परमेश्वर अंत:करणा कडे पाहतो:-
प्रभुने शौला ला राजा म्हणून अस्वीकार केले कारण त्याच्या आदेशाप्रती तो सतत अवज्ञा करीत होता. प्रभूने मग पुढे संदेष्टा शमुवेल ला आदेश दिला की इशाय च्या घरी जा आणि त्याच्या एका पुत्राला इस्राएल चा भविष्यातील राजा म्हणून अभिषिक्त कर.
संदेष्टा त्यास दिलेल्या कामावर जात होता अलियाब, (इशाय चा एक पुत्र आणि दावीदाचा भाऊ) संदेष्टा शमुवेल समोर उभा राहिला. तो फारच देखणा होता आणि म्हणून संदेष्टाशमुवेलला वाटले, "खात्रीने हाच आहे ज्यास प्रभूने निवडले आहे."
पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, तूं त्याच्या स्वरूपावर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. (१ शमुवेल १६:७)
परमेश्वराने अलियाबास का नापसंत केले?
शारीरिकपणे किंवा दिसण्याजोगे, तोदेखणा होता परंतु परमेश्वर आतमध्ये खोलवर पाहतो-तो अंत:करणाकडे पाहतो (आध्यात्मिक मनुष्य). आता कृपाकरून समजा, चांगली वेशभूषा व चांगले दिसणे हे चुकीचे नाही परंतु त्याचप्रमाणे आपल्याला समानपणे आपल्या अंत:करणाचाआध्यात्मिक मनुष्य किंवा आंतरिक मनुष्य)सुद्धा विचार केला पाहिजे.
देवाचे मनुष्याबरोबर सर्व व्यवहार हे त्याच्या अंत:करणाच्या अवस्थेवर आधारित असते (आंतरिक मनुष्य). राजा शौल च्या तुलनेत दावीद हा तितका देखणा नव्हता. परंतु मग तो देवाच्या मनासारखा मनुष्य होता (१ शमुवेल १३:१४; प्रेषित १३:२२).
म्हणून यावरून तुम्ही अंत:करणाचे महत्त्व आणि आपल्या अंत:करणाचे रक्षण करण्याची अत्यंत गरज पाहू शकता.
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या,माझा आंतरिक मनुष्य सहनशीलतेसह समर्थ बनीव, की मी तुझे कार्य आवेशाने व परिश्रमाने करावे आणि तुझ्या अंत:करणाच्या गहन गोष्टीच्या मागे जाण्याचे सोडू नये.
पित्या,परमेश्वरा, तूं यहोवा शालोम, शांतीचा परमेश्वर आहे.कृपा करून माझ्या जीवनाच्या सर्व भागात तुझी शांति पुरीव.
पित्या, मला सामर्थ्य देकीतुझ्याप्रती माझ्या समर्पणात चालावे आणि जेव्हा फारच कठीण आहे तेव्हा माझ्या पाचारणास पूर्ण करावे.येशूच्या नांवात. आमेन.
कौटुंबिक तारण
धन्यवादीत पवित्र आत्म्या, माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांना सुवार्ता कशी सांगावी हे मला विशेषकरून दाखव. मला समर्थ कर, हे परमेश्वरा. योग्य क्षणी, तुझ्याबद्दल सांगण्यासाठी संधी प्रगट कर. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
प्रत्येक बी जे मी पेरले आहे ते परमेश्वराच्या सिंहासनासमोर बोलेल. परमेश्वरा, माझ्या वतीने तुझे देवदूत मोकळे कर कि मोठया आर्थिक वर्षावास चीथवावे. येशूच्या नावात.
केएसएम चर्च वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे उंचाविले व गौरविले जाईल.
देश
पित्या,येशूच्या नांवात मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या कानाकोपऱ्यात तुझा आत्मा सामर्थ्याने प्रवाहित कर, ज्याचा परिणाम चर्च ची सातत्याने वाढ व प्रगती होत राहो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या प्रकारची प्रीति● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा
● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
● कालच्यास सोडून द्यावे
● दिवस ०२ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● सत्ता हस्तांतराची ही वेळ आहे
टिप्पण्या