देवदूत हे परमेश्वराचे संदेशवाहक आहेत; हे त्यांचे एक कर्तव्यआहे. देवाच्या लेकरांकडे त्यांना त्याचा संदेश घेऊन सेवक म्हणून पाठविण्यात येते. बायबल म्हणते:
ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठविलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय? (इब्री १:१४)
प्रगट होण्याचे त्यांच्याकडे विविध मार्ग आहेत जेव्हा ते आपल्याकडे येतात. त्यापैकी एक हे आपल्या स्वप्ना द्वारे आहे.
पवित्र शास्त्रात पुरुषांची अनेक उदाहरणे आपल्याला मिळतात ज्यांना उपदेश मिळाला ज्याने त्यांच्या नियतीला बदलले होते, हे सर्व देवदूताच्या वचना द्वारे जो त्यांना स्वप्नात प्रगट झाला होता. राज्याची ही वैध पद्धत आहे ज्याद्वारे परमेश्वर त्याच्या लोकांना बोलतो किंवा त्यांना आध्यात्मिक भेट देतो.
याकोबाची कथा पाहा:
"तेव्हा त्यास स्वप्न पडले त्यांत त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तीचा शेंडा आकाशाला लागला आहे; आणि तिच्यावरून देवदूत चढतउतरत आहेत." (उत्पत्ति २८:१२)
याकोब त्याचा भाऊ एसाव पासून पळून जात होता जो त्याचा जीव घेऊ पाहत होता कारण त्याने त्याच्या वारस हक्कापासून त्यास फसविले होते. मग त्यास स्वप्नात देवदूताची भेट झाली होती, जी त्याच्या जीवनास बदलणार होती. परमेश्वराने त्यास त्याचठिकाणी म्हटले, आणि त्यास त्याचा पिता अब्राहामाच्या आशीर्वाद मध्ये जोडले गेले होते आणि परमेश्वराबरोबरील त्याचे चालणे त्याने सुरु केले होते.
जुन्या व नवीन करारात, देवदूत हे पूर्वज वडील, संदेष्ट्ये व इतरांस मनुष्य असे प्रगट होत असे.
"तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले." (प्रेषित १:१०)
असे प्रगट होणे काही वेळा मानवरुपात अदृश्य असतआणि इतर वेळी ते स्वप्नात किंवा दृष्टांतात. ते नेहमीच संदेश घेऊन येत असत.
उघडच आहे, ते पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करून नसत, आणि सर्व वेळेला दोन सोनेरी पंख नसे. त्यांना आवाज व स्वरअसे मानवी पुरुषासारखे असत.
इब्री च्यापुस्तकात, लेखक वाचकांस माहिती देत आहे की आपण जेव्हा अनोळखी व्यक्तींचा पाहुणचार करीत आहोत तेव्हा आपण काळजी घेतली पाहिजे, कारण कदाचित आपण ते देवदूत आहेत याविषयी अज्ञात असू शकतो (इब्री १३:२).
म्हणजे ते स्वप्नात किंवा शारीरिक अवस्थेमध्ये, कोणत्याही मार्गाने येऊ शकतात, ते त्या उद्देशाने येतात की ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
जेव्हा मी एक लहान मुलगा होतो, मला व्यक्तिगतरीत्या एका देवदूताचा जवळून अनुभव झाला होता ज्याने मला बुडण्यापासून वाचविले होते.
अनेक लोक मला हे म्हणत लिहितात की त्यांनी मला त्यांच्या स्वप्नात पाहिले आहे, परंतु स्वप्न किंवा दृष्टांताला पवित्र शास्राचे रूपक व कल्पना आहे आणि व्यक्ति हा परमेश्वराकडून संदेश आणत आहे.
मी सत्यात विश्वास ठेवतो की अनेकांपैकी एक कारण हे आहे कीस्वप्ना मध्ये परमेश्वर देवदूताला एक सामान्य-असे दिसणारा माणूस असे प्रगट होऊ देतो हे या कारणासाठी की मानसिक, शारीरिक व आध्यात्मिकप्रत्युत्तरेज्याशी आपली भेट होऊ शकते जर परमेश्वराने करुबीम, सराफिम किंवा जिवंत जीवाचे पूर्ण तेज आपल्याला दाखविले तर ते हाताळणे आपल्यासाठी फारच उत्स्फूर्त असे होऊन जाईल. जेव्हा मनुष्यांनी बायबल मध्ये देवदूतांना त्यांच्या पूर्णते मध्ये पाहिले, ते जमिनीवर पडले! दानीएल १० मध्ये, जेव्हा संदेष्टा दानीएल ने देवदूत पाहिला, तो भूमीवर पालथा पडला.
