डेली मन्ना
४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
Friday, 19th of January 2024
30
16
981
Categories :
उपास व प्रार्थना
पायाभूत बंधनापासून सुटका
“आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार?” (स्तोत्र. ११:३)
येथे शक्ती आहेत ज्या पायापासूनच कार्य करतात. पुष्कळ लोक ज्यांना सुटकेच्या ज्ञानाचा अभाव असतो ते ह्या गोष्टींना ओळखू शकणार नाहीत. ह्या वास्तविकता निर्विवाद आहेत, परंतु त्या कार्यांना आपल्या जीवनात आपण अस्वीकार आणि प्रतिकार करू शकतो कारण त्या पराभूत शक्ती आहेत त्या आपल्या जीवनात कार्य नाही केल्या पाहिजेत. ह्या पायाभूत शक्ती कुटुंबातील पद्धतींसाठी जबाबदार आहेत. म्हणूनच तुम्ही भावंडांमध्ये समान वैशिष्ट्यांना पाहता, जसे वैवाहिक विषय, अकाली निधन, किंवा विशिष्ट वयात वारंवार होणारे आजार. पायाभूत शक्ती वंशपरंपरागत पद्धतींवर प्रभाव करतात; ते याची खात्री करतात की पाल्यांचा अनुभव त्यांच्या लेकारांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे.
स्तोत्र. ११, वचन ३, आध्यात्मिक पायाला संबोधित करत होते, घराच्या भौतिक पायाला नाही.
“पाया” हा शब्द बायबलमध्ये ५० वेळा पेक्षा अधिक वेळा दिसतो. पाया महत्वाचा आहे; एका व्यक्तीच्या जीवनात प्रगती करणे किंवा पतन होणे हे त्यांच्या पायामुळे निश्चित होते.
२ तीमथ्य. अध्याय २, वचन १९ स्पष्ट करते की देवाचा भक्कम पाया स्थिर राहतो, आणि जे देवाचे आहेत त्यांनी अधर्मांपासून दूर गेले पाहिजे. देवाचा स्वतःचा पाया आहे. देवाने वंशावळीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे ज्यातून येशू येईल. त्याने पायाचे महत्व समजले होते.
अब्राहामाचा देवाशी जो करार होता ज्याने दाविदाच्या काळापर्यंत पुष्कळ पिढ्यांना सामर्थ्यपूर्ण केले होते. त्याचप्रमाणे, दाविदाच्या कराराने येशूच्या काळापर्यंत पुढील पिढ्यांना सामर्थ्यपूर्ण केले होते. जेव्हा प्रभू येशू आला, त्याने विश्वासणाऱ्यांसाठी एक नवीन पाया आणि कराराची सुरुवात केली. ख्रिस्ताने घातलेल्या पायामध्ये जे काहीही आढळत नाही ते आपल्या जीवनात उपस्थित नाही राहिले पाहिजे.
वेगवेगळ्या कुटुंबांना शक्ती, करार आणि आत्मे प्रभावित करत असतात –ह्या पायाभूत शक्ती आहेत ते व्यक्तीच्या अनुभवांना निश्चित करत असतात. ह्या पायाभूत शक्तींना नष्ट करण्यासाठी प्रार्थना महत्वाची आहे.
पायाभूत शक्ती विनाशकारक सवयींना प्रायोजित करू शकतात, त्यांना पिढ्यांमध्ये पुढे नेत राहतात.
गलतीकरांस. ५, वचन १ विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन देते की ख्रिस्ताने पुरवलेल्या स्वतंत्रतेमध्ये स्थिर उभे राहावे आणि पुन्हा बंधनाच्या ओझ्याने बंधनात जाऊ नये. विश्वासणारे हे पायाभूत शक्तींच्या अधिकाराखाली नाहीत आणि त्यांच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी आणि एखाद्याच्या जीवनात सकारात्मक पद्धती लागू करण्यासाठी प्रार्थना हे साधन होते.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. येशूच्या रक्ताने, माझ्या जीवनाविरुद्ध लढा देणाऱ्या पायाभूत शक्तींना मी संपुष्टात आणत आहे. (प्रकटीकरण १२:११)
२. माझ्या जीवनाविरुद्ध कोणतेही कंत्राट आणि सैतानी करार जे पायाभूत शक्तींना प्रायोजित करत आहेत त्यांना येशूच्या नावाने मी तोडतो आणि नष्ट करतो. (गलती. ३:१३)
३. पिढ्यांच्या शक्तींच्या नकारात्मक प्रभावापासून मी मुक्त होतो. येशूच्या नावाने मी प्रभूचा मुक्त झालेला आहे. (स्तोत्र. १०७:२)
४. माझ्या अनुवांशिकतेमध्ये प्रोग्राम केलेले कोणतेही वाईट, येशूच्या रक्ता, येशूच्या नावाने त्यांना बाहेर काढ. (१ योहान. १:७)
५. पित्या, तुझ्या परिपूर्ण योजनेद्वारे माझ्या जीवनाला येशूच्या नावाने समर्थ कर. (यिर्मया २९:११)
६. माझ्यापासून चांगल्या गोष्टी दूर करणारी प्रत्येक तत्वे आणि शक्तींना येशूच्या नावाने मी बांधून टाकतो. (इफिस. ६:१२)
७. येशूच्या रक्ताने, वाईट कौटुंबिक पायापासून बोलणाऱ्या कोणत्याही विचित्र आवाजाला येशूच्या नावाने मी शांत करतो. (यशया ५४:१७)
८. कोणत्याही कौटुंबिक पद्धती, सवयी आणि चुकांना येशूच्या नावाने मी तोडतो आणि नष्ट करतो. (२ करिंथ. ५:१७)
९. माझ्या पाल्यांच्या चुकांना येशूच्या नावाने मी पुन्हा करणार नाही. (यहेज्केल १८:२०)
१०. पायाभूत शक्तींनी निश्चित केलेल्या मर्यांदांच्याही पलीकडे येशूच्या नावाने मी प्रगती करतो. (फिलिप्पै. ४:१३)

Join our WhatsApp Channel
Most Read
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे● विश्वासाचे बरे करणारे सामर्थ्य
● अन्य भाषे मध्ये बोला व आध्यात्मिकदृष्टया ताजेतवाने व्हा
● देवाचे वचन वाचण्याचे 5 लाभ
● बहाणा करण्याची कला
● क्षमेसाठी व्यावहारिक पाऊले
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
टिप्पण्या