आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. (२ करिंथ ५:७)
पवित्र शास्त्र त्या लोकांची सूची आहे जे विश्वासाने परमेश्वराबरोबर चालले. हनोख, अब्राहाम, हन्ना, दावीद, हिज्कीया, दानीएल, तीन इब्री तरुण, आणि बरेच इतर. ते असामान्य व्यक्ति नव्हते परंतु सामान्य व्यक्ति होते ज्यांनी सिद्ध भरंवसा व समर्पण द्वारे केवळ देवाला त्यांचा सांभाळ करणारा असे पाहिले. त्यांनी देवावर इतका भरंवसा ठेवला की त्यांच्यामध्ये शंकेचे कोणतेही ढग हे निर्माण होऊ दयावे.
विश्वासाद्वारे चालणे हे सरळपणे देवावर पूर्णपणे भरंवसा ठेवणे आहे व त्याची इच्छा व आज्ञेप्रमाणे चालणे आहे. हे जाणूनबुजून त्यास आपल्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण देणे आहे. अब्रामाच्या जीवनाकडे वरवर नजर टाकल्यावर एक मनुष्य तो जो काही आहे त्यापासून परमेश्वरास तो कसा असावा त्यामध्ये विश्वास त्यास कसे परिवर्तीत करू शकतो हे पाहण्यास आपल्याला साहाय्य करते. अब्रामास आपल्याला इतर कोणत्याही पवित्र शास्त्रातील व्यक्ति प्रमाणे परिचित केले आहे परंतु मग, एक निश्चित क्षण आला: परमेश्वर त्याजबरोबर बोलला आणि त्यास म्हटले की तो जेथे आहे तेथून त्याने निघावे व एका नवीन ठिकाणी जावे जे परमेश्वर त्यास दाखवीत आहे. विश्वासाची खुण म्हणून त्याचे नाव अब्राहाम असे बदलले गेले.
तो ज्या ठिकाणी परिचित होता तेथून काहीही ठाऊक नाही अशा ठिकाणी त्यास बोलाविण्यात आले, परंतु त्याने आज्ञा पाळली! त्याने पत्ता व वर्णन साठी मागणी केली नाही; त्याने देवासमोर त्याच्या योजना व महत्वाकांक्षा ठेवल्या नाहीत. त्याने केवळ आज्ञा पाळली!
भरंवसाचा हा अंश जो आज परमेश्वर आपल्याकडून मागत आहे. आपण आपल्या जीवनात त्या ठिकाणापर्यंत गेले पाहिजे, जेथे आपण स्वतः चालविण्यास थांबतो व त्यास नियंत्रण देतो! तो काही गोष्टीचा प्रभु असू शकत नाही; तो एकतर सर्वांचा प्रभु असला पाहिजे किंवा प्रभुच नसावा. परमेश्वराला पाहिजे की आपण त्याच्यावर सर्व गोष्टीमध्ये भरंवसा ठेवावा. आपण कोठे असावे, आपण काय केले पाहिजे व आपण ते कसे केले पाहिजे. विश्वासाने चालण्याचा हाच काय तो अर्थ आहे. विश्वासाने चालणे हे शंका व घाई न करता परमेश्वराच्या उपदेशानुसार चालणे आहे. ख्रिस्ती लोकांसाठी, विश्वासाने चालणे हा पर्याय नाही, ती आवश्यकता आहे.
इब्री ११:६ मध्ये बायबल म्हणते, "आणि विश्वासावाचून त्याला 'संतोषविणे; अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे." हे त्या वास्तविकतेकडे बोट दाखविते की विश्वास हा ख्रिस्ती जीवनात अत्यंत आवश्यक आहे. परमेश्वर हा आता शारीरिकदृष्टया आपल्याबरोबर उपस्थित नाही, परंतु त्याच्या वचनाद्वारे, त्याची शक्ति व सामर्थ्य आपल्याला ठाऊक आहे.
म्हणून, विश्वास हाच केवळ मार्ग आहे ज्याद्वारे आपण देवाच्या मागे खरेच चालू शकतो. जर आपण त्यावर भरंवसा ठेवत नाही, आपण त्याच्याकडे मागणी करू शकत नाही, जर आपण त्यावर विसंबून राहत नाही, तो आपल्याला साहाय्य करू शकत नाही. हे तितकेच सरळ आहे! जर तुम्हाला देवाबरोबर तुमचे चालणे अधिक मनमिळाऊ व फलदायक असे पाहावयाचे असेल, तर तुम्हाला त्यावर विसंबून राहिले पाहिजे व त्याच्या वचनावर भरंवसा ठेवला पाहिजे. तुम्हाला "नियमशास्त्रातून शोधले" पाहिजे, असे होवो की तुमचे जीवन हे त्याची आश्वासने व सिद्धांतानुसार चालावे.
प्रार्थना
पिता परमेश्वरा, विश्वासात कळकळीने व निरंतर चालण्यास मला साहाय्य कर. तुझ्या वचनावर संपूर्ण भरवंसा ठेवण्यास व तुझ्या कृपेवर विसंबून राहण्यास मला शिकीव. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अन्य भाषे मध्ये बोलणे हे आंतरिक आरोग्य आणते● स्वप्न पाहण्याचे धाडस करा
● विचलित होण्याच्या वाऱ्यामध्ये स्थिर
● बीभत्सपणा
● भावनात्मकदृष्टया वाहवत जाऊन बळी पडणे
● तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर पडा
● तुरुंगात स्तुती
टिप्पण्या