"अन्य भाषेत बोलणे हे सैतानी आहे" हे एक खोटेपण शत्रू विश्वासणाऱ्यांसमोर आणतो, आणि प्रभूने जे दैवी दान त्यांना दिले आहे ते त्यांच्यापासून हिरावून घेण्यास पाहतो. आपल्यासाठी हे किती महत्वाचे आहे की सत्याची पारख करावी आणि आपल्या स्वतःला देवाच्या वचनाच्या द्वारे संरक्षित करावे, नाहीतर आपण या फसवणुकीला बळी पडतो. बायबल, आपले दिशानिर्देश, आपल्याला या खोट्या समजुतीपासून मार्गदर्शन करते, आणि आपल्या मार्गाला प्रज्वलित करते.
सर्वात मोठा खोटेपणा #१: अन्य भाषेत बोलणे हे सैतानी आहे
सैतान, जो खोट्यांचा बाप आहे (योहान ८:४४), या खोटेपणाची कुजबुज करतो की अन्य भाषेच्या स्वर्गीय सुसंगतपणासाठी आपल्या आध्यात्मिक कानाला मंद करावे. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याद्वारेच अन्य भाषेत बोलणे किंवा प्रार्थना करण्याच्या या सामर्थ्यशाली दानाला आपण प्राप्त करतो. "तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले" (प्रेषित २:४).
प्रेषित पेत्र आणि पौल, ख्रिस्ताचे स्थिर अनुयायी, यांनी या दानाला स्वीकारले आणि तसेच प्रारंभीच्या चर्चला या वरदानांना आचरणात आणण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी शिकवले की अन्य भाषेमध्ये बोलणे हे सैतानी आत्म्याने पछाडले जाणे नाही परंतु एक दैवी सहवास आहे, सर्वशक्तिमानबरोबर एक आध्यात्मिक संवाद आहे, तो जो आपल्या आत्म्यात उन्नती करतो आणि आपला विश्वास मजबूत करतो. "कारण अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे, तर देवाबरोबर बोलतो; कारण ते माणसाला समजत नाही; तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो" (१ करिंथ. १४:२).
सर्वात मोठा खोटेपणा #२: ते प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी नाही
हे वरदान केवळ विशेषाधिकारप्राप्त लोकांसाठी आहे हा गैरसमज म्हणजे नरकाच्या खड्ड्यांतून निर्माण झालेला आणखी एक खोटारडेपणा. प्रेषित पौलाने, त्याच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये, अशी इच्छा व्यक्त केली की प्रत्येक विश्वासणाऱ्याने अन्य भाषेमध्ये बोलावे, कारण आध्यात्मिक उन्नती आणि सुरक्षितता जे ते आपल्या आत्म्यासाठी आणते हे त्याने ओळखले. (१ करिंथ. १४:५).
अन्य भाषेचे दान हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे, एक आध्यात्मिक भाषा जी मानवी मर्यादांच्या अडथळ्यांना मोडते आणि आपल्या आत्म्यांना आपला प्रभू जो निर्माणकर्ता याबरोबर एक करते. हे दान आपल्याला सक्षम करते की आपल्या मानवी सीमा पार कराव्या आणि देवाबरोबर त्या भाषेमध्ये बोलावे जे मानवी अपूर्णतेने अशुद्ध केलेले नाही.
शत्रूच्या खोटेपणावर विश्वास ठेवणे हे देवाने आपल्यासाठी तयार केलेल्या आध्यात्मिक संगीतबद्ध लयीमध्ये व्यत्यय आणणाऱ्या विसंगत चालीला होऊ देण्यासारखे आहे. अन्य भाषेमध्ये बोलणे हे आध्यात्मिक परिपक्वतेचे परिमाण नाही परंतु आध्यात्मिक परिपक्वतेचा प्रवास आहे, देवासोबतच्या आपल्या संबंधात सतत वाढण्याची प्रक्रिया आणि विकास आहे.
जेव्हा आपण या दैवी दानाला स्वीकारतो, आपले आत्मे हे आत्म्याच्या फळाद्वारे समृद्ध होतात, जे आपल्याला देवाची प्रतिमा अधिक अचूकपणे प्रतिबिंबित करण्यास सक्षम करते. (गलती. ५:२२-२३) हे खोट्यापासून सत्य ओळखण्यासाठी आपल्यासाठी महत्वाचे आहे. असे केल्याने, आपण केवळ शत्रूच्या खोटेपणाचा नकार करत नाही परंतु आपल्या स्वर्गीय पित्याच्या अमर्यादित प्रीती आणि अपार कृपेसाठी देखील आपले हृद्य उघडतो.
म्हणून आपण काय करण्याची आवश्यकता आहे हे येथे आहे. दररोज, अन्य भाषेत बोलण्यासाठी वेगळा वेळ निश्चित करा. जेव्हा आपण हे करतो, तेव्हा पवित्र आत्मा आपल्या पावलांना मार्गदर्शन करत आहे, आपल्या अंत:करणांना सुचना देत आणि आपल्याला संपूर्ण सत्यात मार्गदर्शन करत आहे हे आपण पाहणार आहोत.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आम्ही शत्रूच्या खोटेपणाला धमकावतो आणि पवित्र आत्म्याच्या दानाला स्वीकारतो. जेव्हा आम्ही आमच्या स्वर्गीय भाषेमध्ये संवाद साधतो, आमच्या आत्म्याला तुझ्या आत्म्यामध्ये एक करतो तेव्हा आम्हांला पारख आणि विश्वासाने भर. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-२● परमेश्वराला तुमचा बदला घेऊ दया
● मनुष्यांची परंपरा
● दिवस २१ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-1
● तुमचे मार्गदर्शन कोण करीत आहे?
● ईश्वरीय शिस्तबद्धतेचे स्वरूप-२
टिप्पण्या