डेली मन्ना
दिवस २५:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
Thursday, 4th of January 2024
38
19
787
Categories :
उपास व प्रार्थना
माझी दारे उघडी असावीत
“परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणले..”(प्रेषित. ५:१९)
दरवाजा संबंधी पवित्र शास्त्रात बरेच वृत्तांत आहेत. पवित्र शास्त्रात जे सर्वकाही लिहिलेले आहे ते आपल्या शिकवणीसाठी आहे. दरवाजासंबंधातील त्या वृत्तांतांमधून एक प्रमुख धडा आपण शिकावा अशी देवाची इच्छा आहे. भौतिक क्षेत्राला आध्यात्मिक उलट बाजू आहे, आणि जेव्हा तुम्ही हे तत्व समजता, तेव्हा ते तुम्हांला देवाच्या आशीर्वादाच्या परिपूर्णतेमध्ये चालण्यास साहाय्य करेल.
भौतिक क्षेत्रात दरवाजे महत्वाची भूमिका पार पाडतात. भौतिक क्षेत्रातील दरवाजांच्या कार्यांना समजण्याद्वारे, आपण आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यांना सहजपणे समजून घेऊ शकतो कारण येथे आध्यात्मिक क्षेत्रात देखील दरवाजे आहेत.
दरवाजे ही अडथळा म्हणून कार्य करू शकतात की लोक किंवा वस्तूंना आवाक्याबाहेरच ठेवावे आणि ते हस्तांतरणाचा मुद्दा म्हणून देखील कार्य करू शकतात.
दरवाजांचे काही प्रभाव कोणते आहेत?
१. दरवाजे प्रवेश देतात.
काही लोक व्यवसायात स्पष्टतेबद्दल तक्रार करतात. अद्भुत उत्पन्न आणि सेवेद्वारे त्यांच्याजवळ मोठा व्यवसाय आहे, तरीही त्यांच्याजवळ ग्राहक नाहीत. कधीकधी, हे असे असू शकते की तेथे आध्यात्मिक दार आहे जे त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या व्यवसायाविरोधात बंद केलेले आहे.
चला आपण या वचनाकडे पाहू या.
“७ अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा; पुरातन द्वारांनो, उंच व्हा; म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. ८ हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. ९ अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा; पुरातन द्वारांनो, उंच व्हा; म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. १० हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा.” (स्तोत्र. २४:७-१०)
हे वचन प्रकट करते की येथे आध्यात्मिक दरवाजे आहेत; आणि तेथे त्या दरवाजांना आदेश होता की उंच व्हावे आणि उघडावे. जेव्हा तुमच्या हे लक्षात येते की गोष्टी ह्या सुलभपणे होत नाहीत आणि सर्वकाही व्यत्यय आणि बंद झालेले असे दिसते, तेव्हा तुमचे दरवाजे उघडावेत म्हणून तुम्हांला प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे.
२. लोक जे बंद झालेल्या दरवाजांचा अनुभव करत आहेत ते त्या आव्हानांना सामोरे जातील जसे काही व्यवसाय नाही, इतर व्यवसायाला आकर्षित करण्यासाठी नवीन व्यवसायाच्या संधी नाहीत, विवाह नाही, आणि आयुष्यात इतर अनेक उशीर. या गोष्टींपैकी जेव्हाजेव्हा तुम्ही अनुभव करत आहात, तेव्हा आध्यात्मिक क्षेत्रातील त्या विषयावर उपाय करण्यासाठी तुम्हांला प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे.
“राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे आणावी, त्यांचे राजे तुझ्याकडे मिरवत आणावेत म्हणून तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत.” (यशया ६०:११)
पवित्र शास्त्र प्रकट करते की उघडी दारे संपत्तीकडे नेतात. जर दारे बंद असतील, तर ते मनुष्यांना राष्ट्रांची संपत्ती तुमच्याकडे आणणे अशक्य होऊन जाईल. देवाची ही तुमच्यासाठी इच्छा आहे की तुम्ही उघड्या दरवाजांचा आनंद घ्यावा जेथेकोठे तुम्ही वळण घेता, पण आध्यात्मिक दरवाजांच्या सत्यतेची अज्ञानता तुम्ही जे आनंद घ्याल त्याला मर्यादित करू शकते.
