डेली मन्ना
देवदुतांकडे आपण प्रार्थना करू शकतो काय?
Saturday, 27th of January 2024
24
15
528
Categories :
प्रार्थना
काही वर्षांपूर्वी एका जोडप्याने मला लिहिले की त्यांना अनेक वर्षे मुलबाळ नव्हते आणि म्हणून ते आद्यदेवदूत मीखाएल कडे बाळाच्या दानासाठी प्रार्थना करीत होते. त्यांचा विचार हा होता कारण देवदूत मीखाएल हा आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा करण्यात साधक असा होता, मग त्यांना बाळाचा आशीर्वाद देण्यास सुद्धा तो साधक असा होईल. मी त्यांना खडसावले नाही परंतु सौम्यपणे त्यांची सुधारणूक केली आणि त्यांना काही वचने दाखविल्यानंतर त्यांच्यासाठी प्रार्थना केली.
ह्या जोडप्याप्रमाणे, येथे अनेक आहेत जे देवदूतांकडे त्यांच्या गरजांसाठी प्रार्थना करीत आहेत. अनेक आई-वडील त्यांच्या लेकरांना प्रोत्साहन देत आहेत की त्यांच्या रक्षक देवदूताकडे प्रार्थना करा. जरी हे ऐकण्यास फार चांगले वाटते, पण हे पवित्र शास्त्रानुसार नाही.
देवदूतांकडे प्रार्थना करण्याच्या त्यांच्या वादविवादास साहाय्य म्हणून ते प्रकटीकरण ८:२-५ चा संदर्भ देत आहेत.
तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांस सात कर्णे देण्यात आले. मग आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या 'प्रार्थनांसह धूप; ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ 'धूप' दिला होता. देवदूताच्या हातातून 'धुपाचा' धूर पवित्र जनांच्या 'प्रार्थनांसह' देवासमोर वर चढला. तेव्हा देवदुताने 'धुपाटणे' घेऊन त्यात 'वेदीवरचा अग्नि भरून' पृथ्वीवर टाकला आणि 'मेघांचा गडगडाट व गर्जना' झाल्या, 'विजा' चमकल्या व भूमिकंप झाला.
परंतु तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले, हे लोक देवदूताकडे प्रार्थना [मध्यस्थी] करीत नव्हते. देवदूत हे केवळ एक संदेशवाहक असे कार्य करीत होते ज्याप्रमाणे दानीएलच्या पुस्तकात देवाकडे प्रार्थना करणाऱ्या संतांना प्रार्थनेमध्ये साहाय्य व उत्तर देत होते आणि त्याउलट.
प्रसिद्ध इंटरनेट साईट वर मी शेकडो पुस्तकांची जाहिरात पाहिली आहे, जे तुम्हाला सांगते की तुमच्या "देवदूता" कडे संपर्क कसा करावा. काही व्यक्ति स्वतःला देवदूतांच्या अभ्यासात कुशल असे मानतात, व ते त्यांच्या अनुयायांना प्रोत्साहन देतात की त्यांच्या देवदूतावर प्रेम करावे आणि त्यांचे स्वास्थ्य, बरे होणे, संपन्नता, मार्गदर्शन, प्रणय वगैरे मध्ये त्यांना मागावे. ही केवळ फसवणूक आहे आणि ते देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे.
एक कारण की लोक हे फसविले जात आहेत कारण ते वचनात पाहणे व सरळ समजण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या पदाकडे किंवा त्याच्या प्रतिष्ठेकडे पाहतात.
येथे अनेक व्यवहारिक व ईश्वरविज्ञानी कारणे आहेत कि देवदूतांकडे प्रार्थना करणे का चूक आहे? (आज मी केवळ एकच स्पष्ट करणार आहे.)
१. प्रभु येशू ने स्वतः पित्या शिवाय इतर कोणाकडे कधीही प्रार्थना केली नाही.
प्रभु येशूने म्हटले, "तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आत्ताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? (मत्तय २६:५३)
ख्रिस्ताने पित्या शिवाय इतर कोणाकडे कधीही प्रार्थना (विनंती) केली नाही. गेथसेमाने बागेमधील त्याच्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंगी सुद्धा, तो देवाचा पुत्र असून सुद्धा त्याने कधीही सरळपणे देवदूताकडे कधीही प्रार्थना केली नाही, तर तुम्ही आणि मी कोण आहोत की असे करावे?
जर प्रभु येशूला पित्याजवळ प्रार्थना करावी लागली की त्याच्या सुरक्षेसाठी देवदूताला पाठवावे तर मग आपण सरळपणे देवदूताकडे प्रार्थना कशी करू शकतो की आपल्याला सोडविण्यास यावे?
जेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास प्रार्थना कशी करावी हे विचारले, त्याने त्यास सांगितले, "ह्यास्तव, तुम्ही ह्याप्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या,.... (मत्तय ६:९; लूक ११:२)
जर शिष्यांना देवदूतांकडे प्रार्थना करावयाची असती, तर हे ते ठिकाण नसते काय जेथे त्याने आपल्याला तसे करण्यास सुचविले असते?
प्रार्थना
मी तुला धन्यवाद देतो, पित्या, मजवर व माझ्या प्रियजनांवर तूं आपल्या देवदूतांना पाठवेल. आमच्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते आम्हाला आपल्या हातावर झेलून धरितील.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२● तुमची नवीन वाटचाल थांबविली जाऊ शकत नाही
● अप्रसिद्ध नायक
● स्तुति वृद्धि करते
● स्तुति ही जेथे परमेश्वर वास करतो
● निराशेवर मात कशी करावी
● दानीएलाचा उपास
टिप्पण्या