"कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही; कारण त्यांचा ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही." (इब्री लोकांस पत्र ४:२)
अविश्वास ही भिंत आहे जे आपल्या आध्यात्मिक वाढीला अडथळा करू शकते आणि आपल्याला देवाच्या आशीर्वादाची परिपूर्णता अनुभविण्यापासून रोखू शकते. स्तोत्र ७८:४१ म्हणते, "पुन्हा पुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले." दुसऱ्या शब्दात, जितका शक्तिशाली परमेश्वर आहे, आणि आपल्याला आशीर्वाद देण्याची इच्छा आहे, तितके आपण आपल्या जीवनात त्याचा हात व शक्तीला मर्यादित करू शकतो. कसे? अविश्वासाद्वारे.
जेव्हा आपण देवाच्या आश्वासनांवर शंका करतो, तेव्हा तो आपल्या जीवनात काय करू शकतो त्यास मर्यादित करतो. आपण शंका व प्रश्नांची भिंत बनवितो जी मोडणे कठीण होऊ शकते. इब्री ११:६ मध्ये, बायबल म्हणते, "आणि विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे." दुसऱ्या शब्दात, परमेश्वर आणि त्याच्या वचनात विश्वास ठेवल्यावाचून, आपण आपल्या जीवनात त्याचा हात आणि प्रकटीकरणास मर्यादित करतो.
लोक दैवी लाभ व पुरवठ्याचा आनंद घेऊ शकले नाही कारण त्यांच्यात विश्वासाचा अभाव होता. अविश्वासाद्वारे त्यांचा शेवट झाला होता. मत्तय ९:२९-३० मध्ये बायबल एका वृत्तांताची नोंद करते, "तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांस स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांस प्राप्त होवो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. हे पुरुष येशूच्या मागे आले होते की बरे व्हावे; उघडच आहे की ते आंधळे होते. तर मग, येशू सरळपणे त्यांना का बरे करीत नाही? नाहीतरी, तो सर्वशक्तिमान आहे. परंतु त्याने म्हटले तुमचे बरे होणे तुमच्या विश्वासावर आधारित आहे. केवळ याची कल्पना करा की या लोकांनी एकच डोळा उघडण्यासाठी विश्वास ठेवला असता. तर उघडपणे, हीच त्यांची सत्यता झाली असती. म्हणजे, अविश्वासामुळे तुमच्या जीवनात देवाचा आशीर्वाद किती मर्यादित आहे याची तुम्ही कल्पना करू शकता.
देव त्याच्या मार्गाचा कोणावर दबाव आणीत नाही, परंतु आपण सर्व जण विश्वासाद्वारे देवाच्या नवीन परिमाणामध्ये पाऊल ठेवतो. सुवार्ता ही आहे की देवाच्या कृपे द्वारे, ते केले जाऊ शकते.
#१. अविश्वासाची भिंत मोडून टाकण्याचा एक सर्वात सामर्थ्यशाली मार्ग हा देवाच्या वचनावर मनन करणे आहे. रोम. १०:१७ मध्ये बायबल म्हणते, "ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते." देवाच्या वचनाचे परिश्रमपूर्वक अध्ययन करण्याद्वारे आपला विश्वास मजबूत करण्याची आपल्याकडे जबाबदारी आहे. विश्वासाच्या तरवारीद्वारे तुम्ही तुमच्या अविश्वासाची हत्या करता. आणि विश्वास हा देवाच्या वचनावर बनविला जातो.
#२. अविश्वासाची भिंत मोडून टाकण्याचा आणखी एक मार्ग हा प्रार्थनेद्वारे आहे. मार्क ९:२३ मध्ये, येशूने म्हटले, "विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे." जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा आपण देवावर आपल्या विसंबून राहण्यास मानतो, आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये आपला विश्वास व्यक्त करतो. देवाकडे प्रार्थना करणे हे देवाकडे युद्ध सोपविणे आहे म्हणजे त्याचा सर्वशक्तिमान हात आपल्याला त्यात यशस्वी करील.
#३. आत्म्यामध्ये प्रार्थना करणे हा आणखी एक मार्ग आहे की तुमच्या विश्वासाला वाढवावे. यहूदा २० मध्ये बायबल म्हणते, "प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा." जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालविता तेव्हा तुमचा विश्वास हा वाढतो.
#४. परिपक्व आत्म्याने भरलेल्या ख्रिस्ती लोकांच्या सान्निध्यात राहण्याद्वारे आपण अविश्वासाच्या भिंतीला मोडू शकतो. इब्री. १०:२४-२५ म्हणते, "आणि प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा." कोणाच्या संगतीत तुम्ही राहता? तुमचे सर्वात जवळचे मित्र कोण आहेत? तुम्ही कोण होता त्यासाठी तुमचे साथीदार महत्वाचे आहेत. म्हणून, धार्मिक लोकांसोबत राहा. चर्च उपासनेस नेहमी हजर राहा आणि तुमच्यामध्ये विश्वासाची ज्योत जागृत ठेवा.
अविश्वासाची भिंत मोडण्यासाठी आपल्या वतीने विचारपूर्वक प्रयत्नांची गरज लागते.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तुझ्या वचनाच्या सत्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की माझ्या आयुष्यात तुझे अनुसरण करावे आणि तुझ्याशी बिलगून राहावे म्हणून मला साहाय्य कर. तुझ्या वचनाचे नेहमीच अध्ययन करण्यासाठी मी तुझ्या कृपेसाठी प्रार्थना करतो म्हणजे मी तुझ्यावर माझा विश्वास मजबूत करावा. मी माझे हृद्य उघडतो म्हणजे तुझ्या वचनाचे सत्य माझ्या आत्म्यात खोलवर जावे. मी प्रार्थना करतो की येथूनपुढे माझा विश्वास असफल होणार नाही. माझ्या जीवनातील अविश्वासाची प्रत्येक भिंत ही आज मोडली आहे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका● महान पुरुष व स्त्रिया पतन का पावतात - ५
● राजवाड्याच्या मागील माणूस
● प्रभू येशू : शांतीचा स्त्रोत
● देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
● तुमचे तारण झालेच्या दिवसाचा उत्सव करा
● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #2
टिप्पण्या