याकोब १:४ म्हणते, "आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू दया, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी." जीवनाच्या वादळांतून, देव आपल्याला एक ब्रँड नवीन सृष्टि म्हणून शुद्ध करीत आहे, जे त्याची प्रीति व कृपेचा करार आहे.
याची पर्वा नाही की आपण कोणत्या परीक्षा आणि संकटांना सामोरे जातो, आपण देवाच्या दृष्टीसमोर आपले खरे मूल्य नाही विसरले पाहिजे. प्रभु येशूने त्याचे मौल्यवान रक्त काहीतरी अयोग्यसाठी वाहिले नाही; त्याने त्याचे जीवन तुमच्या व माझ्यासाठी, जे आपण व्यक्तिगत जे अमर्यादितपणे मूल्यवान आणि प्रेमळ आहोत त्यांच्यासाठी अर्पण केले. जेव्हा आपण जीवनाच्या वादळांतून मार्ग काढत जातो, तेव्हा आपण हे स्मरण ठेवले पाहिजे की आपण उच्च ब्रँड आहोत, ज्यांस अंतिम ब्रँड व्यवस्थापक- स्वतः परमेश्वरा द्वारे काळजी आणि उद्देशासह घडविलेले आहे.
देवाचे आपल्या जीवनात काळजीपूर्वक आणि संयमाने केलेले कार्य हे उल्लेखणीय पेक्षा किंचितही कमी नाही. तो प्रेमळपणे आपल्यातील अशुद्धपणा काढून टाकतो, आणि आपल्याला आपल्या स्वतःच्या उत्तम स्वरुपात शुद्ध करतो. प्रत्येक आव्हाहन ज्यास आपण सामोरे जातो, त्यामध्ये तो आपल्या चारित्र्यास बळकट करतो, आपल्या विश्वासाला दृढ करतो, आणि आपला खरा उद्देश प्रकट करतो.
आपल्या स्वतःला कमी लेखू नका; त्याऐवजी, स्वतःला एकमेव आणि मौल्यवान ब्रँड, जे देवाच्या प्रतिमेनुसार बनविलेले आहे म्हणून पाहा. हे लक्षात ठेवा की आपल्या प्रत्येकाला भयप्रद आणि अद्भुत मार्गाने बनविलेले आहे आणि हे की देवाची आपल्यासाठी प्रीति ही अटळ आहे. तो एक परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक आहे, आणि जेव्हा आपण त्याचे मार्गदर्शन व नेतृत्वामध्ये भरवसा ठेवतो, तेव्हा आपण आत्मविश्वासी होऊ शकतो की तो आपल्याला आपल्या खऱ्या उद्देशाकडे नेईल.
जेव्हा येशूने वादळ शांत केले, तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्या सामर्थ्यावर आश्चर्य व्यक्त केले, हे उद्गारत, "हा आहे तरी कोण?" वारा व समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात" (मार्क ४:४१). ही भीति वादळाने निर्माण केली नाही परंतु शांति जिचा त्यांनी अनुभव केला त्याद्वारे. हा प्रसंग त्या सत्यास प्रकट करतो की प्रत्येक भयावर देवाच्या भया द्वारे विजय मिळविला जाऊ शकतो. काहीही आपल्याला धाडसी बनवीत नाही, जसे केवळ देवाचे भय बनविते. देवाच्या एका माणसाने एकदा म्हटले, "देवाचे भय धर; आणि तुम्हांला इतर कशालादेखील भिण्याची गरज नाही."
जीवनात ज्या प्रत्येक वादळांना आपण सामोरे जातो ते आपल्याला एकमेव संधी देते की देवाचा स्वभाव व सामर्थ्याविषयी गहन समज प्राप्त करावी, जे शेवटी आपल्याला परिवर्तनीय प्रकटीकरणाकडे नेते.
एक प्रकटीकरण जीवनात क्रांती निर्माण करेल. देवाच्या चारित्र्याचे प्रकटीकरण केवळ आपल्या विश्वासाला बळकट करणार नाही परंतु ते आपल्या जीवनात क्रांती देखील निर्माण करते. ते आपल्या दृष्टीकोनास पुन्हा घडविते आणि आव्हाहनांना जसे आपण उत्तर देतो त्या दृष्टीकोनास बदलते.
तुमच्यापैकी काही जण मरणप्राय आजारांना सामोरे गेले आहात, ज्यामध्ये डॉक्टरांनी जगण्यासाठी फारच कमी आशा दाखविली. तरीही, देवाच्या दयेने आणि दैवी हस्तक्षेपाद्वारे, तुम्ही विजयी झालात, आणि लाजरासारखे कबरेमधून बाहेर आलात, जिवंत केले गेले. ह्या अनुभवाने येशू आरोग्य देणारा म्हणून एक गहन प्रकटीकरण तुम्हांला दिले.
आता या प्राप्त केलेल्या नवीन समजसह सज्ज होत, पुढील वेळी जेव्हा तुम्ही कोणाला "ही एक शवपेटी आहे" हे बोलताना भेटता. तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने घोषित करता की, "नाही! येशू हा आरोग्यदाता आहे." हे प्रकटीकरण तुम्हांला विश्वासात ठामपणे उभे राहण्यास आणि देवाची प्रीति, कृपा आणि आरोग्य देणाऱ्या सामर्थ्याचे साक्षीदार म्हणून समर्थ करते.
म्हणून, जेव्हा तुम्ही वादळांतून जाता, तेव्हा प्रकटीकरण जे तुम्ही प्राप्त केले आहे त्याचे स्मरण करा आणि त्यास तुमच्या विश्वासाला दृढ करू दया जसे तुम्ही त्या एकमेव व्यक्तीमध्ये सतत विश्वास ठेवता जो वारा व समुद्राला शांत करतो.
प्रार्थना
पित्या, मी तुझे आभार मानतो की तू मजमध्ये कार्यरत आहे आणि मी तुझ्यामध्ये पूर्ण आहे, कोणत्याची चांगल्या गोष्टींची उणीव नाही. पवित्र आत्म्या, माझ्या स्मरणात आण ते सर्व काही जे तू मला शिकवले आहे की वादळ ज्यास मी सामोरे जात आहे त्यावर विजय मिळवावा. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आध्यात्मिक अभिमानावर मात करण्याचे ४ मार्ग● स्वयं-गौरवाचा सापळा
● एल-शादाय चा परमेश्वर
● प्रारंभीच्या अवस्थेत परमेश्वराचीस्तुति करा
● प्रार्थना कशी करावी जेव्हा तुम्हाला देवापासून दूर आहोत असे वाटते
● उपासने साठी इंधन
● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
टिप्पण्या