एके दिवशी प्रभु येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले केली की आता वेळ आली आहे की त्यास वधस्तंभावर देण्यात येईल आणि त्याचे सर्व शिष्य त्यास सोडून जातील. मगपेत्राने त्यास उत्तर दिले, आपणांविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही. (मत्तय २६:३३)
परंतु केवळ एका दिवसानंतर, पेत्र त्याने दिलेले आश्वासन पाळू शकला नाही आणि त्याने प्रभूचा नकार केला. पेत्रा प्रमाणे आपल्यापैंकी अनेकांनी प्रभु येशूलाप्रामाणिक आश्वासने दिली आहेत परंतु प्रत्यक्षात ही आश्वासने पाळलेली नाहीत.
परमेश्वरा, सकाळीप्रत्येक दिवशी पहिल्या प्रथम मी ही प्रार्थना करेन
परमेश्वरा, मीअमुक अमुक उपासने मध्ये तुझी सेवा करण्याचे आश्वासन देतो आणि तरी सुद्धा अनेक जण त्यांची आश्वासने पाळण्यात असमर्थ ठरत आहेत. का?
येथेप्रीति साठी ग्रीक भाषे मध्ये चार शब्द आहेत ते ख्रिस्ती लोकांना समजणे महत्वाचे आहे. ते इरोस, अगापे, फिलिओ आणि स्टोर्ज असे आहेत. बायबल मध्ये नेहमी येणारे हे इरोस, अगापे आणि फिलिओ हे आहेत. स्टोर्ज हा शब्द केवळ एकदा रोम १२: १० मध्ये दिसतो.
चला आपण ह्या शब्दांकडे पाहू या
इरोस: -
लैंगिक सहवास साठी किंवा आवेगपूर्ण प्रीति साठी ग्रीक शब्द हा इरोस आहे, जेथून आपण इंग्रजी शब्द इरोटिक हा घेतो.
अगापे: -
ग्रीक शब्द जो देवाच्या प्रीति चा संदर्भ देतो, एकप्रकारचीप्रीति जी आपल्याला लोकांसाठीराहिली पाहिजे, ती अगापे आहे. अगापे हा अगदी देवाचा स्वभाव आहे, कारण देव प्रीति आहे (१ योहान ४: ७-१२, १६ब). अगापे ही प्रीति आहे, कारण जे काही ती करते, ह्याकारणासाठी नाही की तिला कसे वाटते.
देवाने एवढी "प्रीति" (अगापे) केलीकी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाला हे करण्यास चांगले वाटत नव्हते, परंतु ती सर्वात प्रेमळ गोष्ट करणे होते.
फिलिओ: -
"प्रीति" साठी तिसरा शब्द ज्याचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे तो फिलिओ हा आहे, ज्याचा अर्थ कोणालातरी किंवा कशासाठी तरी विशेष रुची असणे होय, नेहमी तसे हे जवळीक संबंध लक्षात घेऊन आहे; कशासाठी तरी ओढ, आवड असणे; कोणाला तरी मित्रासारखे पाहणे.
योहान २१ मध्ये अगापे आणि फिलिओ मधील फरक हा स्पष्ट आहे परंतु दुर्दैवाने हे अनेक इंग्रजी भाषांतरात अस्पष्ट असे आहे. मृत्युमधून उठल्यावर, येशू पेत्राला भेटला. येथे त्यांच्यामधील संभाषणाचे थोडक्यात वर्णन आहे.
त्यांचीन्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा, शिमोना, ह्यांच्यापेक्षा तूं माझ्यावर अधिक प्रीति (अगापे) करितोस काय?
पेत्र त्याला म्हणाला, होय, प्रभू, आपणांवर मी प्रेम (फिलिओ)करितो, हे आपणांला ठाऊक आहे.
प्रभु येशूनेपुन्हा दुसऱ्यांदा त्याला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावरप्रीति (अगापे) करितोस काय? पेत्र त्याला म्हणाला, होय, प्रभू, मी आपणांवर प्रेम (फिलिओ) करितो.
तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम (फिलिओ) करितोस काय? माझ्यावर प्रेम करितोस काय, असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणांला सर्व ठाऊक आहे; मी आपणांवर प्रेम (फिलिओ)करितो हे आपण ओळखले आहे.
(योहान २१: १५-१७)
पेत्राचे समर्पण हे कार्यकारी आणि जिव्हाळ्याचेहोतेपरंतु ते अगापे प्रीति वर आधारित नव्हते. केवळ'फिलिओ' प्रीति ही मरण्यासाठी पुरेशी नाही. म्हणून यात काही आश्चर्य नाही की पेत्राने येशूला नाकारले. पेत्राला अगापे प्रीति ची गरज होती आणि तसेच तुम्हांला आणि मला. अगापेप्रीति ही फिलिओ प्रीति पेक्षा अत्युच्च आणि शुद्ध आहे. प्रीति जी तुम्हांला आणि मला विकसित करायची आहे ती अगापे प्रीति आहे.
आपण ह्या अगापे प्रीति मध्ये कसे वाढावे?
रोम ५: ५ मध्ये याबद्दल मुख्य गोष्ट मिळते.
'......कारण आपणांला दिलेल्या पवित्रआत्म्याच्या द्वारे आपल्या अंत:करणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे."
जितके अधिक आपण पवित्र आत्म्यासह संगती करतो, देवाचीप्रीति ही आपल्या अंत:करणात भरली जाते. जखमा आणि वण हे स्वस्थ केले जातात जेव्हा जीवन देणारी नदी आपल्या आत्म्याच्या गहनतेमध्ये प्रवाहित होते.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
स्वर्गातील पित्या, मी तुझ्या विना अट प्रीति बद्दलतुला धन्यवाद देतो. तुझे अगापे प्रेम माझ्या हृदयात ओत, म्हणजे मी सुद्धा तुला आणि जे माझ्या सभोवती आहेत त्यांना संपूर्ण हृदयाने प्रेम करावे. येशूच्या नांवात. आमेन.
कौटुंबिक तारण
येशूच्या नांवात, मी आदेश देतो की मी, माझ्याकुटुंबाचे सदस्य, व माझे चर्च हे सिद्धांतांचे प्रत्येक वारे व मनुष्याच्या कपट योजनासह गडबडणार नाही किंवा त्याने भारावून जाणार नाही.
येशूच्या नांवात, मी आदेश देतो की मी, माझ्याकुटुंबाचे सदस्य, व माझे चर्च हे फसवणुकीच्या कपटयुक्त योजनांच्या धूर्त लबाडीच्या विरोधात संरक्षित केले जावो आणि आम्ही स्पष्टपणे लपलेले असत्य पाहावे व त्यास पूर्णपणे अस्वीकार करावे.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
ख्रिस्त येशू द्वारे माझा पिता गौरवाच्या द्वारे माझी व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांची सर्व गरज पुरवेल.
केएसएम चर्च वाढ
पित्या, पास्टर मायकल व त्याच्या संघाच्या सदस्यांना तुझ्या आत्म्याद्वारे नवीन अभिषेक कर ज्याचा परिणाम तुझ्या लोकांमध्ये चिन्हे व चमत्कार व सामर्थ्याची कार्ये होवो. ह्याद्वारे लोकांना तुझ्या राज्यात आण. येशूच्या नांवात.
देश
पित्या, येशूच्या नांवात मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची अंत:करणे तुझ्याकडे वळो. त्यांनी त्यांच्या पापाचा पश्चाताप करावा व तुला प्रभु व तारणारा म्हणून स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विसरलेली आज्ञा● अभिषेकाचा एक नंबरचा शत्रू
● सैतान तुमच्या कार्यात कसे अडथळे आणतो
● जिवासाठी देवाचे औषध
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-५
● भविष्यात्मकदृष्टया शेवटच्या समयाचे संकेत काढणे
● वाईटपद्धतींनानष्ट करणे
टिप्पण्या