डेली मन्ना
पावित्रीकरण स्पष्टपणे सांगितले आहे
Wednesday, 6th of September 2023
29
20
979
Categories :
पवित्रीकरण
1. पावित्रीकरण हे गुणविशेषता जपणे आहे
आध्यात्मिकदृष्ट्या देवाबरोबर चालणे. तुमच्या आध्यात्मिक जीवनाची योग्य काळजी घेणे.
2. पावित्रीकरण हे एक जीवनशैलीअसे देवाच्या भयात जगणे आहे.
पोटीफरच्या पत्नीने योसेफला मोहात टाकण्याचा प्रयत्न केला. योसेफ त्याच्या प्रियजन आणि कुटुंबापासून फार दूर होता, एकटाच एका विदेशी भूमीमध्ये तो निश्चितच त्या मोहाला बळी पडला असता. येथे ते आहे जे त्याने म्हटले, "तूं दुसऱ्या मनुष्याची पत्नी आहे. मी असा अति दुष्टपणा, आणि देवाविरुद्ध पाप कसे काय करू शकतो?" (उत्पत्ति 39:9).
योसेफचे जीवन हे देवाच्या भया द्वारे निर्देशित होते.
3. पावित्रीकरण हे देवालानेहमीच प्रसन्न करण्यास पाहणे असे आहे.
लूक 6:26 च्या संदेशातील भाषांतरात, आपल्याला सांगितले आहे, "तेथे पुढे संकट हे असेन जेव्हा तुम्ही केवळ दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाहत आहात, ते बोलावे जे त्यांना बरे वाटते, ते करावे ज्यामध्ये ते व्यस्त आहेत. प्रसिद्धी स्पर्धा ह्या सत्य स्पर्धा नाहीत, तुमचा उद्देश हा सत्य असणे आहे, प्रसिद्धीसाठी नाही."
एका ख्रिस्ती स्त्री ने मला लिहिले, त्यात ती म्हणते, 'जर मी माझ्या लग्नाच्या दिवशी मद्य देत नाही तर लोक काय म्हणतील?" मी निश्चितच तिला काही म्हटले नाही. जसे तुम्हाला हे ठाऊकच आहे, येथे असे लोक आहेत जे देव काय बोलेन यापेक्षा लोक काय बोलतील याकडे लक्ष देणारे आहेत.
परंतु येथे तशीच एक जात आहे (ते म्हणजे कमी पुरवठा) ती म्हणते, "मी मनुष्यांस प्रसन्न करणारा होण्यापेक्षा देवाला प्रसन्न करणारा होईल."
प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वतःच्या शब्दात पावित्रीकरणास व्याख्यीत करणे. "धन्य आहेत ते जे धार्मिकतेचे भुकेले आणि तान्हेले आहेत, कारण त्यांना तृप्त करण्यात येईल." (मत्तय 5:6)
हे तेव्हाच जेव्हा जगाच्या भूक आणि तहाने पेक्षा तुमची भूक आणि तहान ही देवासाठी अधिक होते, तेव्हा तुम्ही पावित्रीकरणात चालाल. ही भूक आणि तहान तुम्हाला केवळ प्रभू द्वारे दिली जाऊ शकते.
तर मग, त्याच्या उपस्थिती साठी ह्या भूक आणि तहाने साठी प्रतिदिवशीत्यास मागणे हे निश्चित करा. जेव्हा तुम्ही असे करता, तुम्हीपवित्र व्हाल आणि अधिक आणि अधिक त्यासमान व्हाल.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळ प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, मला ती भूक आणि तहान दे की तुला अधिक आणि अधिक जाणावे. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, तुझे वचन म्हणते की, "कारण ईश्वरप्रेरित दु:ख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दु:ख मरणास कारणीभूत होते" (२ करिंथ ७:१०). फक्त तूच आमचे डोळे या सत्यासाठी उघडू शकतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना ईश्वरप्रेरित दु:खाच्या भावनेसह तुझ्या आत्म्याचा स्पर्श कर की त्यांनी पश्चाताप करावा, तुला शरण यावे आणि त्यांचे तारण व्हावे. येशूच्या नावाने.
आर्थिक प्रगती
पित्या, येशूच्या नावाने मला लाभहीन श्रम आणि भ्रमित कार्यांपासून मुक्त कर.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की थेट प्रक्षेपण देशभरातील हजारो कुटुंबांपर्यंत पोहचावे. तुला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखण्यासाठी त्यांना आकर्षित कर. जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वचन, उपासना आणि प्रार्थनेमध्ये वाढीव.
राष्ट्र
पित्या, येशूच्या नावाने, आपल्या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुझा आत्मा सामर्थ्याने कार्यरत होण्यासाठी मी प्रार्थना करतो, ज्यामुळे चर्चची सतत वाढ व विस्तार होईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● संबंधामध्ये आदराचा नियम● २१ दिवस उपवासः दिवस ०२
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – २
● स्वर्गाचे आश्वासन
● पाऊस पडत आहे
● त्याच्या सामर्थ्याचा उद्देश
● ही एक गोष्ट करा
टिप्पण्या