डेली मन्ना
दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Wednesday, 13th of December 2023
49
38
1270
Categories :
उपास व प्रार्थना
“मी मरणार नाही, तर जगेन, आणि परमेशाच्या कृत्यांचे वर्णन करीन.” (स्तोत्र. ११८:१७)
देवाची आपल्यासाठी ही इच्छा आहे की आपल्या नशिबाला पूर्ण करावे आणि चांगले वृद्ध होऊन मरावे. आपल्या जीवनासाठी त्याच्या इच्छेत अकाली निधन होणे किंवा आजार, वेदना, वाईट आणि रागांनी भरलेले आयुष्य असावे या गोष्टी समाविष्ट नाहीत.
मृत्यू म्हणजे ‘वेगळे होणे किंवा शेवट होणे” आहे. सैतान आपल्याला देवापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतो आणि पृथ्वीवरील आपल्या दैवी नियुक्तीस संपविण्याचा उद्देश ठेवतो; आपण सक्तीने याचा प्रतिकार केला पाहिजे आणि त्याच्या शस्त्राला नष्ट केले पाहिजे.
तीन मुख्य प्रकारचे मृत्यू आहेत:
१. आध्यात्मिक मृत्यू:
आध्यात्मिक मृत्यू तेव्हा होतो जेव्हा देवाचा आत्मा मनुष्याच्या आत्म्यापासून वेगळा होतो. पहिला मृत्यू जो आदाम आणि हव्वेने अनुभविला तो आध्यात्मिक मृत्यू होता; त्यांना देवाच्या आत्म्यापासून वेगळे केले गेले होते. “पण बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ती २:१७)
२. शारीरिक मृत्यू:
शारीरिक मृत्यू हा आत्म्याचे भौतिक शरीरातून वेगळे होणे आहे.
आदामाने आध्यात्मिक मृत्यूचा अनुभव केल्यानंतर, त्याला शारीरिक मरणाचा अनुभव करण्यासाठी ९३० वर्षे लागली पण शारीरिक मृत्यू हा आध्यात्मिक मृत्यूचा परिणाम होता जो त्याने देवाची अवज्ञा केल्यावर अनुभवला. “आदाम एकंदर नऊशे तीस वर्षे जगला; मग तो मरण पावला.” (उत्पत्ती ५:५)
३. सार्वकालिक मृत्यू
सार्वकालिक मृत्यू हा तेव्हा घडतो जेव्हा मानवाचा आत्मा कायमचा देवाच्या आत्म्यापासून वेगळा केला जातो, त्यावर उपाय नसतो.
“७ म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल; ८ तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. ९.........तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.” (२ थेस्सलनीका. १:७-९)
‘युगानुयुगाचा नाश’ या वाक्प्रचाराकडे लक्ष द्या.
“परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल, हेच ते दुसरे मरण आहे” (प्रकटीकरण २१:८). दुसरा मृत्यू हा सार्वकालिक मृत्यू आहे.
अकाली निधनाची कारणे
अकाली निधन हे तेव्हा घडते जेव्हा कोणीतरी त्यांचे संभाव्य कार्य पूर्ण करण्यापूर्वी निधन पावतो; काही लोक ज्यासाठी त्यांनी श्रम केले त्याचा आनंद घेण्याच्या क्षणी निधन पावतात. हे सर्वकाही सैतानाच्या कार्याला प्रकट करते (मारणे, हिरावून घेणे आणि नाश करणे, योहान. १०:१० पाहा).
१. पापी जीवनशैली
“२० आखानाने यहोशवाला उत्तर दिले की, ‘मी खरोखर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे; आणि मी जे केले ते हे: २१ लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, दोनशे शेकेल रूपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या, तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या; पाहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत, व रूपे खाली आहे.”
२५ यहोशवा म्हणाला, ‘तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.’ मग सर्व इस्राएलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले. २६ त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला; ह्यावरून त्या स्थळाला आजवर आखोर (त्रास देणारी) खिंड म्हणत आले आहेत. (यहोशवा ७: २०-२१, २५-२६)
आखान त्याच्या भयंकर पापामुळे अकाली निधनाने मरण पावला.
देवाच्या वचनाची सतत अवज्ञा आणि पापी जीवनशैली मृत्यूला आकर्षित करू शकते, मृत्यू प्रकट होण्यापूर्वी त्यासाठी काही वेळ लागू शकतो, पण ते नक्कीच घडणार असते.
२. मनुष्यांचा दुष्टपणा
“त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी पाजळली आहे; सात्विकाला एकांतात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटू शब्दांचा नेम धरला आहे.” (स्तोत्र. ६४:३)
“मग काइनाचे त्याचा भाऊ हाबेल ह्याच्याशी बोलणे झाले; आणि असे झाले की ते शेतात असता काइनाने आपला भाऊ हाबेल ह्याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले.” (उत्पत्ती ४:८)
मनुष्याचे अंत:करण हे दुष्ट विचार आणि स्वार्थी हेतूंनी भरलेले आहे. मनुष्यांच्या अंत:करणातील दुष्टाई त्यांचे प्रियजन आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांना मारण्यास कारणीभूत ठरते.
