भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. (स्तोत्र १३९:१४)
परमेश्वराने प्रत्येक मनुष्यास ह्या पृथ्वीवर निर्माण केले आहे की काहीतरी विशेष असे पूर्ण करावे जे इतर कोणीही पूर्ण करू शकत नाही. हे महत्वाचे आहे की तुम्ही हे सत्य समजावे.
तुमची आणि माझी रचना काहीतरी विशेष कार्यासाठी केली आहे. तुम्हाला आणि मला काहीतरी करावयाचे आहे ज्याने कोणास आपल्याला विसरता येणार नाही. तुम्हाला आणि मला काहीतरी करावयाचे आहे की जगाला त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
बायबल त्यांची नोंद करते, जे दिसण्यास साधारण असे लोक होते ज्यांनी जगावर छाप पाडली व त्याकडे पाहावयास लावले.
एक उदाहरण राहाब चे आहे, एक वेश्या, तिने तिच्या जीवनाचा धोका पत्करला त्या लोकांसाठी ज्यांस ती ओळखत सुद्धा नव्हती. तीचा जन्म जणू काय यहोशवाच्या हेर ला लपविण्यासाठीच झाला होता जेणेकरून इस्राएली लोक यरीहो चा पाडाव करतील. (यहोशवा २:६ पाहा.)
मध्यस्थी चे हे एक भविष्यात्मक कार्य होते. तुम्ही सुद्धा मध्यस्थी करणाऱ्या संघाचा हिस्सा होऊ शकता. तुम्ही माझ्यासाठी दररोज मध्यस्थी करू शकता. मला ठाऊक आहे हे फारच उदासीन असे वाटेल व आकर्षक असे वाटणार नाही परंतु त्यास देवाच्या दृष्टीसमोर मोठे मूल्य आहे.
मत्तय मधील वंशावळी नुसार (मत्तय १:५), राहाब ने नंतर यहूदा येथील एका मनुष्याशी विवाह केला व ती बवाज ची आई झाली. तुम्हाला ठाऊक आहे काय की राहाब ही आपल्या प्रभु येशूच्या वंशावळी मध्ये आहे? आता मग ह्यालाच मी कृपा म्हणतो.
नवीन करारात, आपण एका स्त्री ची गोष्ट वाचतो जिने सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन येशूच्या मस्तकावर अभिषेक केला.
ही स्त्री धैर्यवान होती की त्यावेळी जे पुरुष भोजनासाठी एकत्र जमले होते त्यांच्यामध्ये जाऊन त्यासमयीच्या सामाजिक संस्कृतीच्याही पलीकडे जाऊन कार्य केले. येशू साठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने तरीही आपले समर्पण केले होते, परिणामाचा विचार केला नाही.
तेथे हजर असणाऱ्यांपैकी काहींनी तिची गंभीरपणे टीका केली कारण तिने महागडे सुगंधी तेल येशू वर "वाया घालविले" होते, जेव्हा ते सामाजिक कार्य करण्यासाठी विकता आले असते. तरीही येशूने त्यांना म्हटले, "हिच्या वाटेस जाऊ नका,.......सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल." (मार्क १४: ६, ९)
याची पर्वा नाही की कार्य हे किती लहान असेन, जर तुम्ही तुमच्या संपूर्ण मनाने ते कराल, तर ते विसरले जाणार नाही.
त्यासाठी स्वर्ग तुमच्यावर आदराचा वर्षाव करेल.
अंगीकार
मी स्वतः प्रभु मध्ये आनंद करीन, आणि तो मला माझ्या मनाप्रमाणे देईन. ख्रिस्ता मध्ये, मी मस्तक आहे, शेपूट नाही.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-२● रागाची समस्या
● स्वप्न हे देवाकडून आहे हे कसे ओळखावे
● तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर पडा
● राज्यात नम्रता आणि सन्मान
● हन्ना च्या जीवनाकडून शिकवण
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
टिप्पण्या