आपल्या चर्च व सेवाकार्यांमध्ये, आपण सतत त्या परिस्थितींना सामोरे जातो जे उदारपणा, कारभारीपण आणि विश्वासाच्या आपल्या समजुतीला आव्हान देते. असे एक दृश्य हे जेव्हा सहकारी विश्वासू आर्थिक साहाय्यासाठी मागणी करतात. जरी आपले हृदय आपल्याला देण्यासाठी प्रेरणा देत असले, तरी या क्षणात शहाणपण आणि पारख ही महत्वाची आहे.
बायबल आपल्याला शिकवते की उदार आणि दयाळू बना, जसे नीतिसूत्रे १९:१७ मध्ये पाहिले जाते, “जो दरीद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील.” तथापि, अनेक वर्षांमध्ये, मी हे पाहिले आहे की चर्चकडून सतत उधार घेणे हे जटील परिस्थितीकडे नेऊ शकते. काही वैयक्तिक लोक, दुर्दैवाने, सहकारी विश्वासणाऱ्यांच्या दयाळूपणाचा फायदा घेतात, परत न देता सतत उधार घेत राहतात, सतत संघर्ष आणि दुखावत राहतात. हे आचरण केवळ संबंधात तणाव निर्माण करत नाही परंतु चर्चमधील शांतीला देखील अडथळा करू शकते.
पवित्र शास्त्र या विषयावर मार्गदर्शन पुरवते. स्तोत्र. ३७:२१ स्पष्ट करते, “दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही; नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो.” दान देण्याचे कृत्य आणि उधार घेण्याच्या कृत्यांमधील मुलभूत फरकावर हे वचन जोर देते. उधार देणे परत फेड करण्याची अपेक्षा करते आणि कर्तव्याचे बंधन निर्माण करू शकते, तर देणे हे परत फेडची अपेक्षा केल्याशिवाय स्वतंत्र इच्छेचे कृत्य आहे.
उदार असणे याचा अर्थ हा नाही की सामान्य ज्ञानाचा आपल्याला अभाव आहे. शहाणपणासाठी प्रार्थना करणे हे महत्वाचे आहे, जसे याकोब १:५ आपल्याला सल्ला देते, “जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो.” हे ज्ञान आपल्याला पारख करण्यास साहाय्य करते की केव्हा द्यावे, किती द्यावे आणि ते कोणाला द्यावे. देवाने जे स्त्रोत आपल्याकडे सोपविले आहे त्याच्या कारभारीपणासह मदत करण्याच्या आपल्या इच्छेला संतुलित करण्याविषयी आहे.
चर्चचे सभासद म्हणून, ऐक्यता आणि शांती जतन करण्याविषयी आपण एक भूमिका पार पाडतो. इफिस. ४:३ आपल्याला आग्रह करते, “आत्म्याच्या द्वारे घडून आलेलेल ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा.” जेव्हा वारंवार उधार घेण्याच्या परिस्थितीला सामोरे जाता, तेव्हा त्यांना प्रीती, शहाणपणाने हाताळणे महत्वाचे आहे आणि कदाचित उपाय करण्यासाठी चर्चच्या नेत्यांना त्यात सामील करावे जे चर्चमध्ये शांतीचे वातावरण सांभाळून ठेवेल. जे व्यक्ती वारंवार उधार घेतात अशा व्यक्तींना तुम्ही पाहिले तर, पाळकांना ही गोष्ट गुप्तपणे सांगण्याची तुमची जबाबदारी आहे. तुमचे त्वरित कृत्य बराच त्रास वाचू शकते.
आपल्या विश्वासाचा प्रवास उदार तरीही शहाणे असावे यासाठी पाचारण करतो. जेव्हा आपण ह्या पाण्यातून दिशा काढतो, चला आपण हे लक्षात ठेवू या की आपला अंतिम भरवसा आणि विसंबून राहणे हे केवळ देवावर आहे, जो आपल्या सर्व गरजांची पूर्तता करणारा आहे.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, आमच्या दानधर्म करण्यात आम्हांला मार्गदर्शन कर आणि शहाणपणासह आमच्यात उदारपणाचा आत्मा घाल. आमच्या कृत्यांमध्ये तुझी प्रीती आणि कृपा प्रतिबिंबित करण्यासाठी आम्हांला मदत कर. आमची बक्षिसे तुझ्या आशीर्वादाचे बीज होवोत, जे इतरांच्या हृदयात वाढत राहो. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पेंटेकॉस्ट चा उद्देश● ख्रिस्तासाठी राजदूत
● सात-पदरी आशीर्वाद
● दिवस २४:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● सार्वकालिक निवेश
● दिवस १० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● आशीर्वादाचे सामर्थ्य
टिप्पण्या