निराशा ही सार्वत्रिक भावना आहे जी प्रत्येक व्यक्तीने, वय, पार्श्वभूमी किंवा आध्यात्मिक श्रद्धा याची पर्वा न करता अनुभवली आहे.
निराशा ही सर्व घडण व आकारात येते
निराशा ही नातेसंबंधांमध्ये घडू शकते जेव्हा अपेक्षांची पूर्ती होत नाही, विश्वासघात होतो, किंवा संपर्क बंद होतो. कधी कधी आपण आपल्या व्यवसायिक जीवनात निराशेला तोंड देतो, जसे उन्नती मिळत नाही किंवा नोकरी गमाविण्यास सामोरे जाणे किंवा हे जाणणे की जीवनाच्या कारकीर्दीचा मार्ग हा परिपूर्ण नाही. अनपेक्षित खर्च, कर्ज किंवा स्थिर उत्पन्नाचे देखील नुकसान होण्यापासून निराशा ही उत्पन्न होऊ शकते. निराशा ही आरोग्याच्या विषयापासून देखील निर्माण होऊ शकते, एकतर आपल्या स्वतःचे आरोग्य किंवा ज्यांवर आपण प्रेम करतो त्यांचे आरोग्य. अशा परिस्थिती ह्या भावनात्मकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या अधिक भार निर्माण करू शकतात.
बायबलमध्ये आपल्याला कथा मिळतात, जसे, सारा ( उत्पत्ति २१:१-३), रिबेका (उत्पत्ति २५:२१), राहेल (उत्पत्ति ३०:२२-२४), आणि हन्ना (१ शमुवेल १:१९-२०). ह्या स्त्रियांनी अनेक वर्षे मुलबाळ नाही म्हणून निराशा अनुभविली होती. संदेष्टा एलीयाने देखील खूप निराशा अनुभवली होती. त्यास इतके निराश वाटले की त्याने देवाला त्याच्या जीवनाचा शेवट करावा म्हणून विनंती केली (१ राजे १९:४).
निराशा वाटणे हे पाप नाही
निराशा वाटणे हे पाप नाही; आपण त्यास कसे हाताळतो हा महत्वाचा विषय आहे. निराशेबरोबर जुळलेल्या भावनांना आपण कसे हाताळतो आणि त्यास कार्यान्वित करतो हे खरोखर महत्वाचे आहे. तुमच्या निराशांना अंतिम असे पाहू नका. निराशा वेदनादायक असू शकते, ते वाढ आणि गहन समजेसाठी देखील संधी म्हणून कार्य करू शकते.
जीवनातील निराशा हाताळणे आणि त्यावर मात करण्यासाठी येथे बायबलमधून काही मार्ग आहेत.
१. केवळ याकारणासाठी की "त्यांना" तुमची गरज नाही, याचा अर्थ हा नाही की येशूने तुमचा त्याग केला आहे.
येशू ख्रिस्तामधील आपले महत्त्व समजणे हे सर्वात महत्वाचे आहे, विशेषतः जेव्हा निराशेला सामोरे जात आहात. नेहमी सर्व समयी, आपण आपल्या विखरलेल्या परिस्थितीची तपासणी करतो आणि त्याचे अतिविश्लेषण करतो, ते मग असा विचार करण्याकडे नेते जसे, "मी निरुपयोगी आहे" किंवा "कदाचित मला निराशेचे जीवन जगायचे आहे." तथापि, असे विचार आपल्याला, आपली खरी क्षमता ओळखण्यापासून रोखतात.
निराशेवर मात करण्यासाठी, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देव आपल्याला कधीही अपयशी होऊ देणार नाही. हे पूर्णपणे स्वाभाविक आहे की निराशा जी आपण अनुभवली आहे त्यावर खेद करावा आणि त्यावर उपाय काढावा, परंतु धैर्य सोडून देणे हा पर्याय नाही. त्याऐवजी, आपण देवाच्या वचनाच्या सामर्थ्याचा उपयोग केला पाहिजे आणि प्रगती करण्यासाठी त्यास एक उत्प्रेरक म्हणून वापरावे.
आणि याबद्दल खात्रीशीर असावे: "युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे." (मत्तय २८:२०)
देवाचे अटळ प्रेम आणि साहाय्य हे आपल्याला जीवनाच्या आव्हानांमधून मार्गदर्शन करू शकते, आणि आपल्या अडथळ्यांना वाढीच्या आणि आत्मशोधाच्या संधीमध्ये रुपांतरीत करते. आपले लक्ष्य निराशेच्या नकारात्मकतेपासून येशू ख्रिस्तामध्ये मिळणारी आशा आणि सामर्थ्याकडे नेण्याद्वारे, आपण आपले भय व संशयावर प्रभुत्व मिळवू शकतो, ते मग शेवटी आपल्याला अधिक परिपूर्ण आणि उद्देश-प्रेरित जीवनाकडे नेते.
२. निराशा ही तुमच्या जीवनात बदल घडवून आणणारी होऊ शकते
निराशा ही तुमच्या जीवनात बदल घडवून आणणारी होऊ शकते जेव्हा देव तुमची कथा त्याच्या गौरवाकरिता वापरतो. अनेक जण उध्वस्त झालेल्या जीवनापासून संपन्न झालेले आहेत या साक्षीने ज्याने जगावर छाप पडली आणि प्रभाव केला आहे.
योसेफाने त्याच्या स्वतःच्या भावांना सांगितले ज्यांनी त्यास निराश केले होते, "तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते." (उत्पत्ति ५०:२०)
३. तुमची निराशा ओळखा आणि येशूबरोबर भेट घ्या
"भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो." (स्तोत्र. १४७:३)
हे महत्वाचे आहे की तुम्ही तुमच्या निराशेच्या दुखापतींना उघड्या जखमा होऊ देऊ नका. हे महत्वाचे आहे की आपण आपल्या निराशा स्वीकाराव्या आणि महान वैद्य, येशू ख्रिस्ताच्या समाधान देणाऱ्या उपस्थितीत आराम शोधावा. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जीवनाच्या आव्हानांमधून त्याच्या मार्गदर्शनाशिवाय एकटेच मार्ग काढत राहणे, हे एक व्यर्थ प्रयत्न आहे, जे आपल्याला त्याहूनही अधिक अपमानित आणि निराश करून ठेवेल.
निराशेमध्ये जेव्हा आपण येशूकडे वळतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःला त्याच्या आरोग्यदायी स्पर्शासाठी तयार करतो, आपण त्यास आपले भग्न हृदय बरे करणे आणि आपल्या आत्म्यास पुनर्स्थापित करू देतो. त्याच्या उपस्थितीला आत्मसात करून, आपण हे स्वीकारतो की आपण एकटेच जगू शकत नाही, कारण हे केवळ त्याच्या साहाय्याद्वारेच आपण खरी प्रगती करू शकतो.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, मी नम्रपणे तुजसमोर येतो, हे जाणून की माझ्या कल्याणासाठी तुझ्याकडे योजना आहेत, आणि मला आशा आणि भविष्य देणाऱ्या योजना आहेत. अटळ विश्वासाने मला जीवनाच्या निराशेंमधून मार्ग काढण्यासाठी साहाय्य कर, हे जाणून की तू नेहमीच मजबरोबर आहेस. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वास, आशा आणि प्रीति● प्रार्थने मध्ये अडथळ्यांवर कशी मात करावी
● दिवस ०७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● पवित्रतेचे दुहेरी पैलू
● तुमच्या रांगेतच राहा
● दु:खा पासून कृपे कडे जाणे
● ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे
टिप्पण्या