जवळ या, म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. (याकोब ४:८)
येथे एक अद्भुत आमंत्रण व गौरवी आश्वासन दिले आहे.
१. एक आमंत्रण- परमेश्वरा जवळ या
२. आश्वासन – जेव्हा तुम्ही परमेश्वरा जवळ येता, तो आश्वासन देतो की तो तुम्हांजवळ येईल.
इब्री९:१-९ आपल्याला सांगते की, मंदिरामध्ये पडद्याद्वारे परमपवित्र स्थान हे वेगळे केले गेले होते. हे दर्शविते की मनुष्य हा परमेश्वरा पासून पाप द्वारे वेगळा केला गेला होता. केवळ मुख्य याजकास वर्षातून एकदा परवानगी होती कीह्या पडद्यामागे जावे की सर्व इस्राएल साठी देवाच्या सानिद्ध्यात प्रवेश करावा आणि त्यांच्या पापांसाठी प्रायश्चित्त करावे.
परंतु प्रभु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर त्याचे रक्त वाहिल्यावर, काहीतरी अद्भुत घडले, हा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. आता हे दर्शविते की परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग हा सर्वांसाठी, सर्वकाळ साठी, यहूदी व परराष्ट्रीय या दोघांसाठी उघडा झाला आहे.
माझ्या जीवनात अशी वेळ होती जेव्हा देवाजवळ जाण्याचे मत रहस्यमय आणि वेगळेच दिसत होते, जे केवळ थोडया निवडकांसाठी राखीव असे होते. तथापि, प्रार्थनेच्या क्षणादरम्यान, पवित्र आत्मा माझ्याशी, हे म्हणत बोलला, "हे सर्व काही तुझ्यावर अवलंबून आहे की तुला मला किती जाणावयाचे आहे." देवाजवळ जाण्याची क्षमता ही, वास्तवात, प्रत्येकासाठी उघड आहे. किल्ली ही व्यक्तीच्या स्वतःची इच्छा आणि दृढनिश्चयामध्ये आहे की प्रभूसोबत त्यांचे नातेसंबंध दृढ करावे. जितके अधिक कोणी देवाला जाणण्याची इच्छा बाळगतो, तितकेच तो गाढ आध्यात्मिक संबंध अनुभविण्यासाठी तयार होतो.
परमेश्वरा मध्ये तुम्हाला किती अधिक खोलवर जावयास पाहिजे?
अध्याय ४७ मध्ये यहेज्केल प्रमाणे (कृपा करून संपूर्ण अध्याय वाचा)
परमेश्वरा मध्ये तुम्हाला किती अधिक खोलवर जावयास पाहिजे, घोट्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत किंवा त्याठिकाणापर्यंत जेथे पवित्र आत्मा तुमच्यावर संपूर्ण पकड घेतो. हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही माझ्या किती जवळ याल, तितके मी तुमच्या जवळ येईन.
राजा व ह्या विश्वाचा निर्माणकर्त्यास तुमच्याजवळ यावयास वाटते! तथापि, तो स्वतः तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. तो ती निवड तुमच्यावर सोडतो.
तुम्हीराजेशाहीपणास तुमच्याकडे येण्यास सांगत नाही, तुम्ही त्याच्याकडे जाता. सुवार्ता ही आहे की २००० वर्षापेक्षा पूर्वी हाच परमेश्वर, ह्या पृथ्वीवर आला, निष्पाप जीवन जगला, त्याचे रक्त सांडले, आणि वधस्तंभावर मरणपावला व पुनरुत्थित झाला. आज, आपण त्याच्याकडे जातो. तुम्ही म्हणता, मी माझ्या स्वतःला त्यास देतो. मी माझ्या स्वतःला तुला समर्पित करतो."
उधळ्या पुत्राने काय म्हटले त्याकडे पाहा:
"मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही; आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला; तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले." (लूक १५:१८-२०)
दररोज त्याच्याजवळ कसे यावे
परमेश्वरा जवळ येणे म्हणजे त्याच्याबरोबर वेळ घालविणे, त्याची उपासना करणे, त्याकडे प्रार्थना करणे व त्याजबरोबर बोलणे, आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू मध्ये त्यास आमंत्रित करणे आहे. हे करण्यासाठी दररोज एक निश्चित वेळ ठरवा. तुम्ही आश्चर्य कराल की तो तुमच्याद्वारे काय करेल.
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या,तुझे वचन म्हणते, प्रत्येक झाड जे माझ्या स्वर्गातील पित्याने लाविलेले नाही, ते उपटून टाकण्यात येईल." माझ्या तुझ्याबरोबर चालण्यामध्ये जे काही अडथळा करीत आहे ते सर्व उपटून टाक. मी माझी प्रार्थनेची वेळी येशूच्यारक्ता द्वारे आच्छादित करीत आहे.
पित्या, मला कृपा पुरीव की दररोज प्रार्थना करावी. जेव्हा मी तुझ्याजवळ येतो, माझ्याजवळ ये जे तूं येशूच्या नांवात आश्वासन दिले आहे. आमेन.
कौटुंबिक तारण
धन्यवादीत पवित्र आत्म्या, माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांना सुवार्ता कशी सांगावी हे मला विशेषकरून दाखव. मला समर्थ कर, हे परमेश्वरा. योग्य क्षणी, तुझ्याबद्दल सांगण्यासाठी संधी प्रगट कर. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
प्रत्येक बी जे मी पेरले आहे ते परमेश्वरा द्वारे स्मरण केले जाईल. म्हणून माझ्या जीवनातील प्रत्येकअशक्य गोष्टी परमेश्वरा द्वारे बदलल्या जातील.येशूच्या नांवात.
केएसएम चर्च वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे उंचाविले व गौरविले जाईल.
देश
पित्या,मी प्रार्थना करतो की भारत देशातील प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची अंत:करणे ही तुझ्याकडे वळावी. त्यांनी त्यांच्या पापांचा पश्चाताप करावा व येशूला त्यांचा प्रभु व उद्धारकर्ता असे कबूल करावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वासाने चालणे● दुष्ट आत्म्यांचे प्रवेशाचे मार्ग बंद करणे- ३
● विश्वास ठेवण्याची तुमची क्षमता कशी वाढवावी
● दोनदा मरू नका
● इतरांसाठी मार्ग प्रकाशित करणे
● अडथळ्यांवरमात करण्याचे व्यवहारिक मार्ग
● नकारावर प्रभुत्व मिळवावे
टिप्पण्या