एक मनुष्य (इसहाक)संपन्न होऊ लागला, आणि तो सतत संपन्न होत गेला जोपर्यंत तो अत्यंत संपन्न झाला नाही, कारणतोकळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलीष्टी लोक त्याचा मत्सर करू लागले. (उत्पत्ति 26:13-14)
कोणतेही उघड कारण नसताना, पलीष्टी लोक इसहाक बरोबर वाईट वागू लागले. एक वेळ ते स्पष्ट आणि मैत्रीत होते, परंतु, आता अचानक, त्यांचा व्यवहार त्याच्या प्रती बदलला. तेमत्सर करू लागले आणि इसहाकच्या जीवनावर देवाचा आशीर्वाद पाहून घाबरले.
जेव्हा देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रकट होऊ लागतो, तुम्ही ते लपवू शकत नाही. म्हणून मग लोक कोणतेहीउघड कारण नसताना तुमचा मत्सर करू लागतील यासाठी तयार राहा. अनेक लोक मला लिहितात हे बोलत, "मी कोणाचेही काहीही वाईट केले नाही, मग लोक अशा रीतीने का वागत आहेत." माझ्या मित्रा, सरळ उत्तर हे,तुमच्या जीवनात देवाच्या आशीर्वाद विषयी ते मत्सर करीत आहेत.
उत्पत्ति अध्याय 37 मध्ये, आपण पाहतो की देवाचा आशीर्वाद योसेफ वर होता, म्हणून देव त्याच्या भविष्या विषयी स्वप्नात भाकिते करून त्यास दाखवू लागला, तो स्वप्ने पाहू लागला की तो शासक होईन आणि त्याचे भाऊ त्याच्यासमोर झुकतील.
योसेफ ची सर्वात मोठी चूक ही होती की तो त्याची वैयक्तिकघनिष्ठ स्वप्ने त्याच्या भावांना सांगू लागला आणि ह्यामुळे त्यांस त्याच्याविषयी अधिकच मत्सर वाटू लागला इतकाकी ते त्याचा घात करण्यास पाहू लागले. (उत्पत्ति 37:8). शेवटी, त्यांनी त्यास मिसर देशास एक गुलाम म्हणून विकले.
दावीद सुद्धा, जो एक देवाच्या मनासारखा मनुष्य होता त्यास मत्सरास तोंड दयावे लागले.
मग असे झाले की ते घरी परत येत होते, जेव्हापलीष्टी लोकांचा वध करून घरी परत येत होता, तेव्हा इस्राएलच्या सर्व नगरातूनस्त्रिया नाचत, गात येत होत्या, की शौल राजाला डफ व झांजा वाजवून भेटावे, म्हणून स्त्रिया नृत्य करीत आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत होते:
शौलाने हजारो वधिले,
दाविदाने लाखो वधिले."
हे ऐकून शौलास फार क्रोध आला; हे त्यांचे शब्द त्यास आवडले नाहीत; तो म्हणाला त्यांनी दाविदास लाखाचे यश दिले व मला केवळ हजाराचे यश दिले; राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळवायचे ते काय राहिले? त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेविला. (1 शमुवेल 18:6-9).
शौल हा दाविदाचा मत्सर करू लागला कारण दावीद त्याच्यापेक्षा अधिक यशस्वीझाला होता आणि लोकांकडून अधिक प्रशंसा प्राप्त करीत होता. जेव्हा तुमचा तुमच्या सभोवतालच्या लोकांपेक्षा अधिक देवा कडून उपयोग केला जातो, तर मग मत्सर हा तुमच्या विरुद्ध होईल यासाठी तयार राहा. देवाने जे करण्यासाठी तुम्हाला बोलाविले आहे ते करण्याचे थांबू नका. ते अधिक करा. ते त्यापेक्षा अधिक उत्तम असे करा.
आपल्या प्रभू येशूला सुद्धा त्याच्या विरुद्धच्या मत्सराच्या आत्म्यावर वर्चस्व मिळवावे लागले.
जेव्हा पंत पिलात येशूला सोडण्याचा प्रयत्न करीत होता, पवित्र शास्त्र मत्तय 28:18 मध्ये सांगते की,"त्यांस ठाऊक होते की त्यांनी येशूला मत्सराने धरून दिले आहे."
हे एक अविश्वासणाऱ्यास जसे पंत पिलात ला सुद्धा स्पष्ट होते की येशूला परुशी आणि सदुकी लोकांनी मत्सराने धरून दिले आहे.
परुशी आणि सदुकी लोक ह्या वास्तविकतेला हाताळू शकले नाही की हजारो लोक त्याच्याकडे येत होते जरी तो औपचारिक शिक्षण घेतलेला असा नव्हता. ते हे सहन करू शकले नाही हे पाहून कीलोकांनी त्यास अत्यंत प्रेम केले आणि त्याचा सन्मान केला.
जोपर्यंत तुम्ही जगत आहात हे लक्षात ठेवा. जर तुम्ही मत्सरा विरुद्ध संघर्ष करित आहात, तर हे तुमच्या जीवनावर यश किंवा कृपा राहिली आहे याचे दर्शक आहे.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळ प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
परमेश्वर पित्या, मी कबूल करतो की मी मत्सरासह संघर्ष करीत आहे. हे परमेश्वरा, मला खोलवर आतून शुद्ध कर.जे आशीर्वाद सध्या माझ्यावर आहे त्यासाठी कृतज्ञ राहिलो नाही म्हणूनमला क्षमा कर. माझ्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्यासाठी मला साहाय्य कर हे जाणत की तू मला अधिक आशीर्वादित करणार आहे. मी कबूल करतो, की देवाचा आत्मा माझ्यावर आहे. येशूच्या नांवात मी स्वतंत्र आहे, आमेन.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, तुझे वचन म्हणते की, "कारण ईश्वरप्रेरित दु:ख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दु:ख मरणास कारणीभूत होते" (२ करिंथ ७:१०). फक्त तूच आमचे डोळे या सत्यासाठी उघडू शकतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना ईश्वरप्रेरित दु:खाच्या भावनेसह तुझ्या आत्म्याचा स्पर्श कर की त्यांनी पश्चाताप करावा, तुला शरण यावे आणि त्यांचे तारण व्हावे. येशूच्या नावाने.
आर्थिक प्रगती
पित्या, येशूच्या नावाने मला लाभहीन श्रम आणि भ्रमित कार्यांपासून मुक्त कर.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की थेट प्रक्षेपण देशभरातील हजारो कुटुंबांपर्यंत पोहचावे. तुला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखण्यासाठी त्यांना आकर्षित कर. जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वचन, उपासना आणि प्रार्थनेमध्ये वाढीव.
राष्ट्र
पित्या, येशूच्या नावाने, आपल्या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुझा आत्मा सामर्थ्याने कार्यरत होण्यासाठी मी प्रार्थना करतो, ज्यामुळे चर्चची सतत वाढ व विस्तार होईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुलना करण्याचा सापळा● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
● ऐक्य आणि आज्ञाधारकपणाचा दृष्टांत
● आत्मसमर्पणात स्वातंत्र्य
● परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक
● शत्रू गुप्त आहे
टिप्पण्या