३. आध्यात्मिक आक्रमण
“१७ पुढे अलीशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला गर्भ राहिला आणि वसंतऋतू पुनरपि आला तेव्हा तिला पुत्र झाला. १८ तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करत होते तेथे तो बाहेर कापणाऱ्यांकडे आपल्या बापाकडे गेला. १९ तो आपल्या बापाला म्हणाला, ‘अरेरे! माझे डोके! माझे डोके!’ त्याने आपल्या चाकराला सांगितले, ‘ह्याला त्याच्या आईकडे उचलून ने.’ २० त्याने त्याला त्याच्या आईकडे नेले; तो दोन प्रहरपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला. (२ राजे ४:१७-२०)
या उताऱ्यातील मुलगा कोणत्याही शारीरिक कारणावाचून मरण पावला. त्याचे डोके आणि आरोग्यावर हे आध्यात्मिक आक्रमण होते. जुन्या करारात, सैतानी शक्तीचे कार्य पाहिले गेले आहे पण समजले गेले नाही. नवीन करारात, ख्रिस्ताने अंधाराच्या गुप्त कार्यांना प्रकट केले आणि आपल्याला ह्या दुष्ट सैतानी शक्तींवर अधिकार दिला (लूक. १०:१९). आध्यात्मिक बाण हे दररोज उडत असतात, आणि देवाच्या साहाय्यावाचून, लोकांचे कधीही बळी जाऊ शकतात. “रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, ...ह्यांची तुला भीती वाटणार नाही.” (स्तोत्र. ९१:५-६)
आध्यात्मिक शारीरिकतेवर नियंत्रण ठेवते आणि शारीरिक क्षेत्रात काहीही घडण्यापूर्वी त्यावर निष्कर्ष काढला पाहिजे आणि आध्यात्मिक क्षेत्रात अंमलात आणले पाहिजे. मृत्युच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी शक्ती लागते. दावीद राजा शौलाकडून मृत्युच्या अनेक सापळ्यातून निसटला पण हाबेल हा निष्पाप होता आणि तरीही काइनाद्वारे मारला गेला. (१ शमुवेल १८:११-१२; उत्पत्ती ४:८). निष्पाप लोक मरू शकतात जेव्हा ते शक्तिहीन आणि अज्ञानी असतात.
आज, आपण प्रार्थना करणार आहोत आणि आपल्याला मारण्यासाठी रचलेल्या प्रत्येक योजनेस नष्ट करू. मी तुमच्या जीवनावर भविष्यवाणी करतो: तुम्ही मरणार नाही, पण येशूच्या नावाने दैवी नशीब पूर्ण कराल. तुमच्या जीवनातील काहीही मरणार नाही, येशूच्या नावाने.
प्रार्थना
तुमच्या मनातून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच मग पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार करा, त्यास वैयक्तिक करा आणि कमीत कमी १ मिनिटासाठी तसे प्रत्येक प्रार्थना मुद्द्याबरोबर करा.)
१. माझा पिता, माझा घडवणारा, तू जे जीवन मला दिले आहे त्यासाठी मी तुझे आभार मानतो आणि तुला आशीर्वाद देतो. हे परमेश्वरा, मी तुझी उपासना करतो. (स्तोत्र.१३९:१४)
२. पित्या, तुझ्या मार्गात चालण्यासाठी आणि तुझे विधी पाळण्यासाठी माझ्या कुटुंबियांना व मला तुझी कृपा प्रदान कर. या जिवंतांच्या भूमीत येशूच्या नावाने आमचे आयुष्य वाढीव. (अनुवाद ५:३३)
३. यहोवा एबीनेजर, आयुष्यभर आम्ही तुझे भय धरावे म्हणून माझ्या कुटुंबियांना व मला तुझी कृपा प्रदान कर. येशूच्या नावाने. (नीतीसूत्रे ९:१०)
४. माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना व मला मारण्यासाठी तयार केलेले प्रत्येक आजार आणि रोग, येशूच्या नावाने नष्ट होवो. (निर्गम २३:२५)
५. माझ्या शरीरात लावलेले वाईट, ज्याची रचना मला अकाली मारण्यासाठी केली आहे, ते पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे नष्ट केले जावे. (यशया ५४:१७)
६. प्रत्येक विचित्र करार आणि शाप जे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनाला कमी करू शकते, ते येशूच्या रक्ताने, येशूच्या नावाने नष्ट केले जावे. (गलती. ३:१३)
७. मृत्यूचे कोणतेही बाण आणि काळोखात फिरणारी महामारी हे मला व माझ्या प्रियजनांना येशूच्या नावाने कधीही शोधू शकणार नाहीत. (स्तोत्र. ९१:५-६)
८. येशूच्या नावाने या जिवंतांच्या भूमीत देवाचे गौरव घोषित करण्यासाठी मी मरणार नाही, तर जगेन. (स्तोत्र. ११८:१७)
९. देवाच्या पुनरूत्थानाचे सामर्थ्य, येशूच्या नावाने माझ्या जीवनातील कोणतेही मृत गुणधर्म जिवंत करेल. (रोम. ८:११)
१०. येशूच्या नावाने माझ्या जीवनातील कोणत्याही मृत आणि आशाहीन परिस्थितीवर मी जीवन बोलत आहे. (वित्त, मुले, व्यवसाय इत्यादी वर बोला) (यहेज्केल ३७:५)
११. तुमच्या प्रार्थनांच्या उत्तरांसाठी देवाचे आभार माना. (येथे चांगला वेळ घालवा) (फिलिप्पै. ४:६)
१२. स्वर्गीय पित्या, आव्हानाच्या मध्य तुझ्यावरील माझा विश्वास आणि भरवसा मजबूत कर. प्रत्येक परिस्थितीत तुझा हात पाहण्यास मला मदत कर, हे जाणून की ते जे तुझ्यावर प्रीती करतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून तू कल्याणकारक करतो. येशूच्या नावाने. (रोम. ८:२८)
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वर तुमच्या शरीरा विषयी काळजी करतो काय● विश्वासाद्वारे कृपा प्राप्त करणे
● पेंटेकॉस्ट साठी वाट पाहणे
● कोठवर?
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
● आशीर्वादाचे सामर्थ्य
● जेव्हा तुम्ही युद्धात आहात: समज
टिप्पण्या