डेली मन्ना
ख्रिस्ती लोक देवदूतांना आज्ञा देऊ शकतात का?
Thursday, 27th of April 2023
31
20
953
Categories :
देवदूत
नुकतेच, देवदूतांच्या क्षेत्रामध्ये अधिक रुची होती. मी असंख्य लेख पाहिले (प्रसिद्ध व्यक्तींकडून देखील), हा दावा करीत की ख्रिस्ती लोक देवदूतांना आज्ञा देऊ शकतात आणि त्यांना सांगू शकतात की त्यांना काय हवे आहे ते करावे.
देवाचे वचन हाच आपला एकमेव अधिकार आहे, म्हणून वचन काय म्हणते ते आपण पाहू या:
१. देवदूत हे देवाचे सेवक आहेत, आपले नाहीत.
अनेक लोक असे प्रार्थना करताना मी ऐकले आहे, "हे आशीर्वादित आद्यदेवदूता गब्रीएल माझ्यासाठी मध्यस्थी कर. मीखाएल स्वर्गीय सेनेच्या राजकुमारा, मी तुला आज्ञा देत आहे की त्या शक्तीला नष्ट कर.
देवदूत हे देवाचे सेवक आहेत, आपले नाहीत. ते त्याच्या आज्ञेने येतात आणि जातात. ते त्याचा शब्द, त्याच्या वाणीला उत्तर देतात, आणि आपला सरळ आदेश किंवा विनंतीला नाही. पुढील वचनांकडे पाहा, आणि मी जे बोलत आहे ते अधिक अर्थपूर्ण होईल.
"अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा." (स्तोत्र १०३: २०-२१)
स्तोत्र ९१:११ या वचनाकडे पाहा,
"कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल."
या वाक्याकडे लक्ष द्या: " तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल"
त्याच्या दिव्यदूतांना आपल्या रक्षणासाठी देणे हे पित्याजवळ येशूच्या नावाने केलेल्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून आहे.
जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीवर चालला, त्याने हे मानले की देवदूत हे त्याच्या पित्याच्या अधिकारात आहेत.
"तेव्हा येशू त्याला म्हणाला, "तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?" (मत्तय २६:५२-५३)
१ पेत्र ३:२२ म्हणते पुनरुत्थानानंतर, "...त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत."
"....येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे, असा आहे. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत." (१पेत्र ३:२१-२२)
आणि हा तो प्रभू येशू आहे तोच केवळ देवदूतांना आज्ञा देतो की आपल्याला मदत करावी.
"ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?" (इब्री. १:१४)
तर तुम्ही पाहा, हे देवदूत अवश्य आपली सेवा करतात, पण ते केवळ प्रभूचा आध्यात्मिक आदेश पाळतात.
अंगीकार
१. जसे आपल्यातील बहुतेकांना ठाऊक आहे की आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच, ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा देखील या प्रार्थना मुद्द्यांचा उपयोग करा.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
माझ्या खांद्यावरील प्रत्येक भार व माझ्या मानेवरील प्रत्येक जू काढून टाकले जाईल, आणि अभिषेकामुळे जू नष्ट केले जाईल. वचनाच्या आकलनात मी वाढेन. (यशया १०:२७)
कुटुंबाचे तारण
माझा वारसा हा कायमचा असेल. विपत्काली मी लज्जित होणार नाही: आणि दुष्काळाच्या दिवसांत, मी आणि माझ्या कुटुंबाचे आध्यात्मिक व आर्थिकदृष्ट्या समाधान करण्यात येईल. (स्तोत्र ३७:१८-१९)
आर्थिक प्रगती
माझा देव आपल्या संपत्यनुरूप माझी सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील." (फिलिप्पै. ४:१९). मी व माझ्या कुटुंबाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव भासणार नाही. येशूच्या नावाने.
केएसएम चर्च
पित्या, तुझे वचन म्हणते की तू तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा देशील की आमच्या मार्गात आम्हांला सांभाळावे आणि आमचे रक्षण करावे. येशूच्या नावाने, तुझ्या पवित्र देवदूतांना पास्टर मायकल, त्यांचे कुटुंब, संघ सदस्य आणि करुणा सदन सेवाकार्याशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे पाठिव. त्यांच्या विरोधातील अंधाराच्या प्रत्येक कार्यास नष्ट कर.
राष्ट्र
पित्या, तुझी शांती आणि धार्मिकता आमच्या राष्ट्रात भरू दे. आमच्या राष्ट्राच्या विरोधातील अंधाऱ्या व विध्वंसकारक शक्ती नष्ट होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता भारताच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात पसरू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वेळेवर आज्ञापालन करणे● येशू स्वर्गात काय करीत आहे
● विश्वासाचे बरे करणारे सामर्थ्य
● एक मृत व्यक्तिजिवंत व्यक्तींसाठी प्रार्थना करीत आहे
● तुमची सुटका आणि स्वास्थ्याचा उद्देश
● दिवस १२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● अन्य भाषा जी देवाची भाषा
टिप्पण्या