आठवणी ह्या आपल्या जीवनाच्या हिस्स्याचा महत्वाचा भाग आहेत. ते आपल्याला आपल्या चुकांपासून शिकण्यास साहाय्य करतात, आपल्या आशीर्वादांची आठवण देतात, आणि आपल्या भविष्यासाठी एक दिशा पुरवितात. तथापि, सर्व आठवणी ह्या समान अशा बनलेल्या नाहीत. आपल्या सर्वाना चांगल्या आणि वाईट आठवणी आहेत. ज्यावेळेस चांगल्या आठवणी आनंद, सांत्वन आणि आशा आणतात, त्याचवेळेस वाईट आठवणी आपल्याला गांगरून टाकतात, आपल्या घाबरवून सोडतात आणि आपल्या प्रगतीला खुंटवितात.
बायबल आपल्याला शिकविते की वाईट आठवणी आणि आपल्या भूतकाळातील पापाच्या जीवनाने आपल्या स्वभावावर नियंत्रण नाही ठेवले पाहिजे. आपण सर्व जण पापी आहोत, आणि देवाच्या गौरवाला अंतरले आहोत (रोम. ३:२३). पौल सुद्धा, जो ख्रिस्ती धर्मातील एक सर्वात प्रभावशाली व्यक्ति, कधी काळी तार्स येथील कुख्यात शौल होता, ज्याने ख्रिस्ती लोकांचा छळ केला होता आणि स्तेफनाच्या मृत्यूला संमती दिली होती (प्रेषित ८:१). तथापि, त्याच्या परिवर्तनानंतर, पौल एक निराळा मनुष्य होता. त्याने त्याचे जीवन सुवार्ता प्रचार करण्यासाठी समर्पित केले होते, आणि त्याचे लेखन आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे.
परंतु त्यावेळचे काही चर्च पौलाच्या परिवर्तनापासून सावधगिरी बाळगून होते. त्यांना भीति वाटत होती की तो फसवत आहे आणि चर्च मध्ये प्रवेश करण्याची आशा ठेवत आहे आणि भविष्यात अटक करण्यासाठी काही नावे जमवीत आहे. पौलाने त्यांचे विचार ओळखले आणि फिलिप्पै येथील लोकांना लिहिले, "बंधुंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम" (फिलिप्पै ३:१३-१४). दुसऱ्या शब्दात, पौलाला हे ठाऊक होते की वाईट आठवणींना भूतकाळातील कबरेत गाडले पाहिजे आणि त्यांना पुन्हा कधीही उजाळा नाही दिला पाहिजे.
परंतु चांगल्या आठवणींबद्दल काय? आपण त्यांना देखील विसरावयाचे आहे काय? अजिबात नाही! चांगल्या आठवणी ह्या अनमोल खजाना आहेत ज्या आपण हृदयात जतन करून ठेवाव्या आणि आपल्याला विश्वासाला मजबूत करण्यासाठी त्याचा वापर करावा. जेव्हा आपण याची आठवण करतो की देव आपल्यासाठी कसा आला, आमच्या प्रार्थनांना उत्तरे दिली, चमत्कार केला किंवा अनपेक्षितरित्या आपल्याला आशीर्वादित केले, तेव्हा आपल्याला त्याचा चांगुलपणा आणि विश्वासूपणाची आठवण होते.
उदाहरणार्थ, जेव्हा इस्राएली लोकांनी यार्देन नदी ओलांडली आणि आश्वासित देशामध्ये प्रवेश केला, देवाने त्यांना आज्ञा दिली की नदीतून बारा धोंडे घ्यावेत आणि त्यांना व भविष्यातील पिढीला त्याच्या चमत्कारिक पुरवठ्याची आठवण राहण्यासाठी एक स्मारक बनवावे (यहोशवां ४:१-९). त्याचप्रमाणे, नवीन करारात, येशूने त्याचा मृत्यू व पुनरुत्थानाचे स्मरण करण्यासाठी प्रभुभोजनाची स्थापना केली (लूक २२:१९-२०). ह्या दोन्ही आठवणींनी देवाचे सामर्थ्य, प्रीति आणि विश्वसनीयतेचे मूर्त स्मरण म्हणून कार्य केले.
