डेली मन्ना
बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
Wednesday, 31st of January 2024
25
20
879
Categories :
परमेश्वराचे शब्द
बायबल
वचन वाचण्यावर लक्ष केंद्रित करा (१ तीमथ्यी ४:१३)
प्रेषितपौलाचा तीमथ्यी ला सरळ व प्रभावी सल्ला (ज्यास तो प्रशिक्षित करीत होता) हा होता की वचन नियमितपणे वाचावे
येथेअनेक आहेत जे बायबल ला सहज धरतात व कोठेही उघडतात. मग ते त्या भागाचे वचन वाचतात किंवा दावा करण्याससुरु करतात की तो भाग परमेश्वराकडून त्यांच्यासाठी संदेश आहे. यात तसे काहीही चूक नाही, परंतु तसे करण्याने तुम्ही देवाच्या वचनाच्या तुमच्या अभ्यासात अधिक समज प्राप्त करू शकणार नाही. जसा वेळ निघून जात असेल, तुम्ही शेवटी वचनाचा तोच भाग किंवा अध्याय उघडत राहाल.
आणखी एक कारण की तुम्ही बायबल अशा पद्धतीने वाचणे थांबविले पाहिजे ते असे की, जर तुमचे बोट अशा वचनावर गेले,".......यहूदा गेला व स्वतःला गळफास लावून घेतला" (मत्तय २७:५), "बेथेल ला या व पाप करा......" (आमोस ४:४ संदेश)
खात्रीने तुम्ही तुमच्या किंवा इतरांच्या उन्नती साठी ह्या वचनाचा हक्क दाखविणारनाही. आता तुमच्या स्वतःला फारच कमी लेखू नका जर तुम्ही अशा प्रकारे करीत होता. सत्य हे आहे कीदेवाच्या अनेक महान पुरुष व स्त्रियांनी त्यांच्या जीवनात कधीतरीएखादया क्षणी असे केले असेन परंतु मग ते वरच्या स्तराकडे वळले, म्हणजे तुम्ही सुद्धा तसे करू शकता.
मी हे सुद्धा ओळखले आहे की अनेक वेळेला लोक बायबल वाचण्यास सुरु करतात आणि मग ते सोडून देतात. वरील सर्व गोष्टी टाळू शकतात जर तुमच्याकडे बायबल वाचण्याचे वेळापत्रक आहे.
एक बायबल वाचण्याची योजना जसे ३६५ शिष्यत्व योजना (जे नोहा ऐप वर मिळते) जे तुम्हाला साहाय्य करेल की संपूर्ण बायबल एका वर्षात वाचावे. हे तुम्हाला केंद्रित राहावयास साहाय्य करेल व सोप्या अध्यायामध्ये संपूर्ण बायबल द्वारे जाऊ देईल. ही एक गोष्ट आहे ज्याने मला देवाच्या वचनात वाढण्यास साहाय्य केले आहे आणि मी हे सरळ व प्रभावी रहस्य तुम्हाला आज सांगत आहे.
'मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल,' असा शास्त्रलेख आहे.' (मत्तय ४:४)
"....तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धि व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा." (२ पेत्र २:२)
जेव्हा आपण शारीरिक अन्न खातो, तेव्हा आपल्याला सुदृढ असे राहण्याच्या गरजेसाठी ते पोषकतत्वे पुरवितात.
त्याचप्रमाणे, दररोज बायबल योजनाबद्ध पद्धतीने वाचणे हे तुम्हाला परिपक्व आध्यात्मिक जीवन विकसित करण्यास कारणीभूत होईल. ते तुम्हाला लवकर वाढण्यास कारणीभूतहोईल.
तसेच, जेव्हा तुम्ही बायबल वाचत आहात, शांतपणे ही प्रश्ने विचारा
- येथे काही आदेश आहे काय ज्यास मला आचरणात आणण्याची गरज आहे?
- हे आश्वासन ज्याचे मला व माझ्या कुटुंबासाठी दावा करण्याची गरज आहे काय?
- मी हे वचन माझ्यासाठी, कुटुंबासाठी, किंवा इतरांसाठी प्रार्थनेचा मुद्दा असे वापरू शकतो काय?
कोणीतरी फारच योग्यपणे म्हटले आहे, "बायबल हे माहिती साठी केवळ दिले गेले नाही परंतु आपल्याला परिवर्तीत करण्यासाठी."
प्रार्थना
पित्या, माझे डोळे उघड की तुझ्या वचनातून अद्भुत गोष्टी पाहावे. येशूच्या नांवात.
पित्या, माझे कान उघड की तुझी वाणी मला बोलत आहे अशी ऐकावी जेव्हा मी दररोज केवळ तुझे वचन वाचत आहे. येशूच्या नांवात.
पित्या, मला तुझी कृपा पुरीव की तुझे वचन दररोज वाचावे व एका वर्षात संपूर्ण बायबल वाचावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 2● येशू स्वर्गात काय करीत आहे
● बोललेल्या शब्दाचे सामर्थ्य
● भविष्यात्मकदृष्टया शेवटच्या समयाचे संकेत काढणे
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-२
● चांगले आर्थिक व्यवस्थापन
● तुमचा विश्वासघात झाला असे अनुभविलेआहे काय?
टिप्पण्या