डेली मन्ना
त्याची इच्छा पूर्ण करण्याचे महत्त्व
Saturday, 19th of August 2023
25
17
775
Categories :
शिष्यत्व
देवाची इच्छा समजणे व्यक्ति साठी इतके का महत्वाचे आहे?
पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते, "मला प्रभुजी, प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल." (मत्तय 7:21).
देवाची इच्छा समजणे हे येथे पृथ्वीवर तसेच सार्वकालिकते मध्ये आपल्या आनंदाची निश्चिती करते. केवळ ओठाने स्तुती करणे हे तुम्हाला काहीही मिळवून देणार नाही. काय प्रत्यक्ष आवश्यक आहे ते हे की आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनासाठी देवाच्या इच्छेची चांगली समज प्राप्त करणे.
आपण याची खात्री केली पाहिजे की आपण जगाचे बदलणारे तत्वज्ञान व मनुष्यांच्या विचारानुसार आपले जीवन आधारित करणार नाही. आपल्याला बुद्धिमान असले पाहिजे आणि देवाची इच्छा काय आहे हे समजले पाहिजे. (इफिस 5:17). देवाची इच्छा समजणे याचा अर्थ हा आहे की आपल्याला देवाच्या वचनाची योग्य समज असली पाहिजे. देवाचे वचन आणि त्याची इच्छा हे समानार्थी आहे (घनिष्ठ संबंधित आहे).
जर तुम्ही दोन भाऊ, काइन आणि हाबेल यांची आठवण ठेवता. हाबेलाने देवाला अर्पण आणले जे देवाला आवश्यक होते आणि काइनाने काहीतरी आणले जे त्यास योग्य वाटले. अंतिम परिणाम हा हाबेलाचे अर्पण देवाने स्विकारीले आणि काइनाचे अर्पण नाकारीले. (वाचा उत्पत्ती 4:3-5).
इब्री लोकांस पत्र हे पुस्तक या वास्तविकतेवर भर देते की हाबेलाने काइना पेक्षा उत्तम असा यज्ञ केला.
विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला. (इब्री 11:4)
आपण सर्वजण ह्या पृथ्वीवर आहोत की देवाच्या योजना आणि त्याची इच्छा पूर्ण कराव्या-आपल्या नाही.
प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना हे शिकविले की प्रार्थना अशी करावी-"तुझी इच्छा पृथ्वीवर पूर्ण व्हावी जशी स्वर्गात होते." (मत्तय 6:10)
जे काही आपण बांधत आहोत, जी काही योजना आपण आखत आहोत की ती पूर्ण करावी, ते सर्व त्याची इच्छा आणि पद्धती नुसार व्हायला पाहिजे. "मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे. निवासमंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवितो त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे." (निर्गम 25:8-9)
मोशे हा त्यास पर्वतावर दाखविलेल्या नमुन्यानुसार निवासमंडप बांधण्यास तितका हुशार होता. जेव्हा त्याने असे केले, पवित्र शास्त्र सांगते, "मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शनमंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आंत प्रवेश करिता येईना." (निर्गम 40:34-35)
जर तुम्ही संपूर्ण अध्याय वाचला (निर्गम 40), तुमच्या हे लक्षात येईल की मोशे ने निवासमंडप देवाच्या गौरवाने भरण्यासाठी प्रार्थना सुद्धा केली नाही.
चला मला तुम्हाला एक गहन रहस्य सांगू दया. जेव्हा प्रभू द्वारे दाखविलेल्या पद्धतीनुसार सर्वकाही केले जाते, जेव्हा देवाच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी ह्या केल्या जातात, देवाचे गौरव हे तो प्रकल्प, नवयोजना, सेवाकार्य, एक व्यक्ति वर अक्षरशः थांबून राहील किंवा त्याचे समर्थन करेल.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
मी पित्याची उपासना आत्म्याने व खरे पणाने करेन. ख्रिस्ताने जे माझ्यासाठी केले आहे त्यावर मी पूर्णपणे विसंबून राहीन आणि मी मानवी प्रयत्नामध्ये विश्वास ठेवणार नाही. येशूच्या नावात (फिलिप्पै ३:३)
कुटुंबाचे तारण
पित्या, तारणाच्या कृपे साठी मी तुझा धन्यवाद करतो, आमच्या पापांसाठी मरण्यास तुझ्या पुत्राला पाठविले म्हणून हे पित्या तुझा धन्यवाद. पित्या, येशूच्या नांवात, तुझ्या ज्ञाना मध्ये प्रकटीकरण दे (तुमच्या प्रियजनांच्या नावाचा उल्लेख करा). प्रभु व तारणारा असे तुला ओळखण्यासाठी त्यांचे डोळे उघड.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या पाचारणास पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या आर्थिक नवीन वाटचाली साठी मागत आहे. तूं एक महान पुनर्स्थापित करणारा आहे.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, सर्व पास्टर, गट पर्यवेक्षक व केएसएम चर्च चे जे-१२ पुढारी यांना तुझे वचन व प्रार्थने मध्ये वाढू दे. तसेच प्रत्येक व्यक्ति जो केएसएम शी जुडलेला आहे तो वचन व प्रार्थने मध्ये वाढो. येशूच्या नांवात.
देश
पित्या, येशूच्या नांवात, आम्ही आमच्या देशाच्या सीमेवर शांतीसाठी प्रार्थना करतो. आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात शांती व महान प्रगती व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. प्रत्येक सामर्थ्याला जे आमच्या देशात तुझ्या शुभवर्तमानाला अडथळे करते त्यास नष्ट कर. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे मार्गदर्शन कोण करीत आहे?● दिवस ११:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आजच्या वेळेत हे करा
● तुमच्या पीडे मध्ये देवाच्या अधीन होण्यास शिकणे
● वेळेवर आज्ञापालन करणे
● देवाच्या उद्धेशासाठी तुम्ही निश्चित केलेले आहात
● बुद्धिमान व्हा
टिप्पण्या