डेली मन्ना
परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-२
Wednesday, 20th of March 2024
26
18
823
Categories :
सेवा करणे
प्रभु येशूने म्हटले, "जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील." (योहान १२:२६)
#३ जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असला पाहिजे
प्रभु कोठे आहे, तेथे त्याचा सेवकही असला पाहिजे, ते उपलब्धतेविषयी बोलते. नहेम्या कोणीतरी होण्याअगोदर तो कोणीही नव्हता. नहेम्या १:१ मध्ये त्याची ओळख कशी दिली आहे त्याकडे पाहा, "हखल्याचा पुत्र नहेम्या याचा वृत्तांत".
नहेम्या ने कोणतेही अद्भुत चमत्कार प्राप्त केले नाही, मरीये प्रमाणे कोणत्याही देवदूताची भेट नाही किंवा प्रेषित पौला प्रमाणे दमास्कस मार्गावरील अनुभव नाही. त्याच्याकडे जी जबाबदारी होती त्यासाठी तो उभा राहिला. त्याने स्वतःला उपलब्ध ठेवले. त्याने स्वतःला उपयोगी असे केले. तो जे सर्व काही करू शकत होता ते त्याने केले.कार्य करण्यासाठी तुम्हांला कोणत्याही पदाची गरज लागत नाही. केवळ तुमच्या स्वतःला उपलब्ध करा.
जेव्हा प्रार्थनेची वेळ होती, नहेम्याने आग्रहाने प्रार्थना केली. जेव्हा बांधण्याची वेळ होती, तो जे भिंत बांधीत होते त्यांस त्याने साहाय्य केले.
कैथरीन कुलमन देवाच्या एक महान सेविकेला बोलताना मी ऐकले, "परमेश्वर चांदीची व सोन्याची पात्रे वापरीत नाही. तो जी पात्रे उपलब्ध आहेत ती वापरतो" हे शब्द किती खरे आहेत.
परमेश्वरक्षमते पेक्षाउपलब्धतेमध्ये रुची ठेवतो. जर तुम्ही तुमच्या स्वतःला उपलब्ध कराल. तो तुम्हाला योग्य होण्यास समर्थ करील.
नहेम्याची योग्यता कीकठीणता व विरोधाला तोंड देत असताना सुद्धा विश्वासू राहावे याने खात्री केली कीपरमेश्वरा द्वारे उपयोगात आणले जावे.
#४ आपण देवाची सेवा हर्षाने केली पाहिजे
हर्षाने परमेश्वराची सेवा करा; गीत गात त्याच्यासमोर या (स्तोत्र १००:२). परमेश्वराला कुरकुर करणारी सेवा, कंटाळवाणी सेवा, आळशी सेवा आवडत नाही. येथे लोक आहेत जे देवाची सेवा करण्याचा दावा करतात परंतु वेळे मध्ये उपासनेला कधीही येत नाहीत. आपल्याला देवाची सेवा उत्तमतेमध्ये करण्याची गरज आहे आणि केवळ काहीतरी करावयाचे आहे म्हणून नाही.
आपल्या परमेश्वराला त्याच्या सिंहासनाभोवती कोणीही गुलाम असण्याची गरज नाही; तो प्रीतीने व्यक्त आहे, आणि त्यास पाहिजे की त्याच्या सेवकांनी हर्षरुपी व आनंदाची वस्त्रे घातलेले असावे.
प्रेषित पौल म्हणतो, "प्रीतीने एकमेकांची सेवा करा." ही एक महत्वाची किल्ली आहे. १ करिंथ १३:३ नोंद करते, "याची पर्वा नाही की मी काय बोलतो, मीकाय विश्वास ठेवतो, आणि मी काय करतो, प्रीतीवाचून मी व्यर्थ आहे.
देवाचे दूत त्याची सेवा गीता द्वारे करतात, उसासेटाकीत व कण्हत नाही. परमेश्वर अंत:करणाकडे पाहतो, की आपण त्यास जबरदस्तीने नाही तर मनापासून त्याची सेवा करण्यास तयार आहोत की नाही. सेवा जी हर्षाने अलंकृत आहे ती अंत:करणापासून सेवा आहे आणि म्हणून परमेश्वरा साठी खरी सेवा आहे.
प्रार्थना
पित्या, मी स्वतःला तुला उपलब्ध करवितो. मी आहे मला पाठिव परमेश्वरा.
पित्या, मला क्षमा कर की अनेक वेळेला मी तुझी सेवा योग्य आचरणाने केली नाही. मला उत्तमेतेच्या आत्म्याने समर्थ कर जेणेकरून मी तुझे नांव नेहमीच गौरवावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस २५:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● आपल्या निवडींचा प्रभाव
● दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● अन्य भाषे मध्ये बोलणे हे आंतरिक आरोग्य आणते
● वचनाचा प्रभाव
● दिवस १० :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● २१ दिवस उपवासः दिवस १४
टिप्पण्या