english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. वचनाचा प्रभाव
डेली मन्ना

वचनाचा प्रभाव

Saturday, 9th of December 2023
26 20 1362
Categories : बायबल भविष्यवाणी शहाणपण हुशार माणसे
“१ हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की, २ “यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत” (मत्तय २:१-२).

जेव्हा आपण त्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा ते खूपच आश्चर्यकारक आहे: ज्ञानी लोकांचा गट किंवा मागी लोक, जवळजवळ पूर्वेकडून प्रवास करत आहेत-सहसा पर्शिया- की नवीन जन्माला आलेल्या यहूद्यांच्या ख्रिस्ताला शोधावे. यहूदी लोकांच्या भविष्यवाणीबद्दल त्यांनी इतकी काळजी का करावी? असो, येथे गोष्टी मनोरंजक होत जातात.

हे केवळ कोणतेही ज्ञानी लोक नव्हते. त्यांच्यासाठी मूळ हिब्रू शब्द हा ‘मागोस” हा आहे, याचा अर्थ ते सहसा विद्वान किंवा जादुगारपेक्षा अधिक असे होते. त्यांना कदाचित तारे, ग्रह आणि कदाचित थोडी जादूची माहिती होती. आता, बायबलमधून दानीएलाची आठवण करा? त्याला बाबेलमध्ये बंदी बनवून नेले होते आणि तेथे सर्व जादुगारांमध्ये तो श्रेष्ठ झाला होता. जेव्हा पर्शियाने बाबेलवर मात केली, दानीएल त्याच्या कार्यावर स्थिर होता.

म्हणून, हे शक्य आहे की या मागी लोकांना दानीएलच्या लिखाणात, किंवा यहूद्यांच्या येणाऱ्या ख्रिस्ताबद्दलच्या शिकवणी सहज उपलब्ध होत्या. कल्पना करा की हे विद्वान प्राचीन ग्रंथांचे चिंतन करत आहेत, आणि मग अचानक, एक नवीन रहस्यमय तारा प्रकट होतो. याची जुळवणी करत, त्यांनी कदाचित हा विचार केला असेन, “हेच ते आहे. हे ते चिन्ह आहे ज्याबद्दल दानीएल बोलत होता!”

म्हणून त्यांनी त्यांच्या बॅगा भरल्या आणि प्राचीन प्रवासाला निघाले, ताऱ्याला पाहत प्रवास केला की त्या बाळाला शोधावे जो राजा होणार होता. आणि केवळ कोणताही राजा नाही, पण ख्रिस्त ज्याच्याबद्दल त्यांनी वाचले होते.

ते आकर्षक नाही का? यहूदी विद्वान, जे प्रथम जाणणारे होतील असे तुम्हांला वाटेल, पण ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा त्यांना सावध केले गेले.  परंतु पर्शियन मागी लोक असे नाही! हे मागी लोक दानीएलाच्या शिकवणीमध्ये गहन अध्ययन करत होते, ज्याने येणाऱ्या ख्रिस्ताबद्दल भाकीत केले होते. हे जवळजवळ त्यासारखे होते की त्यांना काहीतरी माहित होते जे स्थानिक लोकांना माहित नव्हते.

गुप्त रस काय आहे? हे देवाच्या वचनाचे परिवर्तनीय सामर्थ्य आहे. बायबलनुसार, “.... पवित्र शास्त्राची माहिती आहे ...... ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे” (२ तीमथ्यी ३:१५). हे मागी लोक यहूदी नव्हते, परंतु ते एकत्र होते कारण त्यांनी दानीएल, जो यहूदी संदेष्टा, जे त्याने लिहून ठेवले होते त्याच्या शिकवणीचा अभ्यास करण्यास वेळ दिला होता.

म्हणून, आपण काय शिकू शकतो? ज्ञान हे केवळ विद्वानांसाठी किंवा धार्मिक अंतर्दृष्टी असणाऱ्यांसाठी नाही. हे कोणालाही उपलब्ध आहे जो पवित्र शास्त्रातून शोध घेण्यास इच्छुक आहे. जर तुम्ही देवाच्या वचनासाठी तुमचे मन व हृदय उघडता, तेव्हा तुम्ही देखील, खरोखर महत्वाच्या मार्गांनी शहाणे होऊ शकता.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझ्या वचनाच्या बक्षीसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो जे आम्हांला तारणासाठी ज्ञानी बनवते. आमचे डोळे उघड, जसे तू मागी लोकांसाठी केले, की चिन्हे व अद्भुते पहावीत जे आम्हांला ख्रिस्ताकडे नेतील. आपण बुद्धी आणि विश्वासाने वाढत असलेल्या आपल्या शिकवणींचा परिश्रमपूर्वक अभ्यास करू आणि लागू करू या. येशूच्या नावाने. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस १२
● स्वैराचारास पूर्ण उपाय
● मुळा बद्दल विचार करणे
● दिवस ३५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● वातावरणावर महत्वाची समज - २
● अग्नि हा पडला पाहिजे
● तुमच्या सुटकेला कसे राखून ठेवावे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन