तुम्ही कधी अशा परिस्थितीत गेला आहात का की तुम्ही एका गोष्टीची अपेक्षा केली आणि त्यापेक्षा अधिक उत्तम असे मिळाले? हेच जे प्रत्यक्षात सुंदर दरवाजाजवळ बसलेल्या पांगळ्या मनुष्याला झाले. आजची भक्ती या चमत्कारिक कथेमध्ये गढून जाईल की प्रेरणा द्यावी आणि पुष्टी करावी की देवाच्या योजना नेहमी आपल्यासाठी आपण काही मागावे किंवा कल्पना करू शकावे याच्याही पलीकडील असतात. (इफिस. ३:२०)
“पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते” (प्रेषित ३:१). याची नोंद घ्या की पेत्र व योहान हे त्यांच्या आध्यात्मिक शिस्तीसाठी जाणीवपूर्वक असे होते. प्रार्थनेसाठी त्यांची निश्चित वेळ होती, दानीएलासारखे, जो दिवसातून तीन वेळा प्रार्थना करीत असे (दानीएल ६:१०). नववा प्रहर हा दुपारच्या आपल्या ३ वाजल्यासारखा आहे. यहूदी लोकांसाठी ही दररोजची संध्याकाळची अर्पणे आणि प्रार्थनेचा वेळ होता आणि वधस्तंभावर येशूच्या मरण्याची वेळ होती. तुमच्या प्रार्थना जीवनातील सुसंगतता चमत्कार घडण्यासाठी परिस्थिती तयार करतात.
पांगळ्या माणसाला “दररोज उचलून मंदिराच्या सुंदर दरवाजाजवळ ठेवत असत” (प्रेषित ३:२). सुंदर दरवाजा हे आपल्या जीवनातील ठिकाणांचे रूपक म्हणून काम करते जेथे आपण अडकलेले आहोत, तरीही ते आपल्याला अद्भुत असे वाटतात. आत्मसंतुष्ट होणे आणि आपल्या जीवनासाठी देवाच्या सर्वोत्तमपेक्षा कमी स्वीकारणे सोपे आहे.
जेव्हा त्या माणसाने भीक मागितली, तेव्हा पेत्राने त्याला आज्ञा दिली की, “आमच्याकडे पाहा” (प्रेषित ३:४). कधीकधी आपण आपल्या कमतरतेवर किंवा समस्यांवर इतके लक्ष केंद्रित करतो की आपण उपाय चुकतो. यशया ६०:१ म्हणते, “ऊठ प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे.” पेत्राची इच्छा होती की त्या माणसाने त्याचे लक्ष त्याच्या परिस्थितीपासून ते उपायाकडे केंद्रित करावे- कृतीमध्ये विश्वास.
“मग पेत्र म्हणाला, “माझ्याजवळ सोनेरूपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग” (प्रेषित ३:६). माणूस नाण्यांची अपेक्षा करत होता पण परिवर्तन प्राप्त केले जे पैसे विकत घेऊ शकत नव्हते. हे देवासारखे नाही का? आपण काय विचार करतो, आपल्याला कशाची गरज आहे त्यापेक्षा तो आपल्याला अधिक आणि त्याही पलीकडील देतो, जेव्हा येशूने पाण्याचे द्राक्षारस केले तेव्हासारखेच; केवळ कोणताही द्राक्षारस नाही, तर उत्तम द्राक्षारस. (योहान २:१-१०)
“आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यांत तत्काळ बळ आले” (प्रेषित ३:७). जेव्हा देव कार्य करतो, तेव्हा परिवर्तन हे तत्काळ होऊ शकते. येथे एक शक्तिशाली उदाहरण आहे: माणसाला त्याच्या नशिबात एक स्पर्श, प्रेरणेची गरज होती. तुम्हांला तुमच्या जीवनात पेत्र किंवा योहान आहेत का, कोणीतरी जो तुम्हांला प्रेरणा देईल?
“तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला; आणि तो चालत, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला” (प्रेषित ३:८). माणूस केवळ चालू लागला नाही, तर तो उड्या मारत होता! त्याच्या धाडसी विश्वासात काहीतरी अतुलनीय प्रगल्भ असे होते. दाविदासारखा, त्याला आनंद आवरता येऊ शकत नव्हता, जो त्याच्या सर्व शक्तीने प्रभूसमोर नाचला होता. (२ शमुवेल ६:१४)
आज, जर तुम्ही स्वतःला तुमच्या स्वतःच्या “सुंदर दरवाजाजवळ” पाहता, मात करण्यासाठी केवळ पुरेशी अपेक्षा ठेवून, तर तुम्ही वर पाहा. देवाकडे तुमच्यासाठी अधिक आहे. ही वेळ आहे की उठावे आणि योहान १०:१० मध्ये त्याने अभिवचन दिलेल्या विपुल जीवनात चालावे, “मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ति विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.”
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, आमच्या जीवनातील “सुंदर दरवाजे” ओळखण्यासाठी आम्हांला मदत कर, जेथे आम्ही कमीसाठी स्थिर झालेलो आहोत. उठावे, चालावे आणि विश्वासात झेप घेण्यासाठी आम्हांला समर्थ कर जेणेकरून आमच्या कथा कदाचित इतरांना प्रेरणा देतील की तुझा शोध घ्यावा. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या वचनात बदल करू नका● मान्ना, पाट्या आणि काठी
● गौरव आणि सामर्थ्याची भाषा-जीभ
● तुमची प्रतिक्रिया काय आहे?
● पृथ्वीचे मीठ
● कुटुंबात चांगला वेळ घालवा
● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या