मागी लोकांतील एक आहात अशी कल्पना करा, एक खगोलीय घटनेनंतर एक फसविणारा प्रवास करणे आणि यरुशलेममध्ये शेवट होणे. मग, राजा हेरोद गुप्तपणे तुम्हांला बोलावतो. त्याला या असामान्य ताऱ्याचे सव्विस्तर वर्णन हवे असते ज्याने तुम्हांला मार्गदर्शन केले. त्याहूनही अधिक, तो तुम्हांला त्या बाळाचा शोध घेण्यास आणि त्याची वार्ता सांगावी असे म्हणतो म्हणजे तो देखील त्याची उपासना करेन. (मत्तय २:८)
याक्षणी तुम्ही कदाचित हा विचार कराल की, हेरोदासह तुम्हांला एक साथीदार मिळाला आहे, ज्याकडे सत्ता आहे आणि त्याला देखील या नवीन जन्मलेल्या राजाचा सन्मान करायचा आहे. पण मग एक दैवी स्वप्न येते-एक दैवी इशारा तुम्हांला सांगत आहे की हेरोदाकडे परत जाऊ नये (मत्तय २:१२). तुम्ही द्विधामनस्थितीत आहात. तुम्हांला राजाचा आदर करायचा आहे किंवा तुम्हांला स्वप्नानुसार वागायचे आहे? मागी लोकांनी पुढील गोष्ट निवडली, आणि “दुसऱ्या मार्गाने’ त्यांच्या स्वतःच्या देशाला निघून गेले.
का? हे सर्व काही देवाची आज्ञा पाळण्याबद्दल आहे, एक शीर्षक जे वारंवार बायबलमध्ये ठळकपणे मांडले आहे. यशया १:१९ मध्ये, आपण वाचतो, “तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल.” आणि प्रेषित ५:२९ मध्ये प्रेषित घोषित करतो, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”
मागी लोकांच्या आज्ञाधारकपणाने त्यांना हेरोदाने रचलेल्या सापळ्यापासून दूर नेले, आणि त्यांना दैवी इच्छेबरोबर एक केले. राजाचा अवमान करण्यासाठी किती धैर्य लागते याची कल्पना करा! ही कृती बायबलसंबंधी एक महत्वपूर्ण सिद्धांत अधोरेखित करते: देवाची आज्ञा पाळण्याने खरे शहाणपण येते, मग ते गैरसोयीचे किंवा धोकादायक असले तरी. जसे नीतिसूत्रे ३:५-६ म्हणते, “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.
तर, मग येथे आपल्यासाठी कोणती शिकवण आहे? देवाची आज्ञा पाळण्यासाठी नेहमी आपल्याला ‘दुसऱ्या मार्गाचे” अवलंबन करण्याची आवश्यकता असते- तो मार्ग जो जगाला कदाचित मूर्खपणाचा किंवा धोकादायक असा दिसत असतो. त्यात पारंपारिक निवडीच्या विरोधात जावे, न्यायासाठी खंबीर उभे राहावे, किंवा सत्य बोलावे जेव्हा शांत राहणे हे सोपे असते अशा गोष्टींचा समावेश असू शकतो. मागी लोक, परदेशातील विद्वान हे प्रमुख उदाहरण आहेत की जेव्हा तुम्ही देवाच्या निर्देशाचे आज्ञापालन करता, तेव्हा तुम्ही दैवी शहाणपणाशी समरूप होता जे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतीप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निदर्भ असे आहे.” (याकोब ३:१७)
देवाचे ज्ञान नेहमी मानवी समजुतीला गोंधळात टाकते. ते आपले आरामदायक क्षेत्र,आणि आपल्या परिस्थितीला आव्हान देते, पण आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेते (१ करिंथ. १:२५). जेव्हा तुम्ही स्वतःला गोंधळाच्या स्थितीत पाहता, तेव्हा मागी लोकांची आठवण करा आणि ‘दुसऱ्या मार्गाचा’ विचार करा –दैवी ज्ञानाची आणि आज्ञाधारकपणाची कृती. तुमचा आज्ञाधारकपणा हा तुमच्या विश्वासाची साक्ष आहे, प्रेषित पौलाच्या म्हणण्याचा पुनरुच्चार करते, “आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही.” (२ करिंथ. ५:७)
प्रार्थना
पित्या परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रती आज्ञाधारक असण्यासाठी आम्हांला धैर्य दे, जरी जेव्हा ते कठीण किंवा गैरसोयीचे असते. आपण मागी लोकांप्रमाणे व्हावे, तुझ्या मार्गदर्शनाला ऐकण्याचे शहाणपण असावे आणि मार्गहीन प्रवास करावा, हा भरवसा ठेवून की ते आमच्या जीवनासाठी तुझ्या सिद्ध योजनेकडे नेईल. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रचलित अनैतिकतेमध्ये स्थिर राहणे● त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
● काहीही लपलेले नाही
● दिवस १५ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● २१ दिवस उपवासः दिवस ०२
● धैर्यवान राहा
● ते व्यवस्थित करा
टिप्पण्या