डेली मन्ना
दिवस १० :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Wednesday, 20th of December 2023
40
26
1306
Categories :
उपास व प्रार्थना
दैवी दिशेचा आनंद घेणे
“मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” (स्तोत्र. ३२:८)
देवाने आपल्याला अंधारात राहू दिले नाही. तो आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे. जर आपली इच्छा असेल की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावे, तर आपण “तयार आणि आज्ञाधारक” असले पाहिजे (यशया १:१९). त्याच्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी तो आपल्यावर जबरदस्ती करणार नाही कारण त्याने आपल्याला स्वतंत्र नैतिक एजंट म्हणून निर्माण केले आहे. आपल्याला निवडी करायच्या आहेत आणि प्रत्येक निवडीस परिणाम किंवा आशीर्वाद आहेत.
पर्याय निवडण्यासाठी आपल्या सर्वांना दैवी दिशा हवी आहे; दैवी दिशेशिवाय आपण उत्तम मार्ग निवडू शकत नाही. जीवनाचा योग्य जोडीदार निवडण्यासाठी, व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी, आणि आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी आपल्याला दैवी दिशा हवी असते. मी लोकांबद्दल पुष्कळ कथा ऐकल्या आहेत, जे विमान दुर्घटनेतून वाचले आहेत कारण त्यांनी त्या विमानाने प्रवास करणे सोडले होते.
दैवी दिशा तुम्हांला हे करण्यास सांगेल
योग्य ठिकाणी
योग्य वेळी
योग्य गोष्ट करणे
योग्य लोकांना भेटणे
दैवी दिशेचे कोणते लाभ आहेत?
१. तुम्ही मृत्यू आणि वाईटापासून वाचाल
“मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.” (स्तोत्र. २३:४)
२. तुम्हांला गुप्त खजिन्याकडे नेण्यात येईल.
“तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्राएलाचा देव आहे.” (यशया ४५:३)
३. तुम्ही मोठ्या अधिकाराने कार्य कराल.
दैवी नेतृत्वानुसार आपला आज्ञाधारकपणा आपल्याला अधिकारी म्हणून पदोन्नत करतो. जर तुम्ही अधिकारात नाहीत, तर तुम्ही अधिकार चालवू शकत नाही. जेव्हा आपण देवाच्या अधीन होतो तेव्हा सैतान आपला अधिकार ओळखतो. (याकोब ४:७; मत्तय. ८:९-११)
दैवी मार्गदर्शनाचा आपण कसा आनंद घेऊ शकतो?
१. तुमची इच्छा ही देवाच्या अधीन असली पाहिजे
“जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.’ (लूक. ९:२३)
“मला स्वतः होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो; आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो.” (योहान. ५:३०)
“तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.” (१ करिंथ. ९:२७)
२. तुमच्या योजना देवावर सोपवा आणि त्याची वाट पाहा
जर तुम्हांला ऐकण्याची इच्छा आहे, तर तुम्ही वाट पाहण्यास शिकले पाहिजे. देवाने बोलण्यासाठी तुम्ही घाई करू शकत नाही. जेव्हा जेव्हा देव त्याच्या उत्तराला उशीर करतो, हे तुमच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी असते. शौलाने घाईने कार्य केले कारण त्याला वाटले की देव त्याच्या प्रतिसादामध्ये खूपच धीमा आहे, ज्याने त्याचा अस्वीकार करण्याकडे देखील नेले. (१ शमुवेल १३:१०-१४)
“मनुष्याचे मन मार्ग योजते,
पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो. (नीतिसूत्रे १६:९)
३. आत्म्यात प्रार्थना करा
आपल्या कमकुवतपणांमधून एक हा जसे आपल्याला कळले पाहिजे तसे आपल्याला कळत नाही. जेव्हाजेव्हा आपण अन्य भाषेत प्रार्थना करतो, तेव्हा ज्या गोष्टी आपल्या ज्ञानाच्या आणि समजेच्याही पलीकडील आहेत त्यासाठी आपण पवित्र आत्म्याच्या साहाय्यावर विसंबून असतो. जेव्हाजेव्हा तुम्हांला दैवी दिशा हवी असते, तेव्हा तेव्हा आत्म्यात प्रार्थना करण्यात वेळ घालवा, तुमच्या आत्मिक मनुष्याला स्पष्टता दिली जाईल.