मी दानीएलाने एकट्याने तो दृष्टांत पाहिला; मजबरोबर असलेल्या मनुष्यांनी तो दृष्टांत पाहिला नाही; तरी त्यांस मोठा कंप सुटला आणि कोठे तरी लपावे म्हणून ते पळून गेले. मग मी एकटाच राहिलो व हा मोठा दृष्टांत पाहिला; माझ्यांत काही त्राण उरले नाही. मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो; मला काहीच शक्ति राहिली नाही. तरी त्याच्या शब्दांचा ध्वनि ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली." (दानीएल १०:७-९)
बालाम चे गाढव सुद्धा देवदूताच्या उपस्थितीमुळे खाली पडले. (गणना २२:२७)
देवदूत हे दिसण्यात तेजस्वी आहेत आणि शक्तिशाली मनुष्याला सुद्धा भीतीने थरकांप करवितात.देवदूतांचे संताना प्रगट होणे हे नेहमीच चांगले चिन्ह आहे कारण जेव्हा ते अभक्तांसाठी कदाचितन्यायाचा संदेश असतात, तेव्हा आपल्याला भिण्याची गरज नाही, परंतु चांगल्या गोष्टीची अपेक्षा करावी. (स्तोत्र ९१:११)
परमेश्वर विविध लोकांच्या स्वप्नात संदेशासह देवदूत पाठवितो, जसे योसेफाला येशूच्या जन्माच्या वेळी.
तीचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तूं मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिलापुत्र होईल, आणि त्याचे नांव तूं येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. (मत्तय १"१९-२१)
आणि पुन्हा,
ते गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, ऊठ, बालक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशास पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा; कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. (मत्तय २:१३)
आणि तसेच,
पुढे हेरोद मरण पावल्यावर, पाहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नांत दर्शन देऊन म्हणाला, ऊठ, बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएलाच्या देशास जा कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत. (मत्तय २: १९-२०)
संपूर्ण पवित्र शास्त्रात, परमेश्वराने देवदूताला लोकांकडे पाठविले आहे, कधीकधी त्यांच्या स्वप्नांत, आणिकधीकधी शारीरिकरुपात. आपण आध्यात्मिकदृष्टया ह्या पद्धतीसाठी जागृत असले पाहिजे कारण ते नेहमीच देवाच्या लोकांसाठी सहाय्याचे स्त्रोत आहेत, आणि जेव्हा आज सुद्धा आपण आपल्या स्वप्नांत देवदूत पाहतो, आपण यासाठी खात्रीशीर असू शकतो की ते आपल्याला भल्यासाठी आहे.
अनेक लोकांना स्वप्नासाठी अधिक महत्त्व नाही आहे कारण ते दावा करतात की अनेक लोक हे स्वप्ना द्वारे सहज भटकले गेले आहेत. जरी ह्यात काही सत्य असेन, तथापि, मी अजूनही कोणी पुरुष व स्त्री कडून, बायबल मध्ये, किंवा आजपर्यंत हे ऐकलेले नाही, जे सत्यात परमेश्वराबरोबर चालतात आणि स्वप्नात खोटया देवदूता द्वारे भटकविले गेले आहेत.
स्वप्ना मध्ये देवदूताचे प्रगट होणे हे तितकेच महत्वाचे आहे जितके शारीरिक संपर्क ज्याचा आपण अनुभव घेतो. यास सुद्धा राज्याच्या संपर्काची वैधता असे मानले गेले पाहिजे आणि त्यास कमी लेखू नये किंवा निराशा करवू नये कारण देवाने ते भूतकाळात वापरले आहे आणि ते आज सुद्धा वापरू शकतो.
४० दिवसांची बायबल वाचन योजना
मत्तय २७-२८; मार्क १-४
अंगीकार
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
ख्रिस्त येशू मध्ये मी देवाची धार्मिकता असल्यामुळे, देवदूतांना मला सेवाकार्य करण्यासाठी पाठविले गेले आहे. ते देवाच्या वचनाला प्रत्युत्तर देतात जे मी बोलतो. त्यामुळे, माझ्या मुखाच्या वचनाद्वारे मी देवदूतांना कार्यरत करतो.
परमेश्वराकडून दैवी संदेशासह देवदूत माझ्या स्वप्नांत प्रगट होतात.
कुटुंबाचे तारण
पित्या तुझी दया प्रदिवशी नवीन आहे यासाठी तुझा धन्यवाद. खरोखर आमच्या आयुष्याच्या सर्व दिवस माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर तुझा चांगुलपणा व तुझी दया सतत राहिल आणि मी परमेश्वराच्या उपस्थितीत सतत निवास करेन. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
मला माझ्या प्रभु येशूची कृपा ठाऊक आहे; तो धनवान असता माझ्याकरिता दरिद्री झाला; अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने मी आणि माझ्या कुटुंबाचे सदस्ये त्याच्या राज्याकरिता धनवान व्हावीत. (२ करिंथ ८:९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, व त्यांच्या संघातील सर्व सदस्ये चांगल्या स्वास्थ्य मध्ये राहावीत. असे होवो की तुझी शांति त्यांच्या जीवनात व त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाला घेरून राहो. असे होवो की करुणा सदन सेवाकार्ये प्रत्येक भागामध्ये वाढत जावो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याची इच्छा पूर्ण करण्याचे महत्त्व● सातत्याचे सामर्थ्य
● ख्रिस्ती लोक डॉक्टर कडे जाऊ शकतात काय?
● कोठवर?
● दिवस ०९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● कृतज्ञतेसाठी एक धडा
● द्वारपाळ
टिप्पण्या