३. देवाजवळ शक्ती आहे की शत्रूने बंद केलेली दारे उघडावीत, आणि कोणताही दरवाजा जे तो उघडतो, शत्रू त्याला बंद करू शकत नाही. देवाने उघडलेले दरवाजे शत्रू बंद करू शकत नाही परंतु तुम्हांला त्यात प्रवेश करण्यापासून तो अडथळा करू शकतो. जसे आपण विचार करतो तितका सैतान शक्तिशाली नाही. तो देवाची एक निर्मिती आहे आणि देवाच्या अधीन आहे. देवाने जे काही केले आहे त्याला रद्द करण्याचा त्याला अधिकार किंवा शक्ती नाही.
पृथ्वीवर येथे दोन शक्तिशाली इच्छा आहेत:
१) देवाची इच्छा आणि
२) मनुष्याची इच्छा.
जेव्हा मनुष्याची इच्छा देवाच्या इच्छेबरोबर समरूप होते, तेव्हा सैतानाच्या योजनेला उधळून लावणे मनुष्याला सोपे होते.
“कारण मोठे व कार्य [प्रभावी] साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी [येथे, एक मोठे आणि अभिवचन असलेले] उघडले आहे; आणि विरोध करणारे [येथे] पुष्कळच आहेत.” (१ करिंथ. १६:९)
प्रेषित पौलाने हे आध्यात्मिक सत्य जाणले जे मी तुम्हांला सांगत आहे. देवाने त्याच्यासाठी एक द्वार उघडले, परंतु त्याने जाणले की त्या द्वाराभोवती तेथे अनेक शत्रू आहेत जे त्याला त्यात प्रवेश करण्यापासून आणि उघड्या दाराचा आनंद घेण्यापासून रोखू शकतात. आज, माझी इच्छा आहे की तुम्ही उघड्या दरवाजांसाठी कळकळीने प्रार्थना करावी. माझा प्रबळ विश्वास आहे की प्रार्थना झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या जीवनात बदल पाहू लागण्यास सुरुवात कराल; नवीन गोष्टी आणि नवीन संधी दिसण्यास सुरु होईल.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. येशूच्या रक्ताने, माझ्या जीवनाच्या विरोधातील प्रत्येक बंद दरवाजा येशूच्या नावाने मी उघडतो. (प्रकटीकरण ३:८)
२. माझ्या दरवाजांना बंद करणाऱ्या कोणत्याही शक्तीला येशूच्या नावाने मी पक्षघाती करतो. (यशया २२:२२)
३. माझ्या उघड्या दरवाजांच्या प्रत्येक शत्रूला येशूच्या नावाने मी बांधून टाकतो. (मत्तय. १८:१८)
४. पित्या, या वर्षात, माझ्यासाठी येशूच्या नावाने मोठे दरवाजे उघड. (१ करिंथ. १६:९)
५. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, आशीर्वाद, उत्सव आणि गौरवाचा माझ्या दरवाजात येशूच्या नावाने मी प्रवेश करतो. (स्तोत्र. २४:७-१०)
६. आजार, रोग, कर्ज आणि दुष्टतेच्या विरोधातील माझ्या जीवनाच्या दरवाजांना येशूच्या नावाने मी बंद करतो. (प्रकटीकरण ३:७)
७. हे परमेश्वरा, तुझी दया मला दाखव आणि येशूच्या नावाने माझ्यासाठी कोणतेही दार उघड ज्यास शत्रूने माझ्या विरोधात बंद केले आहे. (लूक. १:७८-७९)
८. माझे दरवाजे, उघडी राहतील म्हणजे राष्ट्रांची संपत्ती येशूच्या नावाने माझ्याकडे येऊ शकेल. (यशया ६०:११)
९. देवाच्या दूतांनो, उत्तर, दक्षिण पूर्व आणि पश्चिमेला जा, आणि माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या व्यवसायासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मदत आणि आशीर्वादाचे दरवाजे येशूच्या नावाने उघड. (स्तोत्र. १०३:२०)
१०. विपुलता, मदत, आशीर्वाद आणि गौरवाला येशूच्या नावाने मी मागत आहे. (योहान. १०:१०)
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस १६ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● दानधर्म करण्याची कृपा-२
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● प्रभू येशू : शांतीचा स्त्रोत
● छाटण्याचा समय– २
● गुप्त गोष्टी समजून घेणे
● सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी
टिप्पण्या