एक वातावरण त्या ठिकाणाबद्ल काहीतरी प्रगट करते
तुम्ही कोणाच्यातरी घरी आला आहात व तुम्हाला अवघड वाटत आहे. हे फर्निचर किंवा इतर सुविधा संबंधी नाही –काहीतरी त्या ठिकाणी योग्य असे वाटत नाही. वातावरण हे अगदी योग्य असे नाही. नंतर, जेव्हा तुम्ही घरी गेला, तुम्हाला काही माध्यमाद्वारे हे समजले की पती व पत्नी हे काही दिवस किंवा आठवडे हे अबोल्यात आहेत. ते अवघडपण वातावरणात दिसले.
चला मला आणखी एक चित्र रंगवू दया. तुम्ही एका घरात प्रवेश करता, आणि ते फारच साधारण असे वाटते आणि तरीही तुम्हाला इतकी शांति व आनंद मिळतो. त्याठिकाणी वातावरणा विषयी काहीतरी आहे जे सर्व फरक करते.
प्रभावीपणे कार्य करण्यासाठी योग्य वातावरणाची गरज लागते
खगोलशास्त्रज्ञांना अनेक वर्षे प्रशिक्षण दयावे लागते आणि ते अत्यंत समर्थ लोक आहेत. तथापि, खगोलशास्त्रज्ञ जेव्हा अवकाशात जातात, त्याला किंवा तिला पृथ्वीचे वातावरण त्या अवकाश वेशभूषेत घेऊन जावे लागते जर त्यांना प्रभावीपणे कार्य करण्यास समर्थ व्हावयाचे आहे.
एक मासा ज्यास प्रभावीपणे कार्य करण्यासाठी पाण्याच्या वातावरणाची गरज लागते. त्याप्रमाणेच, एका बाळाला आईच्या उदराच्या वातावरणाची गरज लागते की ते परिपक्वते मध्ये वाढावे.
त्याप्रमाणेच, तुम्हाला व मला प्रभावीपणे कार्य करण्यास, परिपक्वतेमध्ये वाढण्यास, फलदायक वगैरे, होण्यासाठी योग्य वातावरणाची गरज लागते.
प्रभु येशूने वातावरणावर शिकविले
मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला: पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला; आणि तो पेरीत असतां काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही कांटेरी झाडांमध्ये पडले; मग कांटेरी झाडांनी वाढून त्यांची वाढ खुंटविली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्यांचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको." (मत्तय १३:३-९)
प्रभु येशूने चार वातावरणा विषयी म्हटले
अ. रस्त्यावर
ब. खडकाळ
क. कांटेरी
ड. चांगली जमीन
सर्वात मनोरंजक भाग हा आहे की हा तोच पेरणारा व तेच बी होते आणि तरीही बी फलदायक होऊ शकले नाही वातावरणाच्या कारणामुळे. हे मग तेव्हाच जेव्हा बी योग्य वातावरणात पडले ते अद्भूतरीत्या फलदायक होऊ लागले.
अनेक जण त्यांच्या जीवनात संघर्ष करीत आहेत कारण त्यांच्या प्रभावीपणात किंवा फलदायकपणात योग्य वातावरण कसे महत्वाची भूमिका पार पाडते याविषयी त्यांना प्रकटीकरण नाही. आता ही वेळ आहे की तुम्ही ह्या प्रकटीकरणात प्रवेश घ्यावा.
प्रार्थना
पिता, मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना योग्य वातावरणात रोपा. येशूच्या नावात
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे● तुम्हाला कोण मार्गदर्शन करीत आहे?
● मृतामधून प्रथम जन्मलेला
● उपासना: शांतीसाठी किल्ली
● दीर्घ रात्रीनंतर सूर्योदय
● २१ दिवस उपवासः दिवस १५
● तुमच्या भूतकाळाला तुमच्या भविष्यास नाव ठेवू देऊ नका
टिप्पण्या