“जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल; मी ‘जीवनाच्या पुस्तकातून’ त्यांचे नाव ‘खोडणारच’ नाही, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन.” (प्रकटी. ३:५)
प्राचीन काळात नगरे त्यांच्या नागरिकांची नोंद ठेवत असत; आणि जेव्हा माणूस मरण पावत असे, तेव्हा त्याचे नाव नोंदवहीतून काढून टाकत असत. पुनरुत्थित ख्रिस्त हे म्हणत आहे की, जर देवाच्या नागरिकाच्या नोंदीत राहण्याची आपली इच्छा असेल, तर आपण आपला विश्वास ज्वलंत ठेवला पाहिजे.
येथे जीवनाचे पुस्तक आहे, आणि न्यायाच्या दिवशी ते उघडण्यात येईल आणि त्यातून संदर्भ घेतला जाईल. याचा अर्थ जीवनाचे पुस्तक हे खरे आहे आणि ते वाचण्यात येईल.
“मग मृत झालेल्या लहानथोरांना मी [देवाच्या] राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी पुस्तके उघडली गेली; तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला.” (प्रकटी. २०:१२)
प्रकटीकरण ३:५ मध्ये, “ जे मात करणारे आहेत त्यांच्यासाठी येशू एक शक्तिशाली अभिवचन देतो : “मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव ‘खोडणारच’ नाही.” जीवनाचे पुस्तक हे स्वर्गातील त्यांची नोंद आहे जे देवाचे आहेत आणि ज्यांना सार्वकालिक जीवन आहे. या पुस्तकात आपली नावे लिहिली जाण्याच्या महत्वाला चला आपण स्पष्ट करू या.
संपूर्ण बायबलमध्ये, जीवनाच्या पुस्तकाचा संदर्भ आपण पाहतो. निर्गम ३२:३२-३३ मध्ये, मोशे इस्राएल लोकांसाठी मध्यस्थी करतो, त्यांच्या पापाची क्षमा करावी किंवा त्याचे नाव पुस्तकातून काढून टाकावे म्हणून देवाला विनंती करत आहे. स्तोत्र. ६९:२८ मध्ये, जीवनाच्या पुस्तकातून दुष्टाचे नाव काढून टाकण्यासाठी दावीद प्रार्थना करत आहे. फिलिप्पै. ४:३ मध्ये प्रेषित पौल त्याच्या सहकारी लोकांच्या नावांचा उल्लेख करतो ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत.
आपली नांवे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली असणे हे आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी प्राप्त करत नाही. आपला विश्वास येश ख्रिस्तावर ठेवण्याचा आणि त्याच्या तारणाच्या बक्षिसाला स्वीकारण्याचा तो परिणाम आहे. प्रकटीकरण १३:८ ज्यांची नांवे त्या पुस्तकांत लिहिलेली नाहीत त्यांचे जे श्वापदाची उपासना करणारे आहेत म्हणून वर्णन करते. या उलट, ते जे ख्रिस्ताचे आहेत त्यांना शास्वती आहे की त्यांची नांवे सुरक्षितपणे स्वर्गात नोंदलेली आहेत.
जीवनाच्या पुस्तकातून येशू प्रभुत्व मिळवणाऱ्या लोकांची नांवे खोडणारच नाही याचे आश्वासन हे एक सामर्थ्यशाली प्रोत्साहन आहे. ख्रिस्ता मध्ये आपल्याला असणाऱ्या सार्वकालिक सुरक्षिततेबद्दल ते बोलते. आपण जेव्हा त्याचे होतो, तेव्हा त्याच्या प्रीतीपासून आपल्याला काहीही वेगळे करू शकत नाही (रोम. ८:३८-३९). आपले तारण हे आपल्या कार्यक्षमतेवर आधारित नाही परंतु वधस्तंभावरील येशूच्या पूर्ण केलेल्या कामावर आहे.
तुम्ही तुमचा विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवला आहे का, आणि तुमच्या तारणासाठी केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवला आहे का? जर तसे आहे, तर त्या शास्वतीमध्ये आनंद करा की तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आहे. जर तुम्ही ही निवड कधीही केलेली नसेल, तर आजच हा दिवस आहे की या सार्वकालिक जीवनाचे त्याचे बक्षीस स्वीकारावे. ते जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी, त्यांनी त्या आश्वासनामध्ये सांत्वन प्राप्त करावे की येशू तुमचे नाव कधीही खोडणारच नाही. असे होवो की हे सत्य तुम्हांला शांतीने आणि आत्मविश्वासाने भरून काढो जेव्हा तुम्ही जीवनाच्या आव्हानांचा सामना करता.
प्रार्थना
प्रभू येशू, माझे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिण्यासाठी तुझे आभार. तारणाचे अविश्वसनीय बक्षीस जे तू मला दिले आहे ते मी कधीही गृहीत धरू नये. मी कायमचा तुझा आहे हे जाणण्याचा आनंद आणि सुरक्षिततेमध्ये प्रत्येक दिवस जगण्यासाठी मला मदत कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रभू येशू द्वारे कृपा● देवाचे 7 आत्मे
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● शांततेसाठी दृष्टी
● शुद्धीकरणाचे तेल
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● दिवस ३८ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या