डेली मन्ना
24
17
1066
परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
Sunday, 3rd of March 2024
Categories :
भावनाएं
मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको; कारण तूं जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. (यहोशवा १:९)
परमेश्वरावर भरंवसा ठेवणे हे काही इच्छेने विचार करणे नाही. हेव्यवहारिकपणे परमेश्वरा मध्ये त्याच्या क्षमते मध्ये भरंवसा ठेवणे आहे की तो तुमच्या मध्ये व तुमच्या द्वारे कार्य करील.
परमेश्वराने तुम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याने समर्थ केले आहे.
त्याने आपल्याला त्याच्या वचनाने तयार केले आहे. त्याने आपल्याला हा दिवस दिला आहे. त्याने द्वार उघडले आहे ज्याचे आपण कधी स्वप्न देखील पाहू शकलो नसतो. तुम्ही असा विचार करता की त्याने तुम्हाला आतापर्यंत कोणत्याही उद्धेशा शिवाय आणले आहे काय? यावर विचार करा.
जर परमेश्वराला त्याच्या गौरवाकरिता उपयोगात आणावयाचे नाही आहे, तर तो तुम्हाला असे समर्थ करील काय जसे त्याने केले आहे? तो असे करील काय?
हे सोपे आहे असा विश्वास ठेवणे की परमेश्वर इतर कोणाला तरी उपयोगात आणणार आहे, परंतु सत्य हे आहे कीतुम्ही मागण्यापेक्षा किंवा तुमच्या कल्पने पेक्षा अधिक तो तुमचा उपयोग करू इच्छित आहे. (इफिस ३:२०)
बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते की आपल्या भोवती जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा आपण अधिक कष्टातव अधिक त्यागलेले असे आहोत. आपल्याला असे वाटते की इतर हे आपल्यापेक्षा अधिक ती नोकरी प्राप्त करण्यास पात्र आहेत. ह्यामुळे ते आपल्याला अधिक शांत होण्याच्या वृत्ति मध्ये नेते.
तथापि, जर तुम्ही वचनात प्रत्यक्षात पाहिले, तुम्ही हे पाहाल की परमेश्वराने कष्टी व अपूर्ण लोकांस सतत उपयोगात आणले आहे! तो याची वाट पाहत नाही की तुमचे जीवन सिद्धपणे योग्य असे व्हावे की तुमचा उपयोग करावा. त्यास तुमचा आत्ताच, येथे उपयोग करावयाचा आहे.
आपल्या सर्वांमध्ये अनेक दान व वरदाने ज्याचा कधी वापर केलेला नाही ते उपलब्ध आहेत, आणि आपली क्षमता विकसित करण्याचा मार्ग हा की विश्वासाने पाऊल उचलावे व व प्रत्येक संधीचा जितका होईल तितका उपयोग करावा.
तूं आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तूं आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. (नीतिसूत्रे ३:५-६)
हे असे नाही की तुमच्याजवळ किती आहे परंतु जे तुमच्याकडे आहे त्याचा तुम्हीकसा वापर करता तेच महत्वाचे आहे. परमेश्वरानेजी दाने व वरदाने तुम्हाला दिली आहेत त्यांचा तुम्ही अधिक वापर करीत आहात काय?
प्रार्थना
प्रभो, मी माझ्या स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. माझे हात घे, माझे पाय घे, माझ्या हृदयाला स्पर्श कर प्रभो, माझ्याद्वारे बोल, व तुझ्या गौरवाकरिता येशूच्या नांवातमाझा उपयोग कर, आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
● महान पुरुष व स्त्रिया पतन का पावतात - ५
● दिवस ०६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● वर्षाव
● तुमच्या समस्या व तुमचा दृष्टीकोन
● २१ दिवस उपवासः दिवस ०४
टिप्पण्या