म्हणून, मग चांगल्या आठवणींना आपल्या विश्वासाला मजबूत करण्यास व जीवनात पुढे वाटचाल करण्यासाठी आपण कसा वापर करू शकतो? येथे काही सुचना आहेत:
१. आठवण ठेवा आणि धन्यवाद दया:
तुमच्या भूतकाळातील चांगल्या आठवणींवर विचार करण्यासाठी वेळ काढा आणि देवाला त्याचा आशीर्वाद, पुरवठा आणि संरक्षणासाठी धन्यवाद दया. कृतज्ञता हे भय, चिंता आणि निराशेसाठी एक शक्तिशाली प्रतिबंधक आहे. मोशेने देवाच्या लोकांना आठवण दिली, ज्यांचे त्याने चाळीस वर्षे मार्गदर्शन केले, हे म्हणत, "मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती दयावी" (अनुवाद ४:९).
२. तुमची साक्ष सांगा:
तुमची कथा इतरांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊ शकते जे कदाचित सारख्याच संघर्षातून जात असतील. देवाने तुमच्या जीवनात कसे कार्य केले आहे त्याविषयी सांगण्यास घाबरू नका.
३. स्मारक बनवा:
इस्राएली लोकांनी जसे केले तसे भौतिक स्मारक तुम्हाला बनविण्याची गरज नाही परंतु देवाच्या चांगुलपणाचे दृश्य स्मरण तुम्ही बनवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या प्रार्थना आणि त्यांना मिळालेली उत्तरे लिहून ठेवू शकता, स्मरणीय क्षणांची एक वही बनवावी, किंवा गीतांची यादी बनवा जे तुम्हांला देवाच्या प्रीतीची आठवण देतात.
४. देवाच्या विश्वासूपणात भरवसा ठेवा:
चांगल्या आठवणी आपल्याला स्मरण करून देतात की देव विश्वसनीय आहे आणि आपल्या गरजा पुरविण्यासाठी, आपल्या निर्णयामध्ये आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी, आणि आपल्याला भविष्यासाठी आशा देण्यासाठी आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकतो. जेव्हा आपण नवीन आव्हाहनांना सामोरे जातो, तेव्हा आपण त्या आठवणी स्मरण करू शकतो की आपला विश्वास मजबूत करावा आणि देवावर भरवसा ठेवावा. "मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन" (स्तोत्र ७७:११).
हे विसरू नका की वाईट आठवणी ह्या भूतकाळात गाडून टाकल्या पाहिजेत, परंतु चांगल्या आठवणींना जतन करू ठेवले पाहिजे आणि आपल्या विश्वासाला बळकट करण्यासाठी त्याचा वापर करावा. चला आपण पौलाचे शब्द आठवू या आणि देवाच्या विश्वासात कृतज्ञता आणि भरवशासह आपल्या पाचारणाच्या ध्येयाकडे धाव घेत राहू या.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, सर्व चांगल्या आठवणींसाठी तुझे आभार. या आठवणींना हृदयात जतन करून ठेवण्यास आणि आमच्या विश्वासाला बळकट करण्यास व तुझ्यावर भरवसा ठेवण्यास त्याचा वापर करण्यास आम्हांस साहाय्य कर. कृपा करून प्रत्येक वाईट आठवणी काढून टाक. आमच्या पाचारणाच्या दिशेने पुढे वाटचाल करताना आम्हांला मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आपल्या निवडींचा प्रभाव● चांगल्या मार्गाचा चौकशी करा
● सर्वसामान्य भीती
● परमेश्वरा मध्ये स्वतःला कसे प्रोत्साहित करावे
● प्रतिदिवशीज्ञानीहोत कसे वाढावे?
● ईश्वरीय शिस्तबद्धतेचे स्वरूप-१
● दिवस २४:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या