"मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवण्यास जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचित सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही." (मत्तय २४:१-२)
प्रभु येशूची यरुशलेम मधील मंदिराच्या उध्वस्त होण्याची भविष्यवाणी (मत्तय २४:१-२) ही एक परिवर्तनीय बदलास चिन्हित करते की ख्रिस्ती लोक कसे देवाच्या उपस्थितीचा अनुभव करतील. ते आतापासून भौतिक इमारती पुरतेच मर्यादित राहणार नाही, दैवी उपस्थिती आता, आपल्या प्रत्येकांमध्ये निवास करते, जे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला "चालणारे मंदिर" बनविते.
चालणारे मंदिर म्हणून, ख्रिस्ती लोक जेथे कोठे जातात तेथे ते देवाची उपस्थिती घेऊन चालतात, प्रत्येक भेट व अनुभवास एका संधी मध्ये परिवर्तीत करतात की देवाची प्रीति सांगावी व पसरवावी.
ज्याप्रमाणे यरुशलेम येथील मंदिरात तीन विभिन्न भाग होते-बाह्य आंगण, आतील आंगण आणि परम पवित्र स्थान- बायबल प्रकट करते की आपण देखील शरीर, प्राण व आत्मा द्वारे बनविलेले आहोत (१ थेस्सलनीका ५:२३). या रचनेस गहन प्रतीकात्मक अर्थ आहे, कारण आपल्या अस्तित्वाचे प्रत्येक घटक हे मंदिराच्या विशेष भागास प्रदर्शित करते.
शरीर- बाह्य आंगण: भौतिक शरीर हे मंदिराच्या बाह्य आंगणासारखे आहे, जे सर्वाना दिसते. आपली शरीरे ही पात्र आहेत ज्याद्वारे आपण जगाशी संवाद साधतो आणि आपली दैनंदिन कार्ये करतो.
प्राण- आतील आंगण: आपले प्राण, ज्यामध्ये आपले विचार, भावना, तर्कवितर्क करण्याची क्षमता असते, ते मंदिराच्या आंतील आंगणाला प्रतिबिंबित करते. ज्याप्रमाणे सात शाखा असलेला दीपवृक्ष आतील आंगणास प्रज्वलित करीत होता, आपला प्राण हा आतील प्रकाशाचे स्थान आहे, जे आपल्या जीवनात मार्गदर्शन आणि दिशा दाखवते.
आत्मा-परम पवित्र स्थान: मानवी आत्मा हा परम पवित्र स्थानाचे प्रतिबिंब आहे, पवित्र स्थान, जेथे देवाचा आत्मा मंदिरात वास करतो. चालणारे मंदिर म्हणून, आपला आत्मा हा जेथे आपण दैवी उपस्थितीचा अनुभव करतो आणि त्याकडून आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करतो.
आपले शरीर, प्राण व आत्म्याची दैवी रचना ओळखून, आपण आपल्या आध्यात्मिक वाढीला प्राधान्य दिले पाहिजे आणि देवाबरोबरच्या आपल्या संबंधाला अधिक गहन गेले पाहिजे. असे करण्यासाठी शिस्तबद्ध प्रार्थनामय जीवन आणि देवाच्या वचनावर दररोज मनन करणे गरजेचे आहे, जे आपल्या आत्म्याला सुदृढ करते आणि आपल्या मधील त्याच्या दैवी उपस्थितीशी जुळवून घेण्यास साहाय्य करते.
एक जुने दीपगृह होते जे अनेक वर्षे जहाजांना धोकादायक समुद्रावरून दिशा देत असे. हा दीपगृह रक्षक फारच उग्र होता, उग्र भाषेत, नेहमीच भांडण करण्यास तयार असे.
एके दिवशी, शक्तिशाली वादळाने त्या दीपगृहाचे नुकसान केले, तेथील काचा मोडल्या आणि दिवा विझला होता. दीपगृह रक्षकाला ठाऊक होते की प्रकाशावाचून, जहाजे ही मोठया धोक्यात जातील. दिवसरात्र त्याने खूप परिश्रम केले, की नुकसान दुरुस्त करावे आणि प्रकाश पुन्हा एकदा पुनर्स्थापित करावा.
त्याच्या अति परिश्रमाच्यावेळी, दीपगृहाच्या रक्षकाला त्या घराच्या कोपऱ्यात धुळीने भरलेले, जुने बायबल मिळाले. त्याच्या विश्राम करण्याची वेळ घालविण्यासाठी, तो त्या वेळेत बायबल वाचू लागला. वचनाने त्याच्या अंत:करणास स्पर्श केला आणि त्या पानात वर्णन केलेल्या दैवी उपस्थितीशी त्यास गहन संबंधाचा अनुभव आला.
जसे दिवस जात होते, तो दीपगृहाचा रक्षक सतत बायबल वाचन व प्रार्थना करीत राहिला, त्यास प्राप्त झालेल्या या नवीन विश्वासाचे पोषण करीत होता. त्याने स्वतःमध्ये सखोल बदल अनुभविला; त्याचा आत्मा अधिकच प्रज्वलित असा दिसत होता, ज्याप्रमाणे दीपगृहाने पूर्वी प्रकाश दिला होता.
जेव्हा दीपगृहाची शेवटी ती दुरुस्ती पूर्ण झाली आणि दीपगृहाचा प्रकाश पुन्हा एकदा पेटविला, तेव्हा त्यास ठाऊक होते की परिवर्तन ज्याचा त्याने अनुभव केला आहे तो केवळ जहाजांना पाण्यातून सुरक्षितपणे मार्ग दाखविणार नाही तर त्याच्या जीवनास देखील मार्गदर्शन करील. त्याचा आत्मा, मंदिरातील परम पवित्र स्थानासारखा, हा त्याच्या दैवी उपस्थितीसाठी निवास असा झाला होता.
जसे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनास वाढवितो, तेव्हा आपण परिवर्तनाचा अनुभव करू शकतो जे आपल्या आत्मिक मनुष्यातून बाहेर प्रज्वलित होते, आपले विचार, भावना व कृत्यांवर प्रभाव करते. ही प्रक्रिया आपणांस ख्रिस्ता-समान अधिक बनविते-आपल्या जीवनात आपल्या तारणाऱ्याची प्रीति, करुणा, आणि कृपेचे मूर्तस्वरूप होते.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, आम्हांमध्ये राहण्यास निवडणे, आणि आम्हांला तुझे चालणारे मंदिर बनविण्यासाठी तुझे आभार. या दैवी संबंधाला महत्वाला समजण्यास आम्हांला साहाय्य कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तीन महत्वाच्या परीक्षा● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
● मान्ना, पाट्या आणि काठी
● तुमची कल्पना वापरा की तुमच्या वचनाला योग्य स्वरूप दयावे
● देवाचे 7 आत्मे: देवाच्या भयाचा आत्मा
● तुम्ही सहज दुखविले जाता काय?
● स्तुति वृद्धि करते
टिप्पण्या