चित्र हे आहे की याकोबाचेपुत्र मिसर देशात पोहचले आहेत. ते त्यांचा भाऊ योसेफ ला भेटले आहेत परंतु त्याने अजूनसुद्धा स्वतःला त्यांना प्रकट केलेले नाही. योसेफाने आणखी एक परीक्षा घेतली हे तपासण्यासाठी की त्याच्या भावांची हृदये खरोखरच बदलली आहेत किंवा नाही.
योसेफाने त्याच्या एका सेवकास म्हटले की त्याचा चांदीचा प्याला बन्यामीन च्या गोणीत टाकून दे. तपासणी करण्याच्या प्रक्रीयेमध्ये, चांदीचा प्याला हा बन्यामीन कडे आहे हे समजले. बन्यामीन ला ताब्यात घेण्यात आले. भाऊ मिसर देशात परत आले.
पुन्हा, सर्व भाऊ हे शांत आहेत (कदाचित ते अधिकच धक्क्यामध्ये आहे की बोलावे). तथापि, यहूदा हे स्वतःवर घेतो की बन्यामीन आणि त्याच्या भावांच्या वतीने मध्यस्थी करावी.
उत्पत्ति ४४: ३२-३३ मधील कृती कडे पाहा
यहूदा योसेफ ला विनंती करीत होता, "माझ्या बापापाशी या मुलाबद्दल मी जामीन झालो आहे; मी म्हणालो, की मी यास आपणाकडे परत न आणिले तर मी आपला निरंतरचा दोषी ठरेन. तर आतां मी विनंती करितो की, या मुलाऐवजी या आपल्या दासास स्वामींनी गुलाम ठेवावे आणि या मुलास त्याच्या भावांबरोबर जाऊ दयावे." (उत्पत्ति ४४: ३२-३३)
मध्यस्थी करणारा त्या व्यक्तीचे स्थान घेतो ज्याच्या/जिच्यासाठी तो विनंती करीत आहे.
योसेफाने पाहिले की पूर्वी त्याचे भाऊ त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी त्यांच्या स्वतःच्या भावाला जिवंत मारण्यास तयार होते. परंतु, तो आता पाहतो, त्यांच्यामध्येपूर्णपणे बदल झालेला आहे. एक दुसऱ्यासाठी स्वतःचे बलिदान देण्यास तेतयार आहेत. यहूदा हा बन्यामीन चे तुरुंगातील स्थान घेण्यास तयार आहे. योसेफ हा बदल त्याच्या भावांमध्ये पाहतो आणि स्वतःला त्यास प्रकट करतो. (उत्पत्ति ४५: १-३ वाचा)
मी विश्वास ठेवतो, हे अगदी भविष्यात्मक आहे. आज, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तिकेवळ त्यांच्या स्वतःचेआशीर्वाद, त्यांचे कुटुंब, त्यांचे चर्च, त्यांचे सेवाकार्य वगैरे याविषयीच विचार करीत आहे.हे सर्व केवळ मी, माझे आणि माझ्यासाठीचविचार करणे होय. हे मग केवळ तेव्हाच जेव्हा आपण बलिदानपूर्वक मध्यस्थी मध्ये प्रवेश करतो, एक-दुसऱ्यासाठी मध्यस्थी करतो, परमेश्वर स्वतः आपल्याला प्रकट करेल अशा मार्गाने की ज्याचा आपण कधी विचार करू शकत नाही.
पवित्र आत्म्याने हे माझ्या अंत:करणावर अत्यंत गडदपणे कोरले.
यहूदाच्या मध्यस्थी ने योसेफ ला त्याच्या भावांना प्रकट केले
तुमची मध्यस्थी ख्रिस्तास अनेकांना प्रकट करेल जे भटकलेले आहेत
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
कारण मी प्रभु येशू ख्रिस्तावर माझा प्रभु, परमेश्वर आणि तारणारा असा विश्वास ठेवतो, मी ही घोषणा करतो की मी आणि माझे घराणे हे वाचले आहेत. (प्रेषित १६: १३; ईयोब २२: २८) माझी मुले (तुमच्या मुलांच्या नावांचा येथे उल्लेख करा) ही सुरक्षितपणे निवास करतील आणि पुढे जातील, आणि त्यांचे वंशज तुझ्यापुढे स्थापित होतील. (स्तोत्रसंहिता १०२: २८) पित्या, येशूच्या नांवात, मी कबूल करतो की तुझ्या हातातून माझ्या कुटुंबांच्या सदस्यांना (त्यांच्या नांवांचा उल्लेख करा)कोणी हिसकून घेऊ शकत नाही. (योहान १०: २९)
कौटुंबिक तारण
मी माझ्या संपूर्ण अंत:करणाने विश्वास ठेवतो व कबूल करतो, मी व माझे घराणे तर परमेश्वराचीच उपासना करणार. माझ्या येणाऱ्या दोन पिढ्या सुद्धा परमेश्वरचीच उपासना करतील. येशूच्या नांवात.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
हेपित्या, मला आवश्यक व्यवसाय व मानसीक कौशल्याने परिपूर्ण कर की माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संधीचा भरपूर फायदा घ्यावा.येशूच्या नांवात मलाआशीर्वादकर.
केएसएम चर्च वाढ
पित्या, असे होवो की प्रत्येक व्यक्ति जोकेएसएम चे प्रत्यक्ष प्रसारणपाहत आहे तेविलक्षण चमत्कार प्राप्त करतीलत्यामुळेतेत्या प्रत्येकांना आश्चर्यात टाकेल जे त्याविषयी ऐकतील. असे होवो की ते जे ह्या चमत्कार विषयी ऐकतील ते विश्वास सुद्धा प्राप्त करतील की तुमच्याकडे वळावे व त्यामुळे चमत्कार प्राप्त करावा.
देश
पित्या, येशूच्या नांवात,अंधाराच्या दुष्ट शक्ति द्वारेविनाशाच्या प्रत्येक जाळापासून आमच्या देशाला मुक्त ठेव.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कलंकित करणाऱ्या पापासाठी अद्भुत कृपेची आवश्यकता आहे● प्रचलित अनैतिकतेमध्ये स्थिर राहणे
● संबंधामध्ये आदराचा नियम
● मध्यस्थी वर एक भविष्यात्मक शिकवण १
● सन्मानाचे जीवन जगा
● महाविजयीठरणे
● अविश्वास
टिप्पण्या