कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीति, विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. (१ तीमथ्यी ४: १२)
तीमथ्यी हा एक तरुण मनुष्य होता आणि याकारणासाठी अनेक चर्च सदस्यांनी त्यास सहज असे घेतले असेन आणि त्याच्या पुढारीपणाच्या योग्यते कडे कानाडोळा केला असेन. त्यांनी हे गृहीत धरले असेन कीत्याच्याकडे आवश्यक अनुभव नाही.
परंतु तीमथ्यीचे वय आणि अनुभव याची पर्वा केल्याविना प्रेषित पौलाने त्यास आठवण दिली की तो त्याच्या पेक्षा वयाने मोठया लोकांचे पुढारीपण दररोज एक चांगले आदर्श स्थापित करून ते करू शकेन. हे त्याच्या विश्वसनीयतेला वाढवेल.
एक ख्रिस्ती म्हणून, आपल्याला इतरांना एक आदर्श व्हावे म्हणून बोलाविले गेले आहे मग आपला उद्धार होऊन एक महिना किंवा 10 वर्षे झाले असेन.याची पर्वा नाही की तुमचे व्यक्तिमत्व कशा प्रकारचे आहे. आपल्याला जे आपल्या सभोवती आहेत त्याच्यासाठी विश्वास, आशा,प्रीति आणिपवित्रतेचा आदर्श होण्यासाठी बोलाविले आहे.
बायबल चे ज्ञान असणे हे चांगले आहे परंतु जसे आपणबोलतो, कार्य, प्रीति आणि विश्वास ठेवतो त्याद्वारे ख्रिस्तामध्ये आपला विश्वास व्यक्त केला पाहिजे आणि विशेषतः जे बाहेरील आहेत त्यांच्यासमोर देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या करण्यापासून दूर राहावे.
अनेक वर्षांपूर्वी, मी ऐकले होते एका देवाच्या मनुष्याने म्हटले होते, "जगातील लोक मत्तय, मार्क, लूक आणि योहान कदाचित वाचणार नाहीत परंतु ही खात्री आहे की ते पाचवा शुभवर्तमान वाचतील. तुम्ही पाचवे शुभवर्तमान आहात."
हे किती खरे आहे! काहींसाठी आपण कदाचित ख्रिस्तासाठी खरेच जोड असू जे त्यांच्या जीवना दरम्यान दिसू शकते आणि आपण याची खात्री केली पाहिजे की आपण त्यास योग्यपणे प्रतिनिधित करीत आहोत.
हे आपल्यासाठी सर्व काही चांगले असे करेन जर आपण प्रेषित पौलाने १ तीमथ्यी ४: १६ दिलेला परामर्श कडे लक्ष दिले.
आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तूं स्वतःचेव तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण साधिशील.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नावात, तुझ्या मार्गात वाढण्यास मला साहाय्य कर जेणेकरून मी जो कोणी माझ्यासंपर्कात येईल त्यास प्रभावित करावे आणि त्यांस तुझ्यासाठी जिंकावे. आमेन.
कुटुंबाचे तारण
सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. (स्तोत्रसंहिता ३७:१८-१९)
आर्थिकतेचा नवीन मार्ग
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील (फिलिप्पै ४:१९). मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, तुझे वचन म्हणते की तूं तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा देतो की आमच्या मार्गामध्ये आम्हांला सुरक्षित ठेवावे आणि आम्हांला मार्गदर्शन करावे. पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, कर्मचारी व संघ सदस्यांसाठी तुझे पवित्र दिव्यदूत पाठिव, येशूच्या नांवात. त्यांच्या विरोधातील अंधाऱ्या शक्तीचे प्रत्येक कार्य नष्ट कर.
देश
पित्या, असे होवो की तुझी शांती व धार्मिकतेने आमच्या देशाला भरून टाकावे. आमच्या देशाच्या विरोधातील अंधार व विनाशकारी सर्व शक्ती ह्या नष्ट केल्या जावोत. असे होवो की आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात प्रभु येशूचे शुभवर्तमान हे पसरवो. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● भविष्यात्मक वचन प्राप्त केल्यानंतर काय करावे?● अप्रसिद्ध नायक
● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
● येशू स्वर्गात काय करीत आहे
● परमेश्वर तुमच्या शरीरा विषयी काळजी करतो काय
● चमत्कारीक कार्य करणे: मुख्य बाब #२
● अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत
टिप्पण्या