आपण सर्वांनी ही म्हण ऐकली असेन, “”अडथळे हे यशस्वी होण्यासाठी स्थिति आहे”. परंतु जेव्हा आपण संकटात अडकतो तेव्हा त्याची सुखद बाजू पाहणे कठीण असते. आज मी तुमच्या जीवनावर भविष्य करतो की तुमचा अडथळा हा तुमचा पराभव नसेल परंतु त्याऐवजी दैवी वळण जे तुम्हांला काहीतरी मोठे करण्यासाठी स्थिर करेल.
अडथळ्यांचे स्वरूप समजून घेणे
जीवनात, अडथळे हे विविध स्वरुप व प्रकरात येऊ शकतात –नोकरी गमावणे, तुटलेले नातेसंबंध, आणि अयशस्वी प्रकल्प. तत्काळ नंतरचे परिणाम अनेकदा आपल्याला विचलित करून टाकतात, आपल्या योग्यतेवर आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. तरीही, बायबल रोम. ८:२८ मध्ये काय सांगते त्याची आठवण केली पाहिजे, “ परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.”
प्रेषित पौलसाठी अडथळे हे नवखे नव्हते. तुरुंगात टाकण्यापासून ते तारू तुटण्यापर्यंत, त्याने असंख्य अडथळ्यांचा सामना केला परंतु प्रत्येकाचा काहीतरी मोठ्यासाठी एक पायरी म्हणून वापर केला. २ करिंथ. ४:८-९ मध्ये, पौल स्पष्ट करतो, “आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही.”
सामना करण्यासाठी धोरणे
अडथळ्यांना यशामध्ये बदलण्याच्या आपल्या प्रवासात, आपण प्रथम आपला दृष्टीकोन व्यवस्थित केला पाहिजे. शेवटी, पेत्र तोपर्यंत पाण्यावर चालला जोपर्यंत त्याने त्याचे डोळे येशूवरून हटवले नाही आणि वारा आणि लाटांवर लक्ष केंद्रित करू लागला (मत्तय १४:२९-३१). जेव्हा आपण आपल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतो, ते दुर्गम असे वाटतात. तथापि, आपले लक्ष देवाकडे वळविण्याने, आपण गोंधळाच्या स्थितीत शांती प्राप्त करू शकतो.
याकोब १:२-४ आपल्याला सांगते, “माझ्या बंधुंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो; आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” तुमच्या अडथळ्यांना परीक्षा म्हणून पाहा, जे तुमच्यामध्ये काहीतरी महान असे उत्पन्न करेल. एक नवीन योजना बनवा आणि प्राप्त केले जाणारे लक्ष्य स्थित करा.
तुमच्या पुनरागमनाकडे नेणारा प्रवास
जेव्हा अडथळ्यांचा सामना करत आहात, येथे विशेषेकरून दोन मार्ग आहेत ज्यांचे अवलंबन लोक करतात: धैर्य सोडून देणे किंवा त्यात यश मिळवावे. योसेफाची कथा ही नंतरच्या गोष्टीसाठी एक विलक्षण उदाहरण आहे. त्याच्या स्वतःच्या भावांकडून गुलामिगीरीत विकला गेलेला, चुकीने तुरुंगात टाकलेला, आणि ज्यांना त्याने मदत केली ते त्याला विसरले होते, योसेफाने बहुगुणीत अडथळ्यांचा सामना केला. तरीही, त्याने कधीही धैर्य सोडले नाही आणि देवाच्या योजनेवरील विश्वास गमावला नाही. शेवटी, तो सत्तेच्या पदावर उन्नत करण्यात आला, केवळ त्याच्या कुटुंबाला वाचविले नाही तर दुष्काळापासून संपूर्ण राष्ट्राचा बचाव केला. (उत्पत्ती ४१)
तुमच्या आशीर्वादांची गणना करत सुरुवात करा, मग ते कितीही लहान दिसणारे असोत. योसेफाप्रमाणे तुमच्या परीक्षा अनेक वर्षे चालू शकतील परंतु छोट्या विजयांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका. शेवटी, दाविदाने गल्ल्याथचा एका लहान दगडाने पराभव केला होता. (१ शमुवेल १७:४९-५०)
प्रत्येक यश आपल्या पुनरागमनाच्या दिशेने एक पाऊल म्हणून साजरे करा. तुमचा “दगड’ दिवसभरातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज, नवीन चैतन्याने सकाळी उठण्याइतके सोपे असू शकते. काहीही असो, त्यास तुमच्या जीवनात देवाच्या कार्याचे प्रमाण म्हणून स्वीकारा.
पुनरागमनाचा परमेश्वर
आपण पुनरागमनाच्या देवाची सेवा करतो. त्याने लाजराला मृत्युमधून उठविले (योहान ११:४३-४४), गंभीर परीक्षांनंतर इयोबाची मालमत्ता पूर्ववत केली (इयोब ४२:१०), आणि सर्वात महत्वाचे, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे मृत्यूला पराजित केले (मत्तय २८:५-६). तुमच्या अडथळ्यांचे स्वरूप कसेही असो, लक्षात ठेवा की तुम्ही त्या देवाची सेवा करता जो परिस्थितीला बदलण्यात विशेष असा आहे.
प्रार्थना
पित्या, आम्हांला अधिक अविश्वसनीय गोष्टींसाठी दैवी वळण म्हणून अडथळ्यांना पाहण्याचे सामर्थ्य दे. आमचा विश्वास व चिकाटीला प्रज्वलित कर, आम्हांला ही आठवण देत की तू पुनरागमनाचा परमेश्वर आहे, परीक्षांना विजयात बदलतो. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आध्यात्मिक अभिमानाचा सापळा● एक मृत व्यक्तिजिवंत व्यक्तींसाठी प्रार्थना करीत आहे
● ४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
● दोष लावलेल्या गोष्टी काढून टाक
● प्रतिभेपेक्षा चारित्र्य
● मत्सराच्या आत्म्यावर प्रभुत्व मिळविणे
● देण्याने वाढ होते - 1
टिप्पण्या