english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. प्रतिभेपेक्षा चारित्र्य
डेली मन्ना

प्रतिभेपेक्षा चारित्र्य

Friday, 20th of October 2023
26 15 1135
Categories : Character Choices Commitment Discipline Leadership
इतिहासाच्या बखरीमध्ये, अब्राहम लिंकन एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून दिसतात, अमेरिकेच्या सर्वात गोंधळाच्या काळात केवळ त्यांच्या नेतृत्वासाठी नाही, परंतु मानवी स्वभावाच्या त्यांच्या सखोल आकलनासाठी. त्यांचे म्हणणे, “जवळजवळ सर्व पुरुष संकटांना तोंड देऊ शकतात, परंतु जर तुम्हांला एखाद्या माणसाचे चारित्र्य तपासायचे असेल, तर त्यास सत्ता द्या, तेव्हा पुण्यवान व्यक्ती असण्याचा अर्थ काय आहे याच्या सखोलतेला भेदते.

जग, अनेकदा आपल्याला प्रतिभेच्या प्रदर्शनाने चकित करते. विक्रम मोडणाऱ्या खेळाडूंपासून हृदयास स्पर्श करणाऱ्या संगीतकारांपर्यंत, प्रतिभा साजरी केली जाते, त्यास दर्शवले जाते आणि त्यास पूजनीय देखील केले जाते. तरीही या यशाच्या पृष्ठभागाखाली काहीतरी अधिक गहन, अधिक टिकाऊ असते: चारित्र्य.

“....मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७)

जगमगत्या प्रकाशात प्रतिभा चमकू शकते परंतु सावलीमध्ये चारित्र्य बनविले जाते. ह्या त्या निवडी आहेत ज्या आपण करतो जेव्हा कोणीही पाहत नाही; प्रेक्षकांशिवाय त्याग ज्यास आपण स्वीकारतो  आणि कोणतीही प्रशंसा नसतानाही आपण प्रामाणिकपणा राखतो. आमची वरदाने आणि प्रतिभा आम्हांला या जगाचे व्यासपीठ आणि टप्पे देऊ शकतात, त्याचवेळेस आपण तेथे किती काळ राहू आणि आपण सोडलेला वारसा हे आपले चारित्र्य ठरवते.

“चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय; प्रेमयुक्त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे.” (नीतिसूत्रे २२:१)

आपले चारित्र्य आपल्या क्षमतेपेक्षा मोठ्याने बोलते. हे होकायंत्र आहे जे आपल्या निर्णयांना मार्गदर्शन करते, आपल्या वादळातील नांगर, आणि आपण पुढे चालवणारा वारसा आहे. जसे नीतिसुत्रेचा लेखक स्पष्ट करतो, “नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जिवास वश करतो” (नीतिसूत्रे ११:३०). चारित्र्याचे फळ केवळ आपले पोषण करत नाही परंतु ते जे आपल्यानंतर येतात त्यांचेही करते.

पण असे मायावी चारित्र्य आपण कसे बनवावे?

चारित्र्य हे अनेकदा आव्हानांच्या अतिशय कठीण परिस्थितीत बनवले जाते. सोप्या चुकीच्या ऐवजी कठीण योग्य निवडण्याच्या शांत क्षणांमध्ये आहे. हे शहाणपण आणि समज शोधण्यात आहे, जरी जेव्हा जग जवळचा मार्ग पुरवते. 

“वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतीप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निदर्भ असे आहे.” (याकोब ३:१७)

जेव्हा आपण धार्मिक ज्ञानाचा स्वीकार करतो, तेव्हा आपले चारित्र्य दैवी सिद्धांताशी एकरूप होतात. हे अपयश किंवा चुका टाळण्याबद्दल नाही परंतु ज्या प्रत्येकवेळी आपण पडतो तेव्हा उठणे, शिकणे, वाढणे आणि देवाच्या कृपेवर अवलंबून राहण्याबद्दल आहे.
आपण जीवनात प्रवास करत असताना, आपल्या आकांक्षा आपल्या क्षेत्राच्या शिखरावर पोहचणे किंवा मोठे टप्पे गाठणे असू शकते.

तरीही, हे लक्षात ठेवा की जीवनांवर खरेच प्रभाव टाकण्यासाठी, पुसून न टाकले जाणारे चिन्ह मागे सोडण्यासाठी, आपण अधिक करण्यावर प्राधान्य दिले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या चारित्र्याला वाढवतो, तेव्हा आपण समविचारी व्यक्तींसाठी चुंबक असे होतो. लोक प्रामाणिकतेकडे आकर्षित होतात, त्यांच्याकडे ज्यांचे बोलणे त्यांच्या कृतीसारखे असते, ज्यांची आश्वासने पाळली जातात, आणि ज्यांचे जीवन ख्रिस्ताचे प्रेम आणि कृपेने भरलेले आहे.

“तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा.” (कलस्सै. ३:१२)

अशा जगाची कल्पना करा जेथे लोक भारदस्तपणापेक्षा चारित्र्याला, शैलीपेक्षा मुलतत्व, आणि प्रभावापेक्षा अखंडतेला महत्व देतात. ख्रिस्ताचे प्रकाश वाहक म्हणून, आपल्याला सौभाग्य  आणि जबाबदारी आहे की आदर्शाने नेतृत्व करावे. असे होवो की आपली जीवने ही साक्ष होवो, आणि देवाने ज्या प्रतिभा आपल्याला दिल्या आहेत केवळ त्यानेच नाही परंतु चारित्र्य जे त्याने आपल्यात बनवले आहे.
प्रार्थना
पित्या, प्रतिभेपेक्षा चारीत्र्यास प्राधान्य देण्यासाठी आम्हांला शहाणपण प्रदान कर. असे होवो की आमच्या जीवनांनी तुझ्या हृदयास प्रतिबिंबित करावे, तुझ्या कृपेच्या जवळ यावे. निवडीच्या क्षणात आम्हांला मजबूत कर जेणेकरून आमचा वारसा चिरस्थायी अखंडतेचा असू शकेल. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● तुमचा गुरु कोण आहे - I
● ख्रिस्ती लोक डॉक्टर कडे जाऊ शकतात काय?
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे # 2
● चमत्कारीक कार्य करणे: मुख्य बाब #२
● भेट देणे व प्रकटीकरण देण्यामध्ये
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-१
● दैवी शांति मध्ये प्रवेश कसा मिळवावा?
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन