एक महान म्हण आहे जी अशाप्रमाणे आहे, "खाऱ्या पाण्यात बुडवलेली उत्तम तलवारसुद्धा शेवटी गंजून जाते." हे क्षयेची एक ज्वलंत प्रतिमा सादर करते, अगदी सर्वात मजबूत सामग्रीवर वेळ आणि पर्यावरणाच्या अथक शक्तींची आठवण करून देते. ज्याप्रमाणे घटक शक्तिशाली पाते नष्ट करू शकतात, तर जग सर्वात दृढ विश्वासणाऱ्याला देखील कमकुवत करू शकते जर त्यांनी पुरेशी काळजी घेतली नाही.
"देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या." (रोम. १२:२)
आपण ज्या जगात संचार करतो ते खाऱ्या पाण्यासारखे आहे – जे मोह, अडथळे आणि आव्हानांनी भरलेले आहे जे आपल्या आध्यात्मिक अखंडतेला धोका निर्माण करतात. आपल्याला निष्क्रिय नाही तर आपली आध्यात्मिक तीक्ष्णता टिकवून ठेवण्यास सक्रीय होण्यासाठी बोलावले आहे.
काही क्षणाकरता पात्याचा विचार करा. त्याची रचना एका उद्देशासाठी केली आहे, आणि जेव्हा त्यास धार केली जाते, तेव्हा ते मोठ्या गोष्टी प्राप्त करू शकतात. त्याचप्रमाणे, आपल्याला एका उद्देशाने निर्माण केले आहे, आणि आपला आध्यात्मिक धारदारपणा, जेव्हा सांभाळला जातो, तेव्हा दैवी योजना प्राप्त करू शकतो.
"आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली." (इफिस. २:१०)
तथापि, दक्षता न घेता- जगाचे खारे पाणी- मग ते हानिकारक नातेसंबंध असो, हानिकारक सवयी असो किंवा जबरदस्त नकारात्मकता असो-आपल्याला रखडून ठेवण्यास सुरु करू शकते. ते कदाचित सूक्ष्मपणे सुरु होऊ शकते, परंतु काही कालांतराने, ते अत्यंत आध्यात्मिक क्षय निर्माण करू शकते.
म्हणून, मग आपण आपले आध्यात्मिक पाते कसे सांभाळू शकता आणि ते गंजू नये म्हणून संरक्षण करू शकता?
१. नियमितपणे आध्यात्मिक धार लावणे:
"आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ." (इब्री. १०:२४)
वचन वाचणे, उपासना आणि संगतीमध्ये सतत व्यस्त राहणे याची खात्री देते की आपली आध्यात्मिक धार तीक्ष्णच राहते. देवाचे वचन हे आमचे ध्येय आहे, जे आमचे उद्धिष्ट आणि दिशा सुधारते आणि सन्मानित करते.
२. हानिकारक वातावरणाचा दीर्घकाळ संपर्क टाळणे:
ज्याप्रमाणे तरवारीला खाऱ्या पाण्यात नाही सोडले पाहिजे, त्याप्रमाणेच आपण आपल्या स्वतःला त्या परिस्थितीमध्ये गुरफटून घेण्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे जे आपल्याला देवापासून दूर नेतात. १ करिंथ. १५:३३ मध्ये पौल आपल्याला स्मरण देतो, "फसू नका, "कुसंगतीने नीति बिघडते." आध्यात्मिक रक्षणासाठी आपल्या वातावरणाचे रक्षण करणे हे महत्वाचे आहे. असे काही विश्वासणारे आहेत ज्यांना निंदा करणाऱ्यांशी संगती करणे आवडते, जे देवाच्या सेवकांविरुद्ध घाण बोलत असतात. फारच लवकर, असे विश्वासणारे त्यांची धार गमावतात.
३. नियमित आध्यात्मिक देखभाल:
प्रत्येक तरवारीला नियमित स्वच्छता आणि काळजीची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे, आपल्या आत्म्यांना, सतत चिंतन आणि पश्चातापाची आवश्यकता असते. स्तोत्र. ५१:१० मध्ये दाविदाची विनंती, याची सुंदररित्या नोंद करते: "हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल." नियमितपणे देवाकडून स्वच्छता आणि नवीनीकरणाचा शोध घेणे गंजण्यापासून दूर ठेवते.
४. सक्रीय वापर:
एक तरवार सहसा गंजत नाही जेव्हा तिचा सक्रियपणे वापर करतात. त्याचप्रमाणे, देवाच्या राज्यामध्ये सक्रीय सेवेत असलेला एक आत्मा हा चकचकीत आणि धारदार राहतो. "ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे" (याकोब २:१७). सक्रीय विश्वास हा जिवंत, गंजण्यास प्रतिकार करणारा विश्वास आहे.
या सर्वांमध्ये, हे दिलासा देणारे आहे हे स्मरणात ठेवणे की जरी गंज लागत आहे असा भाग आपल्याला सापडला, तरी तो शेवट नाही. देवासोबत पुनर्स्थापना ही नेहमीच शक्य आहे. संदेष्टा योएल देवाच्या अभिवचनाचा पुनरुच्चार करतो, " ...झुंडींनी येणाऱ्या टोळांनी ......ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला मी भरपाई करून देईन..... " (योएल २:२५). आपला परमेश्वर हा पुनर्स्थापित करणारा आहे, आणि कोणत्याही प्रमाणातील गंजणे हे त्याच्या दुरुस्तीबाहेर नाही.
प्रार्थना
पित्या, आमच्या आत्म्यांचे जगाच्या क्षयापासून रक्षण कर. आमच्या उद्देशाला परीक्षेच्या विरोधात एक पाते म्हणून तीक्ष्ण कर. तुझ्या ज्ञानामध्ये, आम्ही दक्ष असे राहावे, आणि गंजण्याच्या क्षणी, आम्हांला तुझ्या पुनर्स्थापित करणाऱ्या कृपेचे स्मरण दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चांगले यश काय आहे?● त्याचे दैवी दुरुस्तीचे दुकान
● धार्मिकतेचे वस्त्र
● दैवी भेट देण्याचा तुमचा क्षण ओळखा
● विश्वासाने चालणे
● देवदूताचे साहाय्य कसे सक्रीय करावे
● दीर्घ रात्रीनंतर सूर्योदय
टिप्पण्या