डेली मन्ना
प्रार्थना कशी करावी जेव्हा तुम्हाला देवापासून दूर आहोत असे वाटते
Friday, 4th of August 2023
30
18
830
Categories :
प्रार्थना
माझ्या जीवनात एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटले की परमेश्वर माझ्यापासून दूर आहे किंवा माझ्यामध्ये रुची घेत नाही. तुम्हाला कधी प्रार्थना करण्यासाठी कठीण वाटले काय कारण तुम्हाला देवाबरोबर संबंधित आहे असे वाटले नाही? आपल्यापैकी काहींना कदाचित असाच विचार येत असेन की परमेश्वर फार दूर आहे की आपल्यापर्यंत यावे.
मागीलकाही वर्षांमध्ये मी अनुभवातून हे जाणलेकीजेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात जरी देवाच्या उपस्थितीचा अभास करीत नाही, तो नेहमीच तुमच्यासाठी उपस्थित आहे. तो तुमच्याकडे पोहचतो, तुम्ही जेव्हा जरीतुमचे हात त्याकडे पसरीत नसतात.
सत्य हे सरळ आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात देवाला अधिक अनुभवायचे आहे, तर तुम्हांला केवळ मागायचे आहे. जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा जर तुम्हाला पाहिजे की तो तुम्हाला काय बोलत आहे, तर केवळ मागा.
"मी तुम्हांस सांगतो, मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल; ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. (लूक ११: ९-१०)
म्हणून जेव्हा तुम्हाला देवापासून फार दूर आहोत असे वाटते, त्यास मागा की त्याच्या उपस्थिती विषयी अधिक अवगत व्हावे. परमेश्वर तुम्हांला त्याचे स्वतःचे पुत्र व पुत्री असे प्रेम करतो.
त्याच्या उपस्थितीत असण्यासाठी तुम्हाला अधिकार प्राप्त करण्याची गरज नाही. येशूने अगोदरच याची किंमत भरली आहे आणि त्याने ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केले आहे!
परमेश्वर आणि तुमच्या मधील दुरावा कमी करण्यासाठी एक मार्ग हा तुम्हाला काय वाटते हे त्यास सांगण्याद्वारे आहे. हे तुमच्यावरील ओझे काढून टाकेल आणि ते येशूला दिले जाईल.
त्यास पाहिजे की आपण आपल्या नाही तर त्याच्या सामर्थ्या मध्ये विश्राम प्राप्त करावा. (मत्तय ११: २८-३०)
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरिता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मी माझे कष्टीपण आणि वेदना तुला समर्पितकरतो. जे सर्व काही माझ्यामध्ये आहे ते माझ्या परमेश्वरा तुझ्याकडे आक्रोश करते. मला साहाय्य कर! मलामाहीत आहे मी हे करू शकतो म्हणून मी तुझ्याकडे येतो. आमेन.
कुटुंबाचे तारण
येशूच्या नावाने, पवित्र आत्म्याचा अग्नी मजवर आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर नव्याने उतरून येवो.
हे परमेश्वरा, येशूच्या नावाने, माझ्या जीवनात आणि माझ्या कुटुंबात ते सर्व जे पवित्र नाही ते तुझ्या अग्नीद्वारे जाळून टाक.
आर्थिक प्रगती
जो कोणी माझ्याकडे साहाय्यासाठी पाहत आहे तो निराश होणार नाही. माझ्याजवळ पुरेसेपेक्षा अधिक असेन की माझ्या गरजांचे समाधान करावे आणि पुष्कळ असेल की गरजेमध्ये असणाऱ्या इतरांना द्यावे. मी कधीही कर्ज घेणारा नाही, तर कर्ज देणारा आहे. येशूच्या नावाने.
केएसएम चर्च
पित्या, पास्टर मायकल आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य, स्टाफ आणि संघ सदस्य यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांनी अलौकिक शहाणपण, समज, सर्वश्रेष्ठ सल्ला, ज्ञान आणि देवाच्या भयात चालावे. (यशया ११:२-३)
राष्ट्र
पित्या, तुझ्या धार्मिकतेने आमचे राष्ट्र भरू दे. आमच्या राष्ट्राच्या विरोधातील अंधार व विध्वंसाची सर्व शक्ती नष्ट केली जावी. आमच्या राष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात शांतता आणि समृद्धी नांदू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०५: ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● तुमच्या संपूर्ण सामर्थ्यापर्यंत पोहचा
● अंतिम क्षण जवळ येण्यास सुरुवात होते
● केवळ इतरत्र धावू नका
● तुमचे संबंध गमावू नका
● तुलना करण्याचा सापळा
● चिंता करीत वाट पाहणे
टिप्पण्या