एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गाऱ्हाणे केले; ती म्हणाली तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांस दास करून नेण्यास आला आहे. (२ राजे ४:१)
एकपुरुष त्याची पत्नी व लेकरांना कर्जात सोडून गेला होता, बायबल म्हणते, "चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रास वतन ठेवितो" (नीतिसूत्रे १३:२२)
मी भाकीत करतो की ते तुम्ही व मी असणार. तुम्ही ह्या जीवनात काय करीत आहात त्याचा तुमच्याबरोबर शेवट नाही झाला पाहिजे. तुम्हांला व मला बोलाविले आहे की भविष्यातील पिढीला आशीर्वाद असे व्हावे.
म्हणून संदेष्ट्याने [अलीशा] तिला म्हटले, "मी तुझ्यासाठी काय करू? तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीएक नाही." (२ राजे ४:२)
विधवेने फारच अनोखे उत्तर दिले. "माझ्याकडे काहीएक नाही परंतु माझ्याकडे काहीतरी आहे." परमेश्वर नेहमीच काहीतरी उपयोगात आणेल जे त्याने अगोदरच तुम्हाला दिले आहे. देवाने मोशे ला विचारले तुझ्या हातात काय आहे. मोशेच्या हातात केवळ एक साधारण दिसणारी काठी होती. परमेश्वराने तीचा उपयोग केला की संपूर्ण राष्ट्राला सोडवावे.
परमेश्वराने केवळ गोफणगुंडा व काही दगड चा वापर करून दावीदास इस्राएल मध्ये प्रसिद्ध केले. परमेश्वराने केवळ पाच भाकरी व दोन मासे (जे कदाचित ताजे सुद्धा नव्हते)वापरले की पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना तृप्त करावे. ही माझी प्रार्थना आहे की परमेश्वर तुम्हाला दाखवेल की तुमच्याकडे काय आहे. ते कौशल्य, दान असू शकते. याची पर्वा नाही की ते किती लहान आहे, परमेश्वर त्याचा वापर करेल की तुम्हाला कर्जामधून बाहेर काढावे. हे वचन प्राप्त करा.
तेव्हा तो [संदेष्टा]म्हणाला, "तूं जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण.
मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांडयात तेल ओत; आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव."
देवाचा माणूस विधवेला भविष्यात्मक उपदेश देतो. तिने त्यावर विचार केला नाही की ते कसे काय होईल परंतु तिने भविष्यात्मक वचनामध्ये विश्वास ठेवला.
तुम्ही ज्या उपदेश पालन करायचे ठरवले आहे ते तुम्ही तयार केलेले भविष्य ठरवते. उपदेश निर्माण आणते. उपदेशाचा अभाव विनाश आणतो.
माझ्याजवळ तुमच्यासाठी भविष्यात्मक उपदेश आहे.
तुमचे सर्व कर्ज एका कागदावर लिहा. प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, ह्या क्रमवारीमधील प्रार्थना मुद्दे वापरा आणि परमेश्वराला विनंती करा की ते कर्ज काढून टाकावे. मला ठाऊक आहे हे फारच सोपे वाटते परंतु हे त्यांच्यासाठी कार्य करेल जे ह्या भविष्यात्मक संदेशावर विश्वास ठेवतात.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र कमीतकमी एका मिनिटा साठी म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्रा कडे वळा.
१. परमेश्वरा माझे नेत्र उघड की तूं जे मला दिले आहे ते पाहावे.
२. परमेश्वरा माझे नेत्र उघड की त्या गोष्टी पाहाव्या जे इतर सहज पाहू शकत नाही. मी तुला दैवी संधी साठी विनंती करतो.
३. माझे जीवन व माझ्या कुटुंबाच्या जीवनातून कर्जाचेप्रत्येक डोंगर हे अग्निद्वारे काढून टाकले जावो, येशूच्या नांवात.
४. येशूचे रक्त, माझ्या वतीने बोल, आतापासूनमाझ्या जीवनातून उसणे घेण्याचा शाप तोडून टाक व त्याउलट कर. येशू ख्रिस्ताच्या नांवात, आमेन.
५. प्रत्येक शक्ति जीम्हणते मी माझ्या वंशात यशस्वी होणार नाही, तूं खोटी आहे, अग्निद्वारे तूं नष्ट होवो, येशू ख्रिस्ताच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रीति साठी शोध● परमेश्वर अंत:करण शोधतो
● तुमच्या नियतीचा विनाश करू नका!
● चिंते वर वर्चस्व मिळविण्यासाठी, ह्या गोष्टींवर विचार करा
● परमेश्वरा, मला अडथळ्यापासून सोडीव
● २१ दिवस उपवासः दिवस ०६
● दैवीव्यवस्था-२
टिप्पण्या