“२६ तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्हण्याने मध्यस्थी करतो. २७ आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो.” (रोम. ८:२६-२७)
देव आपल्याला विविध मार्गांनी मार्गदर्शन करू शकतो
१. वचन
त्याच्या मार्गदर्शन करण्याचे प्राथमिक स्त्रोत हे देवाचे वचन आहे. लिहिलेले वचन हे प्रथम बोललेले वचन होते. देवाने ते लेखकांच्या हृदयात बोलले. लिहिलेले वचन हे बोललेल्या वचनासारखेच शक्तिशाली आहे. लिखित वचनाचा अभ्यास करा, आणि तुमचा आत्मा प्रकट केलेले वचन (रीमा) प्राप्त करेल. (योहान. १:१)
२. आंतरिक साक्ष आणि पवित्र आत्म्याची वाणी
आंतरिक साक्ष ही तुमच्या आत्म्यात निर्णयासंबंधी शाश्वती आहे, जे तुम्ही आता करणार आहात. आंतरिक साक्ष ही तुमच्या आत्म्यात, हिरवा प्रकाश, पिवळा प्रकाश आणि लाल प्रकाश सारखी आहे. कधीकधी तुम्हांला निर्णयाबद्दल शांती आहे असे वाटते, इतर वेळेला तुम्हांला भीती वाटते किंवा तुम्ही निर्णय करण्याआधी काही वेळ घ्यावा असे तुम्हांला वाटते. यापैकी अनेकांना “आंतरिक साक्ष” म्हणतात. आंतरिक साक्ष जाणणे आणि पाळण्यासाठी तुम्हांला शिकणे आणि प्रशिक्षण घेतले पाहिजे.
“तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत.” (रोम. ८:१६)
“कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत.” (रोम. ८:१४)
३. ज्ञानी सल्ला
इथ्रोने मोशेला ज्ञानी सल्ला दिला आणि लोकांची व्यवस्था करण्याच्या दररोजच्या तणावावर मात करण्यास त्याने त्याला साहाय्य केले.
“तर आता माझे ऐक; मी तुला सल्ला देतो आणि देव तुझ्याबरोबर असो; ह्या लोकांचा देवासमोर तू मध्यस्थ हो, आणि ह्यांची प्रकरणे देवाकडे ने.” (निर्गम १८:१९)
४. दूताचे प्रकट होणे
देवदूत हे दिशा दाखवण्यासाठी प्रसंगी प्रकट होऊ शकतात, परंतु देवदूत पाहण्याचा धावा करण्यासाठी आपण सावध असले पाहिजे. प्राथमिक मार्ग ज्याद्वारे देवाला आपल्याशी बोलायचे असते ते हे त्याचे वचन आणि त्याचा आत्मा आहे. देवदूताचे कोणत्याही प्रकारे प्रकट होणे हे वचनाच्या अधिकाराच्या अधीन असले पाहिजे. जर देवदूताने जे काही बोलले आहे ते वचनाशी सहमत नसेल, तर आपण अलौकिक प्रकट होण्याचा अस्वीकार करावा आणि वचनाला धरून राहावे. देव हाच एकमेव आहे जो निर्णय घेतो की देवदूत आपल्याला प्रकट होतील की नाही, आपण देवदूताचे दिसण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी प्रार्थना नाही केली पाहिजे.
