"लोटाच्या पत्नीचे स्मरण करा." या पिढीतील ख्रिस्ताच्या शरीराकरिता प्रभु वापरत असलेला हा दिवा आहे. आपल्याला याचे स्मरण केले पाहिजे की लोटाच्या पत्नीचे काय झाले; ती तेथून निघण्यास तयार नव्हती. तिचे अंत:करण हे या जीवनातील गोष्टींबरोबर आणि विध्वंस होणाऱ्या नगराकडे जडलेले होते, आणि ती तेथून निघण्यास तयार नव्हती. जसे प्रभु म्हणतो, "जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही." (लूक ९:६२)
जेव्हा आमची अंत:करणे द्विधा मनस्थितीत आणि विनाश होणाऱ्या नगराच्या गोष्टींमध्ये अडकलेली असतात, तेव्हा आपण लोटाच्या पत्नीविषयी दिलेल्या चेतावणीकडे लक्ष दिले पाहिजे. लोटाची पत्नी ख्रिस्ती होती, परंतु केवळ तेवढीच. आपण या जगाच्या गोष्टींना मागे टाकण्यासाठी तयार असले पाहिजे आणि प्रभूला पूर्ण मनापासून समर्पण करून अनुसरण करावे. जसे प्रेषित पौलाने लिहिले, "ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम" (फिलिप्पै. ३:१४).
आपल्या स्वतःच्या जीवनात, आपण देखील, या जगाच्या गोष्टींबरोबर जडून राहू शकतो. आपण आपल्या अंत:करणाला द्विधा मनस्थितीत जाऊ देऊ शकतो, देव व जग या दोन्हींची सेवा करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु जसे येशूने चेतावणी दिली आहे की, "आपण जग व देव या दोघांची सेवा करू शकत नाही" (मत्तय ६:२४). मागे न पाहता, पूर्ण अंत:करणाने त्याचे अनुसरण करण्यास आपण निवडले पाहिजे.
एक स्त्री जिचे नाव मारीया (नाव बदलले आहे) होते जी एका गरीब कुटुंबात वाढली होती आणि नेहमी स्वप्न पाहिले होते की एक यशस्वी व्यवसायिक स्त्री व्हावे आणि तिच्या कुटुंबाला उत्तम असे जीवन पुरवावे. अनेक अडथळे आणि अयशस्वी झालेली असताना देखील मारीयाने करुणा सदन सेवाकार्यात प्रभूची सेवा केली होती. घरगुती हस्तकला, लोणचे आणि सुके मासे विकण्याचा व्यवसाय तिने सुरु केला.
जसे मारीयाचा व्यवसाय वाढू लागला, तिला उपासनेला येण्यास कमी वेळ मिळत असे किंवा प्रभूची सेवा करण्यास तिच्याकडे कमी वेळ होता. तिच्या नवीन यशासह या जगाचे लोभ आणि सुखविलास आले होते. देवाची इच्छा पूर्ण करण्याऐवजी मारीया आता तिच्या आरामदायकपणा व सुखविलासावर अधिक लक्ष देत होती.
एके दिवशी मारीयाने करुणा सदनचा टेलीव्हिजन प्रसारणातील एक संदेश ऐकला, जेथे लोटाच्या पत्नीची कथा आणि या जगाच्या गोष्टींशी जुळण्याच्या धोक्याबद्दल सांगितले होते. पवित्र आत्म्याने तिला दोषी असे वाटले आणि तिने ओळखले की ती लोटाच्या पत्नीसारखी झाली आहे, या जगाच्या गोष्टींकडे पाहू लागणे आणि त्यामध्ये अडकून राहणे.
आज, मारीया, एका विशेष राज्यात देवाची सेवा करीत आहे. तीचा व्यवसाय तरीही सुरु आहे, परंतु तिच्या व्यवसायाचा लाभ ती तिच्या गावातील अनेक तरुण लोकांना शिक्षण साहाय्य आणि नोकरीसाठी प्रशिक्षण देण्यात वापरते.
तिच्या पिढीमध्ये, लोटाच्या पत्नीला देवाची एक अनुयायी असे म्हटले जात होते. ती तीचा पती, एक धार्मिक माणसाबरोबर जगली होती, परंतु तिने दुहेरी मानक राखले होते. तिचे अंत:करण हे सदोमाच्या सुखविलासकडून कधीही वेगळे झाले नव्हते, ज्याचा तिच्या अंत:करणावर मजबूत पकड होती. जरी तिला ठाऊक होते की नगर हे अग्नि व गंधक द्वारे नष्ट केले जाणार आहे, तरी तिला ती ज्या गोष्टी मागे सोडत होती त्याकडे एकदा तरी पाहावयाचे होते. परिणामस्वरूप, पृथ्वीचे मीठ होण्याऐवजी ती मिठाचा खांब झाली.
प्रार्थना
पित्या, मी प्रार्थना करतो की माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाच्यामध्ये असलेले प्रत्येक अधार्मिक बंधने, आणि दूषित वस्तू आणि घटक हे येशूच्या नावाने मोडले जावोत. मी प्रत्येक व्यक्ति व वस्तूंवर येशूचे रक्त लावीत आहे जे मजशी जुळलेले आहे आणि सर्व वाईटापासून मी तुझे संरक्षण व सुटकेसाठी विनंती करीत आहे. माझ्याप्रती तुझी प्रीति व दयेसाठी मी तुझे आभार मानतो. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● जिवासाठी देवाचे औषध● कर्जामधून बाहेर या: किल्ली# १
● दिवस ०६: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● दिवस २२:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● विश्वासाचे सामर्थ्य
टिप्पण्या