तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले.सर्व इस्राएल लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले; सर्व मंडळी त्यांना म्हणाली, “आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते.तलवारीने आमचा निःपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हांला ह्या देशात का नेत आहे? आमच्या बायकामुलांची लूट होईल! आम्ही मिसर देशात परत जावे हेच बरे नव्हे काय?” (गणना 14:1-3)
देवाने इस्राएली लोकांना चिन्हे, चमत्कार आणि अद्भुते द्वारे विश्वसनीयरित्या येथपर्यंत आणले. खात्रीने परमेश्वर त्यांना पुढे घेऊन जाईल आणि त्यांना त्यांच्या बिकट परिस्थितीत ठेवणार नाही. जर त्यांनी केवळ हे समजले असते की ही त्यांची स्वाभाविक योग्यता नाही ज्याने त्यांना येथपर्यंत आणले आहे; परंतु हे परमेश्वरा मुळे झाले आहे; तर ते भूतकाळात बघणे थांबले असते आणि त्याऐवजी देवाचा धावा केला असता.
त्याप्रमाणे, आर्थिक स्थिरस्थावरते साठी सुरुवातही तुमच्या स्वतःला खेदजनक स्थितीत ठेवणे थांबा आणि प्रत्यक्षतेचा सामना करा. भूतकाळात राहणे हे केवळ भविष्यात पुढे जाणे कठीण करते. ते सोडून दया आणि पुढे जाण्यास तयार व्हा. हे केवळ याकारणासाठी नाही की असे करणे योग्य आहे, परंतु याकारणासाठी की हाच एक उत्तम मार्ग आहे की तुमच्या स्वतःला साहाय्य करावे.
जर तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबी विषयी नवीन मार्गात प्रवेश करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही तुमच्या भूतकाळापासून शिकू शकता, परंतु तुम्ही तुमच्या भूतकाळात जगण्यास वेळ घालू शकत नाही. तुमचा वेळ आणि शक्ती तुमच्या दयनीय परिस्थितीत पूर्णपणे गुरफटून जाण्याद्वारेतुम्ही तुमची तेवढी ऊर्जाकमी कराल की प्रत्यक्ष आवाहने सोडविण्यासाठी खर्च करावयाची होती ज्याचा तुम्ही सामना करीत आहात की जीवनात पुढे जावे.
भूतकाळातून शिकणे हे यासाठी की तुम्ही ज्या चुका मागे केल्या आहेत त्या पुढेही करू नये ज्यानेतुम्हाला ह्या दयनीय परिस्थितीत आणले आहे ज्यात तुम्ही सध्या आहात. याचा अर्थ जीवनशैली मध्ये काही महत्वपूर्ण सुधारणा करणे गरजेचे आहे जसे अनावश्यकपणे खरेदी करणे, नवीन आधुनिक वस्तू मिळविण्याच्या इच्छा सोडून देणे, सतत बाहेर हॉटेल मध्ये जेवणे वगैरे. (कृपा करून हे लक्षात घ्या ही यादी केवळ सूचनात्मक आहे आणि ती तुम्हाला लागू होईल किंवा होणार नाही.)
शेवटी, कोणीतरी म्हटले, "उत्तम समर्थन हे चांगला प्रतिकार." म्हणून समर्थन करण्याच्या प्रकारातून बाहेर या आणि पुन्हा प्राप्त करण्याच्या मार्गावर एका स्पष्ट योजनेसह सुरुवात करा. योजना असणे हे महत्वाचे आहे.
योजना करणे म्हणजे तुमच्या पुढील मार्गाचा आराखडा तयार करणे, मग तुम्हाला माहीत होईल कोठे आणि कधी काय करावयाचेआहे, नाहीतर तुम्ही उद्धेशा शिवाय इतरत्र भटकत राहाल. तुमच्या जोडीदाराबरोबर समस्या बद्दल चर्चा करा आणि प्रार्थनापूर्वक एक योजना करा कीआर्थिक स्थिरस्थावरतेच्या मार्गावर यावे.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरिता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
संपत्ती घडविण्याचे सामर्थ्य माझ्यावर येवो येशूच्या नांवात. मला आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी संधीची दैवी द्वारे ही येशूच्या नांवात उघडली जावोत. (तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ह्या प्रार्थना मुद्द्यांवर प्रार्थना करण्यास एकत्रकरा. ह्यामुद्द्यांवर जितक्या वेळा तुम्ही प्रार्थना करू शकता तितक्या वेळा करा.)
कुटुंबाचे तारण
येशूच्या नावाने, पवित्र आत्म्याचा अग्नी मजवर आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर नव्याने उतरून येवो.
हे परमेश्वरा, येशूच्या नावाने, माझ्या जीवनात आणि माझ्या कुटुंबात ते सर्व जे पवित्र नाही ते तुझ्या अग्नीद्वारे जाळून टाक.
आर्थिक प्रगती
जो कोणी माझ्याकडे साहाय्यासाठी पाहत आहे तो निराश होणार नाही. माझ्याजवळ पुरेसेपेक्षा अधिक असेन की माझ्या गरजांचे समाधान करावे आणि पुष्कळ असेल की गरजेमध्ये असणाऱ्या इतरांना द्यावे. मी कधीही कर्ज घेणारा नाही, तर कर्ज देणारा आहे. येशूच्या नावाने.
केएसएम चर्च
पित्या, पास्टर मायकल आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य, स्टाफ आणि संघ सदस्य यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांनी अलौकिक शहाणपण, समज, सर्वश्रेष्ठ सल्ला, ज्ञान आणि देवाच्या भयात चालावे. (यशया ११:२-३)
राष्ट्र
पित्या, तुझ्या धार्मिकतेने आमचे राष्ट्र भरू दे. आमच्या राष्ट्राच्या विरोधातील अंधार व विध्वंसाची सर्व शक्ती नष्ट केली जावी. आमच्या राष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात शांतता आणि समृद्धी नांदू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● जीवनाच्या वादळांमध्ये विश्वास ठेवणे● मत्सराच्या आत्म्यावर प्रभुत्व मिळविणे
● तुमच्या मनाला धैर्य दया
● दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● प्रीतीची भाषा
● नरक हे खरे स्थान आहे
● नवीन तुम्ही
टिप्पण्या