प्रार्थना मित्रतेची
प्रभु येशूने म्हटले, "जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे" (योहान १६:३३). प्रभूला ठाऊक होते की या जगातील जीवन हे तितके सोपे नसणार, आणि म्हणून त्याच्या दयेमध्यें, त्याने आपल्याला साहाय्य-पद्धती पुरविली आहे जे आपल्याला आपल्या प्रवासात साहाय्य करील व समाधान देईल. देवाने-दिलेल्या साहाय्य-पद्धतींपेक्षा एक जी आपल्यासाठी उपलब्ध आहे ती धार्मिक मित्रे आहेत.

जीवनात तुम्ही जी मित्रे ठेवता त्यांच्याबद्दल हेतुपूर्वक असणे हे खूप महत्वाचे आहे. हे असे होत नाही की प्रत्येक समूह ज्यांच्याबरोबर तुम्ही सहज मनमोकळे राहिलेच पाहिजे. हेतुपूर्वक असणे हे तुमच्यात त्या इच्छेने येते की त्यांच्याबरोबर मित्रता ठेवावी जे तुमचा आवेश, ध्येय किंवा स्वप्न इत्यादींसह एकमतात असतील. नाहीतर कदाचित ज्या प्रकारच्या लोकांसभोवती तुम्ही राहत आहात त्यामुळे तुम्हांला दु:ख होईल. आणि, अर्थातच, देवाला तुम्हाला दु:खी पाहण्याची इच्छा नाही, कारण त्यास त्याच्या लेकरांसाठी नेहमीच उत्तम असावे हीच इच्छा आहे.

देवाच्या एका महान स्त्रीने एकदा म्हटले, "सर्व काही शक्य आहे जेव्हा तुमच्या भोवती योग्य लोक उपस्थित आहेत."

एस्तेरच्या पुस्तकातील हामानाचा वृत्तांत आपल्याला बरेच काही सांगतो. हामान हा यहूद्यांचा शत्रू होता आणि त्यांना मारून टाकावे म्हणून योजना आखीत होता. तो मर्दखयाचा तिरस्कार करीत होता, कारण तो एक यहूदी होता ज्यास इतर यहूद्यांबरोबर बंदिवासात आणलेले होते. हामानाला राजाच्या मेजवानीला आमंत्रित केले होते आणि त्याने त्याविषयी त्याची पत्नी व मित्रांना सांगितले. इतरांबद्दल वाईट बोलत असताना त्याने मर्दखयाबद्दल देखील उल्लेख केला. तुम्हांला ठाऊक आहे काय की त्याची पत्नी व मित्रांनी त्यास काय सल्ला दिला?

एस्तेर ५:१४ आपल्याला सांगते की, "तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्यास म्हणाले, पन्नास हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजास विनंती कर की मर्दखयास त्यावर फाशी दयावे; मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा. ही गोष्ट हामानास पसंत वाटून त्याने फाशीचा खांब तयार करविला."

केवळ याची कल्पना करा की जर हामानाला धार्मिक मित्र असते; तर असे निर्दयी शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले असते काय? बायबल आपल्याला इशारा देते, "फसू नका; वाईट संगती चांगल्या चरित्राला बिघडवून टाकिते." (१ करिंथ. १५:३३)

देवाबरोबरच्या तुमच्या चालण्यामध्ये, धार्मिक मित्र ठेवणे यावर अधिक जोर दिला जाऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हांला फारच निराश व हताश असे वाटते, तुम्हांला कोणीतरी आहे काय ज्यास तुम्ही फोन करू शकता की तुमच्याबरोबर प्रार्थना करावी? जोपर्यंत तुम्ही प्रत्येकांबरोबर प्रेम व हसणे व विनोद करू शकता, हे समजा की तुम्हांला कोणाची तरी गरज आहे, कोणी लोक, की उघडपणे विचारविमर्श करावा व तुमचे विचार मांडावे. नीतिसूत्रे २७:९ म्हणते की, "तेल व सुगंधी द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणाऱ्या मित्राचे माधुर्य होय."

हिशेबाखातर, तुम्हांला धार्मिक मित्रांची गरज आहे. तुम्हांला याची इच्छा होईल की कोणीतरी देवाच्या वचनाच्या दृष्टीकोनातून तुमची कृत्ये प्रामाणिकपणाने व पूर्णतः तपासावी. जेव्हा सत्य कटू असे दिसते, तेव्हा प्रेमाने बोलण्याद्वारे कोणीतरी ते तुम्हाला बोलून दाखवावे असे तुम्हाला वाटेल. तुम्हांला चांगला सल्ला व उपदेशाची गरज आहे जे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करील. जर हनन्याच्या पत्नीने चांगला सल्ला दिला असता तर हे अगदी शक्य आहे की हनन्याने आपला विचार बदलला असता आणि जमीन विक्रीपासून मिळालेल्या रकमेच्या बाबतीत खोटे बोलला नसता. परंतु दोघांनीही संगनमत केले ते करण्यास जे वाईट होते. 

म्हणून, जेव्हा जीवनाच्या मार्गात चालत आहात, तुम्हांला त्या आत्म्याने-भरलेल्या मित्रत्वाची गरज लागेल जे तुम्हांला पुन्हा योग्य मार्गावर आणेल आणि तुम्हाला त्याच मार्गावर सतत ठेवेल
प्रार्थना
पित्या, मी तुझे आभार मानतो की तूं नेहमीच माझे ऐकतो. मी प्रार्थना करतो की धार्मिक मित्रे सतत मला मिळावीत. मी ही देखील विनंती करतो की माझ्या मार्गावर ते लोक यावेत जे तुझ्या मार्गानुसार चालत आहेत. येशूच्या सर्वशक्तिमान नावाने. आमेन.


Most Read
● तुमच्या प्रार्थनेच्या जीवनास प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहारिक पायऱ्या
● दैवी शांति मध्ये प्रवेश कसा मिळवावा?
● वराला भेटण्यास तयार राहा
● परमेश्वराला विचारणे (चौकशी करणे)
● दुसरे अहाब होऊ नका
● आश्वासित देशामध्ये बालेकिल्ल्यांना हाताळणे
● स्वप्नेनष्ट करणारे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 22 26657788
+91 22 26657799
व्हाट्स एप: +91 22 26657788
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2023 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन