“तथापि त्याने प्रथम फार दू:ख भोगावे व ह्या पिढीकडून नाकारले जावे ह्याचे अगत्य आहे.” (लूक १७:२५)
प्रत्येक प्रवासाला त्याचे पर्वत व दऱ्या असतात. आपल्या विश्वासाचा प्रवास त्याहून काही वेगळा नाही. देवाचे राज्य स्थापित करणारा ख्रिस्ताचा मार्ग हा सरळ आणि अरुंद नव्हता तर त्याऐवजी त्रास आणि नकाराने भरलेला होता. त्याचे अनुयायी म्हणून, आपल्याला देखील, याची आठवण दिली आहे की आध्यात्मिक वाढ आणि परिवर्तनाचा आपला मार्ग हा नेहमी आव्हानात्मक क्षेत्रातून पुढे जाईल.
“परंतु त्याने, प्रथम दू:ख भोगले पाहिजे.... .” यात गहन सत्य लपलेले आहे. अनेकदा, आपल्याला राज्याच्या वैभवाचा आनंद घेण्याची इच्छा असते की अडचणींचा सामना न करता देवाची उपस्थिती, आशीर्वाद आणि कृपा अनुभवावी. परंतु देव, त्याच्या अमर्यादित ज्ञानामध्ये, आपल्याला याची आठवण देतो की पुनरुत्थान घडण्यासाठी, येथे प्रथम वधस्तंभी जाण्याची गरज आहे.
रोम. ८:१७ मध्ये प्रेषित पौल यावर जोर देतो, “आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दू:ख भोगत असलो तरच.” ख्रिस्ताच्या दू:खात सहभागी होणे म्हणजे वधस्तंभाच्या मूलतत्वाला समजणे –त्याग, प्रीती आणि उद्धाराच्या महत्वाला समजणे.
“त्याने अनेक गोष्टींचे दू:ख भोगले पाहिजे “. ते केवळ एक आव्हान, नाकाराचे एक कृत्य, किंवा एकदा विश्वासघाताचे कृत्य नव्हते. आपल्या पापांचा भार, आणि जगाची निराशा ही त्याच्यावर होती. यशया ५३:३ आपल्याला आठवण देते, “तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही.” त्याचे दू:ख अनेक पटींनी होते, त्या प्रत्येकांनी आपल्यावरील देवाच्या अतुलनीय प्रेमाची साक्ष दिली.
होय, येशूने प्रत्येक आव्हानांना अढळ विश्वासाने तोंड दिले, देवाची इच्छा आणि मानवतेसाठी त्याची प्रीती यासाठी त्याच्या समर्पणाची साक्ष होती. त्याचे दू:ख भोगणे ही केवळ एक घटना नव्हती, तर ती भविष्यवाणी पूर्ण करणारी होती, तारणाच्या भव्य रचनेतील एक गुंतागुंतीचा तुकडा.
“...या पिढीकडून नाकारले गेला.” हे एक अद्भुत असे नाही का की नेहमी, आपल्यातील सर्वोत्कृष्ट लोकांना सर्वाधिक टीका सहन करावी लागते? ज्याप्रमाणे प्रकाश अंधाराला दूर करतो, येशूच्या शिकवणीची शुद्धता आणि शहाणपणाने त्याच्या काळातील प्रस्थापित नियमांना धोका निर्माण केला होता. त्याच्या क्रांतीकरण शिकवणींनी, प्रीती, क्षमा आणि सेवेवर जोर दिला, हे अनेकांना स्वीकारण्यास फारच मूलगामी असे होते. जसे योहान ३:१९ म्हणते, “निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.”
आपण त्याचे अनुयायी म्हणून, अशा नकारांपासून सुरक्षित नाहीत. जेव्हा आपण ख्रिस्ता-समान जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जग कदाचित आपली निंदा करेल, आपल्याला चिन्हित करेल, किंवा आपल्याला दूर ढकलून देईल. परंतु आपण योहान १५:१८ मधील येशूच्या वचनाची आठवण केली पाहिजे, “जग जर तुमच्या द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हांला माहित आहे.” नाकार हा आपल्या अपयशाचे चिन्ह नाही परंतु प्रभू येशूने आपल्यासाठी दिलेल्या मार्गावर आपण चालत आहोत याची पुष्टी आहे.
दू:ख भोगण्याचा आणि नाकाराचा हा मार्ग स्वीकारणे म्हणजे वेदनेचा शोध घेणे नाही आणि स्वतःसाठी दया अनुभवणे असे नाही. याचा अर्थ हे ओळखणे की संकटे ही येतील, आणि जेव्हा ती येतात, तेव्हा शक्तीसाठी देवावर अवलंबून राहावे. याचा अर्थ हे समजणे की नाकार आणि आव्हाने ही शुद्ध करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहेत , जे आपल्याला आध्यात्मिक दिग्गज बनवते आणि ख्रिस्ताच्या प्रतिमेत बनवते.
आपल्या संकटांमध्ये, चला आपण ख्रिस्ताच्या प्रवासाचे स्मरण करू या. त्याचे दू:ख भोगणे हा शेवट नव्हता परंतु त्याचा अर्थ ते महान गौरवासाठी होते. कालवरीच्या दुसऱ्या बाजूला रिकामी कबर होती. नाकाराच्या दुसऱ्या बाजूला स्वर्गारोहण होते. मृत्युच्या दुसऱ्या बाजूला सार्वकालिक जीवन होते. त्याचप्रमाणे, आपल्या दू:खाच्या दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक वाढ, सखोल विश्वास, आणि आपल्या तारणाऱ्यासह एक घनिष्ठ नातेसंबंध आहे.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र येशूच्या पावलांवर पाऊल ठेवत चालत असताना, आणि आव्हानांचा विश्वास आणि आशेसह सामना करताना आम्हांला मार्गदर्शन कर. दू:ख भोगण्याच्या आणि नाकाराला तोंड देण्याची क्षणी, ख्रिस्ताचा प्रवास आणि आमच्या संकटांच्याही पलीकडे जे गौरव आहे त्याची आम्हांलाआठवण दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुम्ही किती मोठ्याने बोलू शकता?● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले
● समाधानाची शास्वती दिली गेली आहे
● भूतकाळाच्या कबरेत पडून राहू नका
● नरक हे खरे स्थान आहे
● जबाबदारीसह परिपक्वता सुरु होते
● इतरांची सेवा करण्याद्वारे आशीर्वाद जो आम्ही अनुभवितो
टिप्पण्या