आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. (इब्री १२:२)
१९६० मध्येकॅनडा मध्ये दोन महान धावपटू-जॉनी लैंडी व रॉजर बैनिस्टर मध्ये रेस होती. जॉनी लैंडी हा रेस मध्ये नेहमीच पुढे होता आणि संपण्याच्या रेषे साठी तेथे केवळ २०० मीटर राहिले होते. ह्यावेळेस जॉनी लैंडी ने मागे पाहिले हे पाहण्यासाठी की त्याचा प्रतिस्पर्धी कोठपर्यंत आला आहे.
त्याच क्षणी रॉजर बैन्सिस्टर ने त्यास मागे टाकले.
त्याने रेस गमाविली आणि कदाचित इतिहासात अशी नोंद केली जाईल की ज्याने मागे पाहिले. त्याने त्याची धाव धावण्याचाच केवळ विचार केला पाहिजे होता. परंतु त्याने शेवटच्या रेषे पासून त्याची नजर हलविली आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्या कडे पाहिले आणि त्याला रेस गमवावी लागली. सर्व प्रयत्न करा म्हणजे इतिहास हा तुमच्याबरोबर पुन्हा घडणार नाही.
तुम्ही याबाबतीत अवगत आहात काय की तुम्ही एकाच वेळी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही.
ऐम्पलीफाईड फार सुंदररित्या म्हणते. "येशू कडे पाहणे [त्या सर्व गोष्टींकडून जे व्यत्यय आणते], जो आपल्या विश्वासाचा उत्पादक व स्त्रोत आहे......(इब्री १२:२)
येथेकाही लोक आहेत ज्यांनी रेस सोडून दिली आहे कारण इतक्या सर्व वेळेला ते त्यांच्या पुढारी कडे पाहत होते, एक पाळक, एक संदेष्टा, एक प्रेषित वगैरे. मग पुढारी ज्यांच्याकडे ते पाहत होते ते कोठेतरी, कोणत्यातरी वेळी चुकले आणि हे लोक पूर्णपणे दु:खी झाले आहेत. ते त्यांच्या विश्वासाने डगमगले आहेत.
जेव्हा तुम्ही एक पुढारी, पास्टर वगैरे कडून निश्चितच काही शिकू शकता, तो किंवा ती हे कितीही चांगले असले तरी, ते आपले सिद्ध आदर्श नाही आहे. तुम्ही त्यांच्याकडे पाहत नाही आणि तुमची रेस धावत नाही. तुम्हाला येशू कडे पाहावयास पाहिजे. तोच केवळ आपला सिद्ध आदर्श आहे. तो आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा आहे.
आपण त्यासारखे होतो ज्याकडे आपण पाहत असतो. आपण जेव्हा धावतो व आपले लक्ष येशूवर लावतो, परमेश्वर आपल्यावर कार्य करतो, आपल्याला अधिक आणि अधिक त्याच्या पुत्रासारखे करतो. शेवटी, तो आपल्याला ज्याची आपण वाट पाहत आहोत त्या पुरस्काराकडे आणेल.
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या,येशूच्या नांवात,मलारेस पूर्ण करण्यास साहाय्य कर. तुझ्या कृपे साठी माझे जीवनएक साक्ष असे कर.
कुटुंबाचे तारण
पित्या,येशूच्या नांवात,माझ्या कुटुंबाच्या सदस्यांचे डोळे उघड की तुला प्रभु, परमेश्वर व तारणारा असे ओळखावे. त्यांना अंधारातून प्रकाशाकडे वळीव.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या,येशूच्या नांवात, माझ्या हाताच्या कार्याला संपन्न कर. संपन्न होण्याचा अभिषेक माझ्या जीवनावर उतरो.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे स्वास्थ्य, सुटका व चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे राष्ट्रांमध्येउंचाविले व गौरविले जाईल.
पित्या, येशूच्या नांवात, मीकेएसएम च्या प्रत्येक मध्यस्थी करणाऱ्यास येशूच्या रक्ता द्वारे आच्छादित करतो. अधिक मध्यस्थी करणारे निर्माण कर.
देश
पित्या, येशूच्या नांवात,मी प्रार्थना करतो कीभारत देशातील प्रत्येक गाव,शहर, वराज्यातील लोक तुझ्याकडे वळोत. त्यांनीत्यांच्या पापांचा पश्चाताप करावा आणि येशू ख्रिस्ताला त्यांचा प्रभु, परमेश्वर व तारणारा म्हणून स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्तासाठी राजदूत● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
● दिवस २४:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● अपरिवर्तनीय सत्य
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३
● पतनापासून ते मुक्तीपर्यंतचा प्रवास
● स्वैराचाराच्यासामर्थ्यास मोडून काढणे-१
टिप्पण्या