डेली मन्ना
परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
Tuesday, 30th of May 2023
20
16
1005
Categories :
परमेश्वराची योजना
तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जिव्हांना तूं दोषी ठरविशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो. (यशया ५४:१७)
परमेश्वराने जेव्हा पुरुष व स्त्री ला निर्माण केले, त्याने आपल्याला त्याच्या प्रतिमे मध्ये व त्याच्या स्वरुपात निर्माण केले. सर्वशक्तिमान परमेश्वराचे जीवन तुमच्यातून वाहत आहे. हे असे आहे कीतुम्हाला मनात एक उद्देश ठेवून निर्माण केलेले आहे.
तथापि, अनेक लोक म्हणतात, "माझे भविष्य हे काय असणार आहे?" येथे काहीही संपन्नता नाही, केवळ संकटे व दु:ख आहे." कोणीतरी एकदा म्हटले, "परमेश्वरमोठी संकटे वापरतो की मोठे संत निर्माण करावे म्हणजेत्याने त्यांना मोठया ठिकाणी ठेवावे!" हालेलुया!
एस्तेर ही साधारण मुलगी होती. तिला ना ही पिता ना आई होती. कल्पना करा की संकटे व छळ ज्याचा तिने सामना केला असेन. मला ते कसे माहीत आहे? ठीक, कोणत्याही राष्ट्राची राणी होणे हे फार सहज प्राप्त होत नाही. एस्तेर राणी झाल्यानंतर सुद्धा एक दुष्ट मनुष्य हामान सर्व यहूदी लोकांना जिवंत मारण्याचा कट केला होता. यहूदी हे तिचे लोक होते. तिने अन्न व पाण्या शिवाय ३ दिवस व ३ रात्री उपास केला, हे म्हणत, "जर मी मेले तर मेले." यहूदी लोकांच्या तारण मध्ये एस्तेर ची मुख्य भूमिका होती.
संकटे व क्लेश ही तुमच्या मार्गात येतील परंतु निराश होऊ नका. त्याने आश्वासन दिले आहे, "पाहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे; तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत." (यशया ४९:१६)
प्रभु येशूने घोषित केले: "कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे." (योहान ६:३८)
येशू ख्रिस्त आलाकी त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करावी. एकच मार्ग ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनात भरपूर व्हाल, हे तुमच्या स्वतःला परमेश्वराच्या इच्छेमध्ये पाहण्याद्वारेच.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
माझे भविष्य हे अगोदरच ख्रिस्त येशू मध्ये स्थापित केलेले आहे.त्याचे विचार माझ्याप्रती हेशांतीचे विचार आहेत व मला हानी पोहचविण्याचे नाही, ते विचार जे मला उज्वल भविष्य देतील. मला एक उज्वल भविष्य आहे कारण चांगुलपणा व दया माझ्या आयुष्यभर माझ्याबरोबर राहील. मी धैर्य सोडणार नाही मग काय होईल याची पर्वा नाही परंतु स्थिर राहील जेव्हा मी देवाचे उद्देश पूर्ण करीत आहे.
कुटुंबाचे तारण
सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. (स्तोत्रसंहिता ३७:१८-१९)
आर्थिकतेचा नवीन मार्ग
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील (फिलिप्पै ४:१९). मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, तुझे वचन म्हणते की तूं तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा देतो की आमच्या मार्गामध्ये आम्हांला सुरक्षित ठेवावे आणि आम्हांला मार्गदर्शन करावे. पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, कर्मचारी व संघ सदस्यांसाठी तुझे पवित्र दिव्यदूत पाठिव, येशूच्या नांवात. त्यांच्या विरोधातील अंधाऱ्या शक्तीचे प्रत्येक कार्य नष्ट कर.
देश
पित्या, असे होवो की तुझी शांती व धार्मिकतेने आमच्या देशाला भरून टाकावे. आमच्या देशाच्या विरोधातील अंधार व विनाशकारी सर्व शक्ती ह्या नष्ट केल्या जावोत. असे होवो की आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात प्रभु येशूचे शुभवर्तमान हे पसरवो. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर पडा● काहीही अभाव नाही
● केवळ इतरत्र धावू नका
● आपल्या निवडींचा प्रभाव
● वारा जो डोंगराला देखील सरकवतो
● परमेश्वराकडून सल्ल्याची गरज
● विश्वासाचे सामर्थ्य
टिप्पण्या