डेली मन्ना
पवित्र आत्म्या विरुद्ध निंदा म्हणजे काय आहे?
Wednesday, 13th of September 2023
27
21
1177
एके दिवशी एक आंधळा व मुका असलेल्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणिले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हा दावीदाचा पुत्र असेल काय? (मत्तय १२:२२-२३)
परंतु परुशी हे ऐकून म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढीत नाही. (मत्तय १२:२४)
दुसऱ्या शब्दात, त्यांनी येशूवर दोष लाविला की सैतानाच्या सामर्थ्याने तो भुते काढीत आहे. त्यांनी असे केले की त्याच्या सेवेला कमी लेखावे. चांगला शुद्धीवर असताना कोणाला असे वाटेल की त्याच्याबरोबर चालावे जो सैतानाबरोबर कार्य करीत आहे?
येशूने त्यांना हे बोलत कानउघडणी केली, "प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही.
मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही." (मत्तय १२:३१-३२)
शब्द 'निंदा' सामान्यपणे "जाणूनबुजून निरादर" असे व्याखीत केले आहे. हा शब्द अशा पापांना लागू करता येऊ शकतो जसे देवाला शाप देणे किंवा ज्या गोष्टी देवाशी संबंधित आहे त्यास स्वेच्छेने कमी लेखणे.
निंदा हे देवाला काही वाईट गुण लावणे किंवा त्यास काही चांगले गुण नाकारणे जे आपण त्यास गुणविशेष दिले पाहिजे.
निंदा करण्याच्या ह्या विशेष प्रकरणास, तथापि, "पवित्र आत्म्याविरुद्ध निंदा" असे म्हणतात.
परुशी पवित्र आत्म्याच्या कार्यास सैतानाचे गुणविशेष असे म्हणत होते, जरी त्यांना सत्य हे ठाऊक होते आणि त्याचा पुरेसा पुरावा होता. पवित्र आत्म्याविरुद्ध त्यांची निंदा हे देवाच्या कृपेस त्यांचा शेवटचा नकार होता.
येशूने लोकसमुदायास म्हटले की, परुशी लोकांची पवित्र आत्म्याविरुद्ध निंदा ही "ह्या युगात किंवा येणाऱ्या युगात सुद्धा क्षमा केली जाणार नाही" (मत्तय १२:३२). हे आणखी एका प्रकारे म्हणणे आहे की त्यांची पापे ही कदापीही क्षमा केली जाणार नाही. आता नाही, सार्वकालिकते मध्येही नाही.
आज, सतत अविश्वासाची स्थिती ही निंदे प्रमाणे आहे. "पवित्र आत्मा पाप, धार्मिकता व न्याय विषयी तारण न पावलेल्या जगला दोषी ठरवितो" (योहान १६:८). दोषारोप चा प्रतिकार करणे व जाणूनबुजून पश्चातापी न राहणे हे आत्म्याची "निंदा" करणे होय.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, ज्यावेळेस मी तुझ्या आत्म्याला दु:ख दिले आहे मला त्यासाठी क्षमा कर. मला सर्व पापांपासून राख व नेहमी तुझ्याजवळ ठेव. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
पित्या,येशूच्या नांवात,माझ्या कुटुंबाच्या सदस्यांचे डोळे उघड की तुला प्रभु, परमेश्वर व तारणारा असे ओळखावे. त्यांना अंधारातून प्रकाशाकडे वळीव.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या,येशूच्या नांवात, माझ्या हाताच्या कार्याला संपन्न कर. संपन्न होण्याचा अभिषेक माझ्या जीवनावर उतरो.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे स्वास्थ्य, सुटका व चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे राष्ट्रांमध्येउंचाविले व गौरविले जाईल.
पित्या, येशूच्या नांवात, मीकेएसएम च्या प्रत्येक मध्यस्थी करणाऱ्यास येशूच्या रक्ता द्वारे आच्छादित करतो. अधिक मध्यस्थी करणारे निर्माण कर.
देश
पित्या, येशूच्या नांवात,मी प्रार्थना करतो कीभारत देशातील प्रत्येक गाव,शहर, वराज्यातील लोक तुझ्याकडे वळोत. त्यांनीत्यांच्या पापांचा पश्चाताप करावा आणि येशू ख्रिस्ताला त्यांचा प्रभु, परमेश्वर व तारणारा म्हणून स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चर्चला न जाता चर्च ऑनलाईन पाहणे ठीक आहे काय?● ख्रिस्त-केंद्रित घर
● विश्वासासह विरोधकांना सामोरे जाणे
● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे
● चांगले आर्थिक व्यवस्थापन
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● एका भेटीचे सामर्थ्य
टिप्पण्या