“३त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून ‘कर्नेल्या,’ अशी आपणास हाक मारत आहे. ४तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, ‘काय महाराज?’ त्याने त्याला म्हटले, ‘तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. ५तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण; त्याला पेत्रही म्हणतात. ६तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]’ ७जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका भक्तिमान शिपायाला बोलावले. (प्रेषित. १०:३-७)
५. स्वप्ने आणि दृष्टांत
जेव्हा आपला आत्मा त्याच्याशी सुसंगत असतो तेव्हा आपण परमेश्र्वराकडुन दैवी नेतृत्व प्राप्त करू शकतो
“ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील.” (योएल २:२८)
आजपासून, तुम्ही येशूच्या नावाने दैवी दिशेचा आनंद घेण्यास सुरु कराल.
पुढील अभ्यासासाठी: अनुवाद ३२:१२-१४; नीतिसूत्रे १६:२५
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१) हे परमेश्वरा, तुझा आत्मा मला काय बोलत आहे ते ऐकण्यासाठी येशूच्या नावाने माझे कान उघड. (प्रकटीकरण २:७)
२) पित्या, शहाणपणाचा आणि प्रकटीकरणाचा तुझा आत्मा मला प्रदान कर, म्हणजे येशूच्या नावाने मी तुला अधिक जाणावे. (इफिस. १:१७)
३) परमेश्वरा, येशूच्या नावाने तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होवो. (मत्तय. ६:१०)
४) परमेश्वरा योग्य मार्ग जो अनुसरावा तो मला दाखव. (स्तोत्र. २५:४-५)
५) तुझ्या इच्छेबाहेर असणारे कोणतेही चुकीचे निर्णय किंवा दिशेपासून वळण्यासाठी येशूच्या नावाने मला मदत कर. (नीतिसूत्रे ३:५-६)
६) परमेश्वरा, माझ्या जीवनात चांगले आणि वाईट पर्यायांची पारख करण्यासाठी माझे आध्यात्मिक डोळे आणि कान उघड. (इफिस. १:१८)
७) देवापासून मला बहकून टाकण्यासाठी आणि मला दूर करण्यासाठी चुकांच्या आत्म्याच्या कार्याला मी येशूच्या नावाने पक्षघाती करतो. (१ योहान. ४:६)
८) पित्या, तुझ्या वाणीची अवज्ञा मी कोणत्याही क्षेत्रात केली असेन त्याची कृपा करून मला क्षमा कर. (१ योहान. १:९)
९) माझे स्वप्नमय जीवन, येशूच्या नावाने वास्तविक होवो. (योएल २:२८)
१०) माझ्या स्वप्नमय जीवनात सैतानी चालाखीला मी येशूच्या नावाने रोखत आहे. (२ करिंथ. १०:४-५)
११) पित्या, दैनंदिन ख्रिस्ती जीवनासाठी शहाणपण आणि पारखण्याचा आत्मा मला कृपा करून प्रदान कर. (याकोब १:५)
१२) जे काही माझ्या कानाला अवरोध करत आहे ते येशूच्या नावाने काढून टाकले जावे. (मार्क. ७:३५)
१३) दैवी मार्गदर्शनासाठी संभ्रम आणि उद्धटपणाच्या आत्म्याला मी येशूच्या नावाने प्रतिकार करतो.
(१ करिंथ. १४:३३)
१४) परमेश्वरा, तुझ्या प्रकाशाने, माझ्या आशीर्वादाच्या ठिकाणी माझ्या पावलांना येशूच्या नावाने आदेश दे. (स्तोत्र. ११९:१०५)
१५) हे देवा, मला फसविण्यासाठी सैतानाद्वारे जे काहीही माझ्या जीवनाभोवती पेरलेले आहे ते येशूच्या नावाने उपटून टाक. (मत्तय. १५:१३)
Join our WhatsApp Channel
Most Read
● पारख उलट न्याय● वचन प्राप्त करा
● वासनेवर विजय मिळवावा
● महानतेचे बीज
● तुम्ही देवाचे पुढील सोडविणारे होऊ शकता
● येशू कडे पाहत
● यासाठी तयार राहा!
टिप्पण्या