माझी आईचे जेव्हा निधन झाले, मला तिची भेट सुद्धा घेता आली नव्हती आणि त्याने माझ्या दु:खाला माझ्यासाठी अधिक असहनीय केले होते. माझे जग, ज्यामध्ये माझ्या आईच्या प्रार्थनांनी मोठी भूमिका पार पाडली होती ती क्षणापुरती हादरली होती. हे केवळ त्याच्या कृपे मुळे मी त्यातून बाहेर येऊ शकलो.
मी जेव्हा वचनावर मनन करीत होतो, पवित्र आत्म्याने माझ्या मनावर हे बिंबविले की येथे माझ्यासारखे अनेक जण आहेत जे त्यांच्या प्रिय जनांना गमाविण्याच्या दु:खातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अनेक वेळेला दु:ख हे डॉक्टर कडून मिळालेल्या वार्ते पासून देखील सुरु होते जेव्हा आपण पाहतो की व्यक्तीची प्रकृती ही हळूहळू ढासळत आहे. आपण निरोप देतो, विचारात न घेता सुद्धा, अगदी त्या क्षणात, आणि पुढच्या वेळी आपण त्यांना पुन्हा पाहतो, आपण पुन्हा एकदा निरोप देतो. हे फारच यातनामय आहे!
प्रभु येशूने म्हटले, "जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल." (मत्तय ५:४)
बायबल त्यांच्याविषयी अनेक संदर्भ देते जे शोक करीत आहेत. यिर्मया ३१:१३ मध्ये, परमेश्वराने संदेष्ट्याद्वारे म्हटले, "त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करितील; वृद्ध व तरुण एकत्र आनंद करितील; मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन, मी त्यांचे सांत्वन करीन, त्यांचा दु:खानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन."
ह्या वचनावरून आपण पाहतो की ही देवाची इच्छा आहे की जे शोक करीत आहेत त्यांचे सांत्वन करावे; त्यामुळे आपण हे निश्चित करू शकतो की शोक नंतर सांत्वन येते. जर सांत्वन हे कधी येत नाही, तर काहीतरी चुकलेले आहे.
तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत, व त्याला तुच्छ लेखीत; आणि त्याला आम्ही मानिले नाही." (यशया ५३:३)
मी नुकतेच यशया ५३:३ द्वारे पिडीत झालो, जे "येशू हा क्लेशांनी व्यापिलेला" याविषयी बोलते. जर येथे कोणी असेल की जो तुम्हाला तुमच्या शोक करण्याच्या वेळेला समजू शकतो, तर तो केवळ येशू आहे. हे ह्या कारणासाठी की; हे सर्व त्याने आपल्यासाठी अनुभविले आहे.
आपण जेव्हा शोक करण्याच्या समयातून जात आहोत, आपण आणखी एका गोष्टीविषयी काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या आध्यात्मिक सवयीकडे दुर्लक्ष करू नये. दु:खाच्या क्षणी, प्रार्थना ही निरर्थक अशी दिसत असेन. कोणाला कदाचित फारच अशक्त व भावनात्मक अशांत सुद्धा वाटत असेन की बायबल वाचावे.
परंतु हे समजा की परमेश्वराने तुम्हाला प्रार्थना, वचन, व उपासनेसाठी बोलाविले आहे कारण ह्या गोष्टी तुम्हाला आतून परिपक्व व समर्थ करतात. ते तुम्हाला देवाची लेकरे म्हणून तुमच्या ओळखीस पुन्हा जोडत असतात व तुम्हाला ही आठवण करण्यास साहाय्य करतात की वेळ येत आहे की तुम्ही सुद्धा सार्वकालिकतेच्या अंत:रंगात वेळ घालवाल.
Most Read
● पावित्रीकरण स्पष्टपणे सांगितले आहे● बीभत्सपणा
● त्वरित आज्ञापालनाचे सामर्थ्य
● विश्वासाद्वारे कृपा प्राप्त करणे
● त्यांनातरुणच असे पकडावे
● माझ्या दिव्याला पेटव परमेश्वरा
● देव पुरस्कार देणारा आहे