डेली मन्ना
महान पुरुष व स्त्रिया पतन का पावतात - ५
Sunday, 12th of May 2024
20
14
696
Categories :
जीवनाचे धडे
उत्पत्ति ८:२१ मध्ये परमेश्वराने म्हटले, "मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात". मानवाच्या सतत दुष्ट कल्पना करण्याने परमेश्वराच्या मनास दु:ख दिले व त्याने जगाचा जलप्रलयाने नाश केला. आपल्याभोवती ज्या सर्व वाईट गोष्टी आज घडत आहेत, हे त्याच्या अंत:करणाला सखोलपणे दु:ख देत असले पाहिजे.
सर्व पाप आपल्या विचारात (कल्पनेत) जन्म घेते. पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की "दाविदाने चाकर पाठविले व स्त्री [बथशेबा] विषयी विचारपूस केली. आणि कोणीतरी म्हटले, "ती अलीयमाची कन्या व उरीया हित्ती याची बायको बथशेबा आहे ना?" तेव्हा दाविदाने जासूद पाठविले व तिला बोलावून आणिले. (२ शमुवेल ११:३-४)
तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. (याकोब १:१४-१५)
जेव्हा दाविदाने बथशेबा विषयी विचारुपूस केली, लोकांनी त्यास स्पष्टपणे सांगितले की ती विवाहित स्त्री आहे. विषय अधिक गंभीर करण्यास, त्यांनी त्यास हे सुद्धा सांगितले की ती त्याच्या एक सर्वात प्रामाणिक व विश्वासू सेवक उरीया हित्ती ची बायको आहे. अचानकपणे तर्क, कारणे, व आध्यात्मिक विश्वास हे बाजूला ठेवले गेले आणि तो पूर्णपणे वासनेने भरला गेला. शोकांतिकपणे, ह्या पापाने दाविदास व्यभिचार, खून करण्याकडे नेले आणि त्याचे परिणाम त्याच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालू राहिले.
जर तुम्ही कशा प्रकारच्या तरी पापात पडला असाल तर त्यास एक पद्धत असे होऊ देऊ नका. एक पद्धत असे म्हणण्याचा माझा काय अर्थ आहे? जेव्हा तुम्ही ते वारंवार करीत राहता ती एक पद्धत होऊन जाते. चला मला सन्मानाने चेतावणी देऊ दया की हे तुम्हाला विनाशाकडे नेईल. नैतिकदृष्टया जखमी व्यक्ति प्रमाणे, तुमच्याकडे ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे. आत्ताच पश्चातापामध्ये तुम्हाला देवाकडे वळण्याची गरज आहे!
"तुम्ही काय विचार करता त्याविषयी खबरदार असा, कारण तुमचे विचार तुमच्या जीवनास चालवितात" (नीतिसूत्रे ४:२३). ज्याकशावरही आपल्या मनाचे लक्ष केंद्रित राहते तेच आपल्या जीवनात कार्य करेल आणि शेवटी आपण कोण आहोत तसे आपल्याला स्वरूप देईल. हे नेहमीच आपले विचार, आपली परिस्थिती नाही, जे आपल्याला अडचणीत आणण्यास कारण होते.
पवित्रतेसाठी युद्ध हे तुमच्या मनात जिंकले किंवा गमाविले जाते. आपण आपल्या विचारांना नियंत्रणात ठेवण्यास शिकले पाहिजे. फुलण्या अगोदर ते विचार कोंब मध्ये असतानाच छाटून टाका.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, प्रत्येक विचार व इच्छेला जे माझ्यामध्ये अशुद्ध आहे ते काढून टाक. तुझ्या गौरवाकरिता मला पवित्र राहण्यास साहाय्य कर. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
● इतरांसाठी मार्ग प्रकाशित करणे
● आपल्यामध्येच खजिना
● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
● २१ दिवस उपवासः दिवस ०७
● ख्रिस्तासाठी राजदूत
टिप्पण्या