english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. गहनता शोधणे, केवळ प्रदर्शन नाही
डेली मन्ना

गहनता शोधणे, केवळ प्रदर्शन नाही

Friday, 27th of October 2023
16 16 1561
Categories : Intimacy with God Motive Spiritual Walk
“येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला; कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती, आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहायला मिळेल अशी त्याला आशा होती.” (लूक २३:८)

आपल्या आधुनिक जगात, मनोरंजनाचे आकर्षण सर्वत्र आहे. सामाजिक माध्यम सनसनाटी, तत्काळ समाधान आणि लक्षवेधी प्रदर्शानांवर भरभराट करते. हे विसरणे सोपे आहे की जीवनातील खऱ्या खजिन्यासाठी अनेकदा प्रासंगिक दृष्टीक्षेपापेक्षा जास्त आवश्यक असते; त्यास खोल, हेतुपुरस्सर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

हेरोद एक असा मनुष्य होता ज्याच्याकडे महत्वपूर्ण अधिकार आणि प्रभाव होता आणि त्याला प्रभावशाली आणि अपवादातात्मक गोष्टी अनुभवण्याची सवय होती. तो ज्या समाजात राहत होता त्याच्या नजरेत त्याच्याजवळ ते सर्व होते. जेव्हा शेवटी त्याला येशूला भेटण्याची संधी मिळाली, ते आत्मज्ञान किंवा आध्यात्मिक वाढीसाठी नव्हते; ते मनोरंजनासाठी होते. हेरोदासाठी, येशू हा एक उत्सुकता, एक आकर्षक व्यक्तिमत्व, जो कदाचित त्याचे मनोरंजन करू शकतो असा होता. परंतु, ख्रिस्त, देवाचा पुत्र, तेथे मनोरंजन करण्यासाठी नव्हता.

“मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना.” (योहान १४:१०-११)

प्रभू येशूने अवश्य चमत्कार केले; परंतु त्याच्या प्रत्येक कृत्यांमध्ये एक गहन आध्यात्मिक अर्थ होता. ती प्रभावित करण्यासाठी याइच्छिक कृत्ये नव्हती; ती एक उद्देश पूर्ण करणाऱ्या कृत्यांच्या क्रियांची गणना होती-की देवाला गौरव द्यावे, त्याच्या संदेशाची पुष्टी करावी आणि गरजेत असलेल्या लोकांन साहाय्य करावे. ख्रिस्ताचे चमत्कार हे प्रीती व ज्ञानाचे प्रकटीकरण होते.

“मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.” (१ करिंथ. १३:१-३)

आपण, देखील, अनेकदा जगाच्या चकचकीतपणात अडकलेले असतो, वरवरच्या आध्यात्मिकतेमध्ये समाधानी असतो जे केवळ वैयक्तिक आराम व मनोरंजन शोधतात. आपल्या नातेसंबंधात, कारकिर्दीत आणि विश्वासातही, आपण चमत्कारिक, आणि अपवादात्मक शोधतो, देवाच्या स्थिर, प्रेमळ उपस्थितीचे कौतुक करण्यात अयशस्वी होणे जे नेहमी तेथे असते, जे फक्त एक क्षणभंगुर देखाव्यापेक्षा अधिक काही देत नाही.

“जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.” (मत्तय ५:८)

आपल्या जीवनात खरेच “देवाला पाहण्यासाठी”, तो कोण आहे त्यासाठी आपण त्याचा धावा केला पाहिजे, तो आपल्यासाठी काय करू शकतो त्यासाठी केवळ नाही. याचा अर्थ हा नाही की आपण चमत्कार किंवा अद्भुत चिन्हांची आशा करू शकत नाही; त्याचा अर्थ आपले प्राथमिक लक्ष देवासोबत गहन, टिकणारे संबंध बनवण्याचे असले पाहिजे. मग चमत्कार स्वतःमध्येच संपत नाहीत तर प्रेम आणि भक्तीमध्ये खोलवर रुजलेल्या विश्वासाची पुष्टी बनतात.

मला तुम्हांला विचारू द्या. देवाचा शोध तुम्ही जे नातेसंबंधाचे खोलवरील नाते तो देतो त्यासाठी करता का किंवा तुम्ही क्षणाच्या वरवरच्या स्पर्शामध्ये समाधानी आहात का? देवाच्या प्रेमाच्या महासागरात खोलवर जाण्यासाठी स्वतःला आव्हान द्या- जेथे खरे चमत्कार घडतात-केवळ देखाव्यात नाही तर बदललेल्या जीवनात.
प्रार्थना
पित्या,  चमत्कार जे तू करू शकतो केवळ त्यासाठी नाही, तर तू कोण आहे त्यासाठी तुझा धावा करण्यास मला मदत कर. तुझ्यासोबत गहन समज आणि नातेसंबंधात मला मार्गदर्शन कर, जेणेकरून माझा विश्वास हा देखाव्यात मुळावलेला नसावा परंतु प्रामाणिक प्रेम आणि भक्तीमध्ये. येशूच्या नावाने. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● जेव्हा तुम्ही युद्धात आहात: समज
● त्याला सर्व सांगा
● याची प्रत्यक्ष पर्वा आहे काय?
● त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
● देवाने-दिलेले स्वप्न
● दिवस २७:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● उपासना: शांतीसाठी किल्